Breaking News

Tag Archives: chandrakant patil

विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती योजनेत समानता आणण्यासाठी उच्चधिकार समिती राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना दिली जाते शिष्यवृत्ती

विविध शासकीय संस्थामार्फत सामाजिक घटकांच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या योजनांमध्ये एक समानता आणण्यासाठी आता सर्वकष धोरण निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने उच्चाधिकारी समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची समिती गठीत करण्यात आली असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. यासंदर्भात सामाजिक न्याय व …

Read More »

दिव्यांगासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत तातडीने प्रस्ताव तयार करा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सूचना

दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून याबाबतचा प्रस्ताव तातडीने तयार करावा,अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या. आज मंत्रालयात दिव्यांग बांधवांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेसंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. याबैठकीला आमदार बच्चू कडू, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकसचंद्र रस्तोगी,उपसचिव …

Read More »

मुलींना मोफत उच्च शिक्षणाबाबत अडचण आल्यास हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

नवीन शैक्षणिक धोरणानुसार (NEP) व्यावसायिक शिक्षणातील मुलींचे प्रमाण वाढावे आणि मुलींना समप्रमाणात शिक्षणाच्या व्यापक संधी उपलब्ध होण्यासाठी राज्य शासनाने मुलींना व्यावसायिक उच्च शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. कौटुंबिक आर्थिक परिस्थितीमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहण्याची शक्यता असलेल्या मुलींना या निर्णयामुळे निश्चितच मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वार्षिक उत्पन्न ८ लाख …

Read More »

कापसाचे हेक्टरी उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे मत

तीन हजार वर्षांपूर्वी भारताने वस्त्राद्योगाचे ज्ञान जगाला दिले. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी कापसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे …

Read More »

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांची फी भरण्याच्या निर्णयाची २०१७ पासून अंमलबजावणी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची विधान परिषदेत माहिती

बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या केवळ मुलींचीच नाही तर मुलांचीही १०० टक्के फी भरण्याबाबत शासनाने यापूर्वीच निर्णय घेतला आहे. त्यानुसार ७ ऑक्टोबर, २०१७ रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून त्याची अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे दिली. चंद्रकांत पाटील पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ४४ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी सोडा नवे कर्जही नाही न्यायालयाच्या निकालाचा राज्य सरकारकडून अवमान

राज्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. मात्र राज्य सरकारने कोल्हापूरातील ४४ हजार शेतकऱ्यांना अपात्र ठरवित कर्जमाफी देण्यास नकार दिला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने शेतकऱ्यांना कर्ज माफीचा निर्णय प्रलंबित ठेवत चालू वर्षासाठी पीक कर्ज देण्याचे आदेश दिले. मात्र त्यावर २०१८ सालापासून राज्य सरकारने कोणतीच कार्यवाही …

Read More »

लिफ्टमधून उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, तर चंद्रकांत पाटील थेट दालनात विधिमंडळ अधिवेशाच्या पहिल्याच दिवशी या भेटीने राजकीय वर्तुळात खळबळ

लोकसभा निवडणूकीपाठोपाठ राज्य विधानसभा निवडणूकीची तयारी जवळपास सर्वच राजकिय पक्षांनी सुरु केली आहे. त्यातच नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूकीत भाजपाचा दारून पराभव झाला. त्यामुळे भाजपाकडून सातत्याने जूना जोडीदार म्हणून उद्धव ठाकरे यांना सातत्याने चुचकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. त्यात आज शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख …

Read More »

चंद्रकांत पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडत अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचा मुलगा…

लोकसभा निवडणूकीच्या काही महिने आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घेत ७० हजार कोटी रूपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख भोपाळ येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केला. त्यानंतर काही दिवसातच शरद पवार यांचे पुतणे तथा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपाबरोबर राज्यातील सत्तेत सहभागी झाले. त्यास आता जवळपास सहा महिने झाले असले …

Read More »

‘स्वयंम’च्या धर्तीवर दर्जेदार अभ्यासक्रमासाठी पोर्टलची निर्मिती

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. त्यासाठी विद्यापीठांनी उत्तम आणि दर्जेदार अभ्यासक्रमांसह पोर्टलची निर्मिती करावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. आज मंत्रालयात मंत्री पाटील यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर …

Read More »

क्रिस्प व एनएसडीसी संस्था आणि उच्च व तंत्र शिक्षण विभागात सामंजस्य करार

नवनवीन कौशल्ये आणि भारतीय मूल्ये, पाठांतर करण्यापेक्षा प्रत्यक्ष अनुभवाने शिक्षण घेतले तर माणूस समृद्ध होतो. तरुणांना वर्गखोल्यातून बंदिस्त करण्यापेक्षा त्यांना थेट समाज प्रवाहाशी जोडून घेणे गरजेचे आहे. यासाठी बहुविद्याशाखीय अभ्यासक्रमांना जोडून ‘इंटर्नशिप’ हा उपक्रम सुरू करण्यात येत असून, शासकीय विभागांमध्ये विद्यार्थ्यांना तालुका, जिल्हास्तरावर इंटर्नशिप करता येईल. यासाठी ‘सेंटर फॉर रिसर्च …

Read More »