Breaking News

Tag Archives: पाचवा टप्पा

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात महिला आणि रोजगाराच्या मुद्यावर भर

सोमवारी झालेल्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सर्वात कमी जागांवर – ४९ जागांवर लढत होती. पण त्यात उत्तर प्रदेशातील रायबरेली, अमेठी आणि फैजाबाद या हेवीवेट जागा, मुंबई, ठाणे आणि नाशिकच्या शहरी भागांचा समावेश होता. महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या दक्षिणेकडील भागांमध्ये, ज्यामध्ये २०१९ मध्ये भारतीय जनता पक्ष आणि तृणमूल काँग्रेस (TMC) यांच्यात …

Read More »

उद्धव ठाकरे यांचे आवाहन, …उद्याची सकाळ उजडली तरी मतदान कराच

मुंबई आणि एमएमआर परिसरातील अनेक मतदान केंद्रांवर वेळेत मतदानाची प्रक्रिया पार पाडली जात नाही. त्यामुळे अनेक मतदार हे मतदान केंद्रावर वेळ लागत असल्याने मतदान न करताच परतत आहेत अशा तक्रारी सातत्याने येत आहेत. हा वेळ जेणेकरून मतदारांनी मतदानच करू नये यासाठी जाणीवपूर्वक करण्यात येत आहे. तर माझे मतदारांना आवाहन आहे …

Read More »

ठाण्यात बोगस मतदान, चुक लक्षात आणून देताच मतपत्रिकेद्वारे मतदान करवून घेतले

२५- ठाणे लोकसभा मतदार संघाअंतर्गत १४८-ठाणे विधान सभा मतदार संघामधील मतदान केंद्र क्रमांक २७३ मध्ये एक मतदार मतदान करणेसाठी गेला असता, त्यांचे ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने बोगस मतदान केल्याचे मतदान केंद्र क्रमांक २७३ चे मतदान केंद्राध्यक्ष यांचे निदर्शनास आले. त्यानंतर मतदार यांचे ओळखीची खात्री करुन मतदाराला भारत निवडणूक आयोग यांचे निर्देशानुसार …

Read More »

लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रात ४८ टक्के तर देशात ५६ टक्के मतदान

महाराष्ट्रातील ४८ पैकी १३ मतदारसंघात आज मतदान होत असून, राज्यातील लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा संपत आहे. हा टप्पा जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील मतदानाचा शेवटचा टप्पा देखील चिन्हांकित करेल कारण त्यांच्या पाच मतदारसंघांपैकी एक मतदारसंघात मतदान होणार आहे. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्येही या टप्प्यात मतदान होत आहे. मागील टप्प्यातील कमी मतदान …

Read More »

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात महाराष्ट्रातील १३ मतदारसंघातील दुपारपर्यंतचे मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज २० मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याम, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण या १३ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत …

Read More »

मतदानाच्या दिवशी दिव्यांग मतदारांसाठी धावणार बस

‘एकही मतदार मागे राहू नये या संकल्पानुसार मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांसाठी २० मे २०२४ रोजी मतदानासाठी विशेष विनामूल्य बस सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने आज जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या बस सेवचे उद्धाटन करण्यात आले. यावेळी प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांशी जिल्हाधिकारी …

Read More »

उद्धव ठाकरे यांची खोचक टीका, ४ जूनपासून जुमला पर्व संपणार…

महाराष्ट्रातील पाचव्या अर्थात शेवटच्या टप्प्यातील लोकसभा निवडणूकीसाठी २० मे २०२४ रोजी मतदान पार पडणार आहे. या पाचव्या टप्प्यासाठी आज संध्याकाळी प्रचाराची मुदत संपणार आहे. या पार्श्वभूमीवर आज इंडिया आघाडीच्या वतीने ग्रॅड हयात येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. यावेळी मल्लिकार्जून खर्गे आणि शरद पवार यांनी काँग्रेसची भूमिका मांडल्यानंतर उद्धव ठाकरे …

Read More »

मल्लिकार्जून खर्गे यांचा टोला, बुलडोझर संस्कृती भाजपाची, काँग्रेसची नाही

नरेंद्र मोदींचे राजकारण विश्वासघाताचे आहे, संविधानाला धाब्यावर बसवून ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यंत्रणेकडून विरोधकांना धमकी देऊन, आमिषे देऊन पक्ष फोडले व सरकारे पाडली. खऱ्या राजकीय पक्षाचे चिन्ह भाजपाला पाठिंबा देण्याऱ्या पक्षाला दिले, हे सर्व नरेंद्र मोदींच्या इशाऱ्यावरच झाले आहे. नरेंद्र मोदींनी सातत्याने समाजाला तोडण्याची भाषा केली. लोकांना भडकावण्याचे काम केले …

Read More »

महाराष्ट्रात लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यासाठी शेवटचे २० मे रोजी मतदान

राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील आणि राज्यातील शेवटच्या टप्प्यातील १३ मतदार संघासाठी २० मे रोजी मतदान होत असून यामध्ये सर्व पात्र मतदारांनी प्राधान्याने आपल्या मतदानाचा महत्वपूर्ण अधिकार बजावून मतदानाची टक्केवारी वाढवावी, असे आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी केले. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत एस चोक्कलिंगम बोलत …

Read More »

पाचव्या टप्प्यात मुंबईतील ७४ लाख ४८ हजार मतदार बजावणार मतदानाचा हक्क

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही मतदारसंघात सोमवार २० मे २०२४ रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा यावेळेत मतदान होणार आहे. या मतदानाची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यात ७४ लाख ४८ हजार ३८३ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील, अशी माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. …

Read More »