Breaking News

Tag Archives: amit shah

लॉर्ड माऊंटबँटनचे ओएसडी म्हणतात जम्मू -काश्मीरचा प्रश्न नेहरूंमुळे नव्हेतर ब्रिटीशांमुळे राजकिय गुंतागुत केवळ ब्रिटीशांनी निर्माण केली

दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचा नारळ फोडताना भाजपाध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी देशाचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरला लागू असलेले ३७० कलम आणि ३५ ए हे कलम काढून टाकल्यामुळे हे राज्य पूर्णतः आता भारताचे झाले आहे. त्याचबरोबर नेहरूंच्या एका चुकीमुळे जम्मू आणि काश्मीरचा अर्धाभाग पाकिस्तानकडेच राहीला. …

Read More »

काँग्रेस आणि राष्ट्रवादी २५० जागा लढविणार तर ३८ जागा मित्रपक्षांना आघाडीचा संयुक्त जाहिरनामा जाहीर करणार - प्रवक्ते नवाब मलिक

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे जागा वाटप पूर्ण झालेले असून काँग्रेस १२५ आणि राष्ट्रवादी १२५ जागा लढविणार असून उर्वरीत ३८ जागा मित्रपक्षांसाठी सोडणार असल्याचे स्पष्ट संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देत आघाडीचा संयुक्त जाहिरनामा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »

मला अजून लय जणांना घरी पाठवायचय ! राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे राजकिय कुरघोडीचे संकेत

सोलापूर-मुंबईः प्रतिनिधी राज्यात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न दाखवित राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच काँग्रेसमधील अनेक आमदार, नेत्यांना भाजपाने गळाला लावत विरोधकांना निष्भ्रम करण्याचा प्रयत्न सुरु केला. मात्र मी काय म्हातारा झालो? अजून लय जणांना घरी पाठवायचय असे सांगत राजकिय कुरघोडीत आपणही मागे नसल्याचे सांगत आगामी विधानसभा निवडणूकीत तोडीसतोड उत्तर देणार असल्याचे स्पष्ट संकेत …

Read More »

मोदी, शाह आणि ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारल्यानेच राज ठाकरेंना नोटीस काँग्रेस प्रदेशाध्यक्ष थोरात यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सातत्याने सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात आवाज उठवला आहे. लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी सरकारचा पर्दाफाश केला होता. तसेच विरोधी पक्षांना एकत्रीत करून ईव्हीएम विरोधात जनआंदोलन छेडले आहे. मोदी, शाह यांच्या हुकुमशाही विरोधात ठाम पणे उभे राहिल्यामुळेच राज ठाकरे यांना ईडीने नोटीस पाठवली आहे. केंद्र सरकारच्या …

Read More »

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? येदीयुरप्पा की फडणवीस? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी पूरग्रस्त महाराष्ट्राला मदत देण्याबाबत केंद्र सरकार तर्फे पूर्णपणे अनास्था दिसून येत असून अद्यापपर्यंत केंद्र सरकारने महाराष्ट्राला कोणतीही मदत दिली नाही. विरोधी पक्षांच्या रेट्यामुळे नाईलाजाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कर्नाटकचा हवाई दौरा करत असताना कोल्हापूर, सांगलीच्या पूराचे हवाई पर्यटन केले. परंतु इतिहासात पहिल्यांदाच असे घडले की, महाराष्ट्रातल्या पूरस्थितींची …

Read More »

सुषमा स्वराज अंनतात विलीन वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास

नवी दिल्लीः प्रतिनिधी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांच्या पार्थिवावर दिल्लीतील लोधी रोड येथील स्मशानभूमीत अंत्यंसस्कार करण्यात आले. त्याआधी त्यांना शासकीय इतमामाप्रमाणे सलामीही देण्यात आली. सुषमा स्वराज यांच्या पार्थिवाला अखेरचा सलाम करताना त्यांच्या पतीचे आणि मुलीचे डोळे पाणावले होते. एवढंच नाही तर स्मशानभूमीत हजर असलेल्या प्रत्येकाचेच डोळे पाणावले. सुषमा स्वराज …

Read More »

जम्मू आणि काश्मीरचा स्वायततेचा दर्जा व वास्तव ३७० कलमाच्या माध्यमातून भाजपाचा जम्मू आणि काश्मीर राज्याकडे पाह्यण्याचा दृष्टीकोन

जम्मू आणि काश्मीर राज्याविषयीची चर्चा नेहमीच संपूर्ण देशभरात कधी जिहादी कारवायांमुळे, कधी दहशतवाद्यांनी लष्करी, निमलष्करी दलांवर केलेल्या हल्ल्यामुळे, तर कधी स्थानिकांकडून करण्यात येत असलेल्या दगडफेकीच्या घटनांमुळे होत असते. याशिवाय जम्मू आणि काश्मीर राज्याचा मुद्दा पाकिस्तानने आंतरराष्ट्रीयस्तरावर उपस्थित केल्यानंतर. ७०-८० च्या दशकात जम्मू आणि काश्मीरला भारताचा मुकूट (काटेरी) आणि दुसरे स्विझरलँड …

Read More »

घटनेतील ३७० वे कलम रद्द करण्याची तयारी दाखविल्याने मोदींची पोलादी छाती सिद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कौतुक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. या प्रस्तावामुळे एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करत असले तरी आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया देत हे कलम रद्द करण्याचे धाडस दाखवित …

Read More »

जम्मू व काश्मीरचे विभाजन आणि घटनेतून कलम ३७० कलम हटविण्याची शिफारस केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे राज्यसभेत निवेदन

नवी दिल्लीः प्रतिनिधी विशेष स्वायतत्तेचा दर्जा असलेल्या जम्मू व काश्मीर राज्याचे दोन विभाजन करण्याचा विचार केंद्र सरकारचा आहे. या राज्यातून लडाख आणि जम्मू काश्मीर राज्य असे दोन केंद्राशासित राज्य निर्माण करण्यात येणार असून यापैकी जम्मू काश्मीर राज्यात मंत्रिमंडळ राहणार असल्याचे निवेदन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज राज्यसभेत निवेदन करत …

Read More »

भाजपाचे सरकार कोणताही भेदभाव न करता जनतेची सेवा करेल प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी भाजपाने लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर आणि कामावर जिंकली. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपार कष्ट केले व त्याचे पक्षाला फळ मिळाले. मोदी सरकारने गेल्या पाच वर्षांत केलेल्या कामामुळे जनतेने विश्वास ठेवला. आपण खात्री देतो की, भाजपा आघाडी सरकारचे काम पारदर्शी असेल आणि हे सरकार कोणताही …

Read More »