Breaking News

Tag Archives: bjp

घटनेतील ३७० वे कलम रद्द करण्याची तयारी दाखविल्याने मोदींची पोलादी छाती सिद्ध शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कौतुक

मुंबईः प्रतिनिधी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत ऐतिहासिक घोषणा करत जम्मू काश्मीरला स्वतंत्र दर्जा देणारं वादग्रस्त ३७० कलम अंशत: हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत सादर केला. या प्रस्तावामुळे एकीकडे विरोधक या निर्णयाला विरोध करत असले तरी आज आपला देश पूर्णपणे स्वतंत्र झाला असल्याची प्रतिक्रिया देत हे कलम रद्द करण्याचे धाडस दाखवित …

Read More »

मुख्यमंत्री महोदय, चर्चेसाठी तारीख आणि वेळ ठरवा मुख्यमंत्र्यांचे आव्हान काँग्रेस प्रचार समितीप्रमुख नाना पटोलेंनी स्वीकारले

मुंबई : प्रतिनिधी मागील पाच वर्षात माझ्या सरकारने दुप्पट काम केले आहे. त्यावर कुठल्याही व्यासपीठावर चर्चा आणि वाद- विवाद करायला तयार असल्याचे आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विरोधकांना दिलेले आव्हान काँग्रेस नेते नाना पटोले यांनी स्विकारले आहे. तसेच या चर्चेसाठी आणि वाद-विवादासाठी मुख्यमंत्र्यांनी तारीख व वेळ ठरवावी असे प्रति …

Read More »

८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी शासनाने ८० वर्षे व त्यावरील राज्य शासकीय निवृत्तीवेतनधारक तसेच कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना ज्या महिन्यात त्यांची वयाची ८०/८५/९०/ आणि १०० वर्षे पूर्ण होतात त्या महिन्याच्या १ तारखेपासून वाढीव दराने निवृत्तीवेतन/ कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. वय वर्षे ८० ते ८५ …

Read More »

राज्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीची निम्मी फी भरली ६५० कोटीची रक्कम जमा केल्याची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये केल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या योजनेनुसार गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्यातील ४ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची निम्मी म्हणजे ५६० कोटीची फी भरल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे …

Read More »

निवडणूक न लढविणारे ईव्हीएमवर बोलतायत शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांचा राज ठाकरेंना टोला

मुंबईः प्रतिनिधी जे कधी घराच्या बाहेर पडले नाहीत, ते आता कोलकात्यापासून लोकांच्या फ्लॅटवर जाऊ लागले आहेत. या पत्रकार परिषदेतील काही नेते ईव्हीएम बाबत बोलत आहेत. त्यांनी कधीच निवडणूक लढवलेली नाही. ज्यांनी कधी निवडणूक लढवली नाही त्यांनी आधी निवडणूक लढवून दाखवावी. तसेच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत ज्यांनी निवडणूकच लढविली नाही त्यांनी …

Read More »

पक्षातील कुणी वेगळा निर्णय घेत असेल तर शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसमधील गयारामांना शरद पवारांकडून मोकळीक

साताराः प्रतिनिधी पक्षातील कुणी मंडळी जर काही वेगळा निर्णय घेत असतील, तर आमच्या त्यांना शुभेच्छा! असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी गयाराम आणि गयारामाच्या तयारीत असलेल्यांना लगावत राजकारणात कधी कधी असा प्रसंग येतो, त्याचा सामना करायचा मला अनुभव आहे. एक गोष्ट चांगली आहे, सरकार येणार नाही म्हणून ते …

Read More »

आधी नेत्यांना नाही तर त्यांच्या मुलांना पक्षात घेतलं नेते आपोआप आले मुख्यमंत्री फडणवीस यांचा पवारांच्या वक्तव्यावर खुलासा

मुंबईः प्रतिनिधी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे. धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने …

Read More »

भीम आर्मीच्या आंदोलनामुळे आदीत्य म्हणतात जनआर्शीवाद यात्रा अराजकिय निवडणूकीत पडसाद नको म्हणून शिवसेना 'बॅकफूटवर'

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जनआशीर्वाद यात्रेचे आय़ोजन करत प्रत्येक जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र सोलापूरातील वालचंद महाविद्यालयात जन आर्शीवाद यात्रेच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या आदीत्य ठाकरे यांच्या विरोधात भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. त्यामुळे शिवसेनेने बँकफूटवर येत ही यात्राच अराजकिय असल्याची …

Read More »

अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनो आधी पाच वर्षाचा हिशोब द्या जनतेला फसविल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका …

Read More »