Breaking News

Tag Archives: chief minister

अजित पवार यांचा हसत खोचक टोला, रिकाम्या खुर्च्याही या दोघांकडे… मंत्रिमंडळ विस्तारावरून लगावला टोला

राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार येवून एक महिना झाला. तरी अद्याप राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. मात्र तरीही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना टोला लगावला. यावेळी अजित पवार बोलताना म्हणाले, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निधी वाटपावरून दिली ‘ही’ ग्वाही जनहिताची कामे थांबणार नाहीत

पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी. विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते …

Read More »

विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्याचा प्रमुखच नियम तोडत असेल तर… शेतकऱ्यांना मात्र दुसरा प्राधान्यक्रम

विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहे. याला महत्व न देता मुख्यमंत्री स्वतःच्या सत्काराला प्रथम प्राधान्यक्रम देत आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नाला दुसरा प्राधान्यक्रम देऊन त्याकडे दुर्लक्ष करत सत्कार घेण्यात मुख्यमंत्री मश्गुल आहेत हा असंवेदनशीलतेचा कळस असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केला. मुख्यमंत्री मिरवणूका, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठविणार राज्यातील प्रत्येक लाभार्थ्यास पत्र केंद्र-राज्याच्या योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहचवा

नव्या सरकारकडून प्रधानमंत्र्यांनी देखील मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या आहेत. विशेषत: केंद्र आणि राज्य भागीदारीच्या योजना अगदी शेवटच्या घटकांपर्यंत पोहचणे आवश्यक आहे. त्यामुळे सरकार म्हणून नागरिकांपर्यंत पोहोचवा, आपली कार्यक्षमता वाढवतांना एकमेकांमध्ये समन्वय ठेवावा. तसेच योजनांमध्ये लोकांचाही सहभाग वाढवावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. राज्यातील …

Read More »

नव्या सरकार मध्ये माहिती व जनसंपर्क विभागाच्या गाड्यांच्या पेट्रोल-डिझेलचे झाले वांदे पैसेच मिळेनासे झाल्याने १५ दिवसाहून १४ गाड्या बंद

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार स्थानापन्न होवून एक महिना झाला. मात्र राज्याचा गाडा चालविण्यासाठी मंत्रिमंडळ विस्तारच न झाल्याने या सरकारच्या प्रसिध्दीचे काम पाहणाऱ्या माहिती व जनसंपर्क विभागाला आवश्यक तो निधी मिळेनासा झाला. त्यामुळे या विभागाच्या गाड्यांचे पेट्रोल-डिझेलचेही वांदे होवू लागल्याची धक्कादायक माहिती पुढे …

Read More »

कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेता संकेत सरगरला ३० लाखाचे पारितोषिक मुख्यमंत्र्यांकडून पुरस्काराची घोषणा

बर्मिंगहॅम येथे सुरू असलेल्या कॉमनवेल्थ स्पर्धांमध्ये रौप्यपदक विजेती कामगिरी करणाऱ्या सांगली येथील संकेत सरगर या वेटलिफ्टरला राज्य शासनाकडून तीस लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर करत असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज औरंगाबाद येथे केली. कॉमनवेल्थ स्पर्धेत देशासह महाराष्ट्राच्या नावावर रौप्य पदकाची मोहोर उमटविणाऱ्या सामान्य कुटुंबाची पार्श्वभूमी असलेल्या संकेत सरगर या खेळाडूची …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन; जीएसटी, प्लास्टिक बंदी, एपीएमसी कायद्याचे प्रश्न सोडविणार राज्याच्या औद्योगिक विकासासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न

राज्याच्या विकासात उद्योग क्षेत्राची भूमिका महत्त्वपूर्ण असून औद्योगिक विकासासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या विकासाचा लाभ सर्वसामान्य माणसाला होण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिली. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे आयोजित राज्यस्तरीय व्यापार महापरिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राच्या विकासात व्यापार क्षेत्राचा …

Read More »

औरंगाबादेतील मराठवाडा आढावा बैठकीत मुख्यंमत्री शिंदेंनी दिले ‘हे’ निर्देश औरंगाबादेत क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या प्रत्येकाला वेळेत मदत मिळावी यासाठी मराठवाड्यातील बाधित शेतकरी, नागरिकांना तातडीने आवश्यक ते सहाय्य करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. तसेच औरंगाबाद शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या योजनेच्या दुरुस्तीसाठी २०० कोटींचा निधी देण्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. विभागीय आयुक्त कार्यालयात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अतिवृष्टी, …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सवाल, राऊतांना आमंत्रण दिलंय का? ईडीचे नाव घेऊन येत… नोटीस आली म्हणून कोणी येत असाल तर आमच्याकडे येवू नका

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांच्या घरावर ईडीची धाड पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राऊत यांची चौकशी होऊ द्या अशी असे सांगत जे काही होईल ते कळेल असे स्पष्ट केले. त्यानंतर स्वतः राऊतांनी ट्वीट करत ईडी कारवाई झाली तरीही शिवसेना सोडणार नाही, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर भाजपासह बंडखोर शिंदे गटावर …

Read More »

संजय राऊत यांच्यावरील धाडीवरून मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,चौकशी होऊ द्या… त्यातून जे पुढे येईल ते तुम्हाला कळेलच

पत्रावाला चाळ प्रकरणी तीन वेळा समन्स बजावूनही चौकशीला हजर राहिले नाहीत म्हणून आज सकाळी ईडीने संजय राऊत यांच्या मैत्री या बंगल्यावर धाड टाकत त्यांची चौकशी सुरु केली. जवळपास साडे नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीची भाजपासह शिंदे गटाने स्वागत केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत विचारण्यात आले …

Read More »