Breaking News

Tag Archives: congress

मंत्रीमंडळ आहे की अली बाबा आणि ४० चोरांची टोळी?

गिरीष बापट यांची हकालपट्टी करण्याची काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची मागणी मुंबईः प्रतिनिधी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीष बापट यांनी मंत्रीपदाचा गैरवापर करून नियमांची पायमल्ली करणा-या रेशन दुकानदारांना अभय देत आहेत. असा ठपका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ठेवला आहे. तरीही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अद्याप बापट यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी …

Read More »

मुंबई महानगरात ९ लाख बोगस मतदार

कारवाईचे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे आश्वासन मुंबईः प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात जवळपास ९ लाख बोगस मतदार असून या बोगस मतदारांची नावे मतदार यादीतून काढून टाकण्याची मागणी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरूपम यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्विनीकुमार यांच्याकडे केली. त्यावर या ९ लाख बोगस मतदारांची नावे तपासून काढून …

Read More »

भाजपने डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला?

डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव असल्याचा काँग्रेसचा आरोप मुंबई : प्रतिनिधी मागच्या दाराने डान्स बार पुन्हा सुरु करणे हा सरकारचा कुटील डाव आहे. सरकारने न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली नाही असा घणाघाती आरोप करून डान्सबार निवडणुकीकरिता किती निधी गोळा केला? याचे स्पष्टीकरण भाजपने द्यावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश …

Read More »

दुसऱ्याला विचारून काम करणाऱ्या मंत्र्याने अपयशी कारभाराचा विचार करावा

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची उपरोधिक टीका मुंबई : प्रतिनिधी आपल्या विभागात काय काम करायचे? हे ही दुस-या मंत्र्यांना विचारणा-या मंत्र्यांने कर्नाटक सरकारच्या भवितव्याचा विचार करण्यापेक्षा आपल्या अपयशी कारभाराचा व त्यामुळे महाराष्ट्राच्या झालेल्या नुकसानीचा विचार करावा असा टोला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी जलसंधारण मंत्री राम …

Read More »

देशात सत्ता परिवर्तनाचे वारे

विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे प्रतिपादन नागपूर : प्रतिनिधी भाजप-शिवसेनेच्या केंद्र व राज्य सरकारने केलेल्या विश्वासघातामुळे देशभरातील जनता संतप्त असून,नुकत्याच झालेल्या तीन राज्यांच्या निवडणुकीत सत्तापरिवर्तन करून मतदारांनी आपला संताप व्यक्त आला. आगामी निवडणुकींमध्ये देखील परिवर्तनाचे वारे वाहणार असून, या सरकारच्या लोकविरोधी कारभाराचा पर्दाफाश करण्यासाठी काँग्रेस पक्षाची जनसंघर्ष यात्रा संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असल्याचे …

Read More »

मिशेल आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धी असल्यानेच मोदींचा आकांडतांडव

काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांचा आरोप मुंबई : प्रतिनिधी आपल्या उद्योगपती मित्रांसाठी राफेल तथा अन्य व्यावसायिक प्रकरणात प्रधानमंत्री मध्यस्थी योजना लागू करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या व्यवसायात कोणीही प्रतिस्पर्धी नको म्हणून आकांडतांडव करत आहेत. मिशेल मामा आणि मोदी मामा हे व्यावसायिक प्रतिस्पर्धीच आहेत. त्यामुळेच मोदींची बिनबुडाची आगपाखड सुरु आहे, अशी घणाघाती …

Read More »

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रेची सुरुवात नागपूरातून

प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्यासह प्रमुख नेत्यांचा सहभाग मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा गुरुवारपासून नागपूर विभागात सुरु होणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातारण निर्माण झाले आहे. जनसंघर्ष यात्रेचा हा पाचवा टप्पा असून यापूर्वी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस आणि समविचारी आघाडीला निवडणूकीमध्ये चांगले यश मिळणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठकीनंतर प्रफुल्ल पटेल यांना आशावाद  मुंबई : प्रतिनिधी आगामी लोकसभा निवडणूकांची तयारी करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारसाहेबांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक सुरु आहे. काँग्रेस पक्ष आणि समविचारी पक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीमध्ये समाविष्ट व्हावेत यादृष्टीने आमची चर्चा सुरु आहे. आम्हाला खात्री आहे की, येणाऱ्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रामध्ये …

Read More »

चंद्रकांत दादा, तुमच्यासोबत शिवसेना राहिल का ते बघा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा पलटवार  मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस आणि समविचारी पक्षांची आघाडी निश्चित आहे त्याची चिंता तुम्ही करु नका आधी तुमच्यासोबत तुमचा सहकारी पक्ष शिवसेना रहातो का ते आधी बघा असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना दिले. भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा …

Read More »

ऑगस्टाऐवजी आत्महत्या, दुष्काळ, भीमा कोरेगांवच्या दंगलीवर बोलावे

मुख्यमंत्र्यांचे आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असल्याची चव्हाण यांची टीका मुंबई : प्रतिनिधी राज्यात १७ हजारांपेक्षा जास्त शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्याच्या मंत्रीमंडळातील निम्म्यापेक्षा जास्त मंत्र्यावर घोटाळ्यांचे आरोप आहेत. भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. भीमा कोरेगाव दंगल, संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे, सनातनचा बॉम्ब निर्मिती कारखाना या सगळ्या विषयांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी कधी …

Read More »