Breaking News

Tag Archives: congress

सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र सतत अग्रेसर होता. देशातील एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी एक तृतियांश गुंतवणूक महाराष्ट्रात यायची. परंतु, भाजप-शिवसेनेच्या काळात महाराष्ट्रातील गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरले असून, यंदा सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर घसरला आहे. भाजप शिवसेना सरकारच्या कार्यकाळात महाराष्ट्राची अधोगती झाली असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले …

Read More »

काँग्रेसच्या राज्यव्यापी जनसंपर्क अभियानाची नांदेडमधून सुरुवात जनविरोधी भाजप सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्याचे चव्हाण यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी विश्वासघातकी,जुलमी व भ्रष्ट केंद्र आणि राज्य सरकारला सत्तेतून बाहेर खेचण्यासाठी काँग्रेस पक्षाने जनसंपर्क अभियानाची सुरुवात केली असून राज्यव्यापी अभियानाचा प्रारंभ राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष खा.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नांदेडमधून आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी करण्यात आला. यावेळी  खा.अशोकराव चव्हाण यांनी केंद्र व राज्य सरकारवर …

Read More »

नोटबंदीची दोन वर्ष आणि पंतप्रधान मोदी यांच्या घोषणा दोन वर्षातील घोषणा आणि त्यातील फोलपणावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी लिहिलेला लेख

दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक निर्णय जाहीर केला. जो अगदी अनपेक्षित होता. त्यांनी असे जाहीर केले की ५०० आणि १००० रूपयांच्याचलनी नोटा रद्द करण्यात येत आहेत. त्यांच्याच भाषेत सांगायचे तर उद्यापासून ते ‘एक कागज का तुकडा’ होणार आहेत. लक्ष्मीपूजन होणाऱ्या ह्या देशात ही  भाषा कितपत योग्य आहे हा तर मुद्दा आहेच, मात्र दोन वर्षांनंतर ह्या धमकी …

Read More »

विधानसभा-लोकसभेच्या निवडणूका एकत्रित घेणार ? जनतेचे जनमानस जाणून घेण्यासाठी कंत्राटी नोकर भरतीची सरकारची जाहीरात

मुंबईः प्रतिनिधी संसदेच्या लोकसभा सभागृहाची मुदत येत्या मे २०१९ रोजी संपत आलेली आहे. त्यामुळे देशभरातील सर्वच राजकिय पक्षांकडून लोकसभेच्या निवडणूकीची पूर्व तयारी सुरु केलेली असताना केंद्रातील भाजप सरकारसोबतच राज्यातील विधानसभेची निवडणूक घेण्याच्या हालचाली पक्षीय पातळीवर सुरु आहे. मात्र महाराष्ट्रात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणूकांना सामोरे जाण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत आहे. …

Read More »

राज्य सरकारच्या कारभाराची २०० पोस्टर्स मुंबईत लावणार मुंबई काँग्रेस काढणार कारभारांची वाभाडे

मुंबईः प्रतिनिधी मागील चार वर्षात राज्यातील फडणवीस सरकारने घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षात जनतेला मिळालेले अच्छे दिन यांचे वास्तव दर्शविणारे तब्बल २०० पोस्टर्स मुंबई काँग्रेसकडून लावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. राज्यातील बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, तसेच गुंतवणूक आणण्याच्यादृष्टीने मेक इन …

Read More »

अखेर राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ सरकारकडून जाहीर

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील २६ जिल्ह्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून ११२ तालुक्यात गंभीर तर ३९ तालुक्यात मध्यम दुष्काळ जाहीर करण्यात आला. यासंदर्भात राज्याच्या महसूल विभागाने शासनादेश जारी केला आहे. राज्यात ३५५ तालुके असून यापैकी सांगली जिल्ह्यातील जत, कवठे-महांकाळ, खानापूर, आटपाडी, तासगांव तर सातारा जिल्ह्यातील माण- दहिवडी, सोलापूर जिल्ह्यातील …

Read More »

फडणविसांना रामाचा अवतार जाहीर करा; आपसूकच रामराज्य अवतरेल! राधाकृष्ण विखे पाटील यांची भाजपच्या सुराज्य यात्रेवर सडकून टीका

जालना: प्रतिनिधी मागील ४ वर्ष महाराष्ट्रात ‘कुराज्य’ असताना राज्य सरकारच्या चौथ्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘सुराज्य यात्रा’ काढताना भाजपला लाज कशी वाटत नाही? नशीब यात्रेला ‘सुराज्य यात्रा’ असे नाव दिले. ‘राम राज्य यात्रा’ म्हटले नाही. मोदी विष्णूचा अकरावा अवतार असल्याचे भाजपने जाहीर केलेलेच आहे. आता फडणवीस रामाचा अवतार असल्याचे जाहीर करून …

Read More »

मराठा मोर्चाचे २५ नोव्हेंबरपासून आमदार-खासदाराच्या घरासमोर आंदोलन आबासाहेब पाटील आणइ रमेश केरे-पाटील यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी भाजप सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन दिले आहे कि येत्या १५ नोव्हेंबर २०१८ पर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल परंतु आम्हाला सरकारकडून कोणतीही हालचाल किंवा सकारात्मक कृती दिसत नाही. भाजप सरकार आणि मुख्यमंत्री यांच्यावर आता आमचा विश्वास राहिलेला नाही. आम्हाला जी तोंडी व लेखी आश्वासने …

Read More »

व्हायरस लागलेले सरकार ‘फॉरमॅट’ मारून ‘डिलीट’ करा! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांचे आवाहन

नांदेड : प्रतिनिधी विजय मल्ल्या, निरव मोदी सारखे अनेक जण सरकारच्या सर्व नियम-कायद्यांना वाकुल्या दाखवत हजारो कोटी रूपये घेऊन पळून गेले. त्यांचे या सरकारला काहीही करता आले नाही. पण शेतकऱ्यांना मदत करण्याची वेळ आली की या सरकारला अटी व निकष आठवतात. या सरकारला अटी अन् निकषांचा ‘व्हायरस’ लागला आहे. त्यामुळे …

Read More »