Breaking News

Tag Archives: congress

अशोक चव्हाण मुख्यमंत्री फडणवीसांना म्हणतात शिबीरे घ्या पीक विम्याच्या तक्रार निवारणासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र

मुंबई : प्रतिनिधी पीक विम्याची नुकसान भरपाई न मिळाल्याच्या बहुसंख्य शेतकऱ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी राज्य सरकारने गावोगावी शिबिरांचे आयोजन करावे, अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले असून पीक विमा योजनेसंदर्भात राज्यभरातून शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत आहेत. पिकांचे प्रचंड …

Read More »

अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

महाजनादेश यात्रा काढणाऱ्यांनो आधी पाच वर्षाचा हिशोब द्या जनतेला फसविल्याचा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी भाजप-शिवसेना सरकारने पाच वर्षात काहीही काम केले नसल्यामुळेच यात्रा काढून न केलेल्या कामाची दवंडी पिटण्याची वेळ त्यांच्यावर आलेली आहे. या सरकारने राज्यातील जनतेची दिशाभूल करुन केवळ फसवणूकच केली आहे. या फसवणुकीचा हिशोब त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेला द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर यांनी केली. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेवर टीका …

Read More »

राष्ट्रवादीचे राजे, पिचड, नाईक आणि काँग्रेसच्या कोळंबकरांचे राजीनामे भाजप प्रवेशाचा कार्यक्रम लवकरच

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी समजूत काढूनही सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी आपल्या आमदाराकीचा राजीनामा दिला. त्याच्यासोबत राष्ट्रवादीचे वैभव पिचड, ऐरोलीचे आमदार संदीप नाईक आणि काँग्रेसचे आमदार कालीदास कोळंबकर यांनी आमदारकीचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केले. विशेष म्हणजे यापैकी वैभव पिचड, संदीप नाईक आणि …

Read More »

गहूंजे बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपींच्या फाशीला विलंब कोणामुळे ? दिरंगाई करणाऱ्यांवर कारवाईची विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी पुण्यातील गहूंजे येथील बलात्कार व हत्या प्रकरणातील दोन दोषींना सुनावलेल्या फाशीची अंमलबजावणी करण्यात अक्षम्य दिरंगाई केल्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाला फाशी रद्द करुन जन्मठेप द्यावी लागणे, हे राज्य सरकारचे मोठे अपयश आहे. फाशीच्या अंमलबजावणीस दोन वर्ष घालवणारे प्रशासन झोपा काढत होते का? असा संतप्त सवाल करत सरकारने तात्काळ चौकशी …

Read More »

पुणे विद्यापिठाच्या वसतीगृहात विचार स्वातंत्र्याची गळचेपी माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांना सरकारविरोधी चळवळींमध्ये सहभागी होण्यास निर्बंध घातल्याने विचार स्वातंत्र्याची गळचेपी होणार असून, ही सरकारचीच दडपशाही असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. पुणे विद्यापिठाने २६ जुलै २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रकात सदरहू प्रतिबंध लादण्यात आले आहेत. यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवताना अशोक चव्हाण म्हणाले …

Read More »

काँग्रेस आमदार कोळंबकर यांचा राजीनामा मंगळवारी भाजपा प्रदेश कार्यालयात प्रवेश होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील इनकमिंग वाढलेले असतानाच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील विद्यमान आमदारांनी भाजप प्रवेशासाठी आपापल्या पक्षाचे राजीनामे देण्याचा सिलसिला सुरु केला आहे. या यादीत आता वडाळा विधानसभेचे आमदार कालिदास कोळंबकर यांचा समावेश झाला असून त्यांनी सोमवारी मध्यानानंतर राजीनामा दिला. राजीनामा देत असल्याचे पत्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना …

Read More »

माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे …

Read More »

मतांच्या जोगव्यासाठी यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी दौरा करा मुख्यमंत्री फडणवीस यांना काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा उपरोधिक सल्ला

मुंबई : प्रतिनिधी संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. राज्याच्या बहुतांश भागात खरीपाची पेरणीही झाली नाही. अशा परिस्थितीत दुष्काळग्रस्तांना मदत करण्याऐवजी सत्ताधारी भाजप शिवसेनेचे नेते मतांचा जोगवा मागण्यासाठी राज्यव्यापी यात्रा काढून शेतक-यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत. या नेत्यांनी प्रचार यात्रा काढण्याऐवजी दुष्काळी भागाचा दौरा करावा असा उपरोधिक सल्ला देत म्हणजे त्यांना …

Read More »

एमएमआरडीएच्या हद्दीत आता पालघर ते रायगड पर्यंत वाढ अधिसूचनेच्या ठरावास विधानसभेची मान्यता

मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशाला लागून असलेल्या पालघर, रायगड, वसई, पेण, खालपूर, अलिबागच्या उर्वरीत भागाचा सुनियोजित विकास करण्यासाठी या सर्व भागांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात समाविष्ट करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. याविषयीचा अधिसूचना प्रस्तावाचा ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला असता त्यास भाजप सदस्यांसह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सदस्यांनी सुधारणा सुचवित …

Read More »