Breaking News

Tag Archives: congress

मोदींनी जाहिर केलेली दुष्काळमुक्त गावे ८ दिवसांत दुष्काळसदृश कशी झाली? राज्यातील ३१ हजार ०१५ गावांतील पाणी पातळीत घट म्हणजे घोटाळा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी शासनाच्या म्हणण्यानुसार, जलयुक्त शिवार अभियानाला एकूण ७ हजार ७८९ कोटी रुपयांचा खर्च आला. त्यात लोकसहभाग १० टक्के देखील नाही. त्यामुळे जलयुक्त शिवार घोटाळा दडविण्याकरिता सरकार गरीब शेतकऱ्यांच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …

Read More »

तर मुख्यमंत्र्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते लोकसभा विरोधी पक्षनेते खा. मल्लिकार्जून खर्गे यांची टीका

औसा : प्रतिनिधी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एखाद्या शेतकरी कुटुंबात जन्माला आले असते तर त्यांना दुष्काळाचे दुःख उमगले असते. पण दुर्दैवाने अवघा महाराष्ट्र दुष्काळाने होरपळून निघाला असताना मुख्यमंत्र्यांना तो दिसून येत नाही. म्हणूनच राज्यात दुष्काळ नव्हे तर दुष्काळ सदृश्य परिस्थिती जाहीर केली जाते, अशी बोचरी टीका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे महासचिव आणि …

Read More »

जलयुक्त शिवार राज्यातला सर्वात मोठा घोटाळा प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी यंदा झालेल्या कमी पावसामुळे राज्याच्या अनेक भागात भीषण दुष्काळी परिस्थिती आहे. खरीपाची पिके वाया गेली आहेत. रब्बीची पेरणीही झाली नाही. पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. जनावरांना चारा नाही. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय तरीही सरकार राज्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती आहे असे सांगून जनतेची फसवणूक करत आहे. राज्यात दुष्काळसदृश्य नाही …

Read More »

सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी म्हणजे उद्धव ठाकरे ! विरोधी पक्षनेते विखे पाटील यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी केवळ सत्तेत कायम राहण्यासाठी म्हणून शिवसेनेने आपली अब्रू गमावली असून, त्‍यांचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणजे सर्वाधिक गोंधळलेला राजकारणी असल्याची बोचरी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्‍याच्‍या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना …

Read More »

पंतप्रधानांनी दुष्काळमुक्त म्हणून जाहीर केलेल्या २५ हजार गावांची नावे जाहीर करा जलयुक्त शिवार नव्हे भ्रष्टाचाराचा मालयुक्त शिवार असल्याचा सचिन सावंत यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे बोलताना महाराष्ट्रातील १६ हजार गावे दुष्काळमुक्त झाली आहेत व ९ हजार गावे दुष्काळ मुक्त होण्याच्या मार्गावर आहेत असे जाहीर केले. परंतु राज्यात जवळपास २०१ तालुक्यातील किमान २० हजार गावांमध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली दुष्काळमुक्त गावांची यादी जाहीर …

Read More »

राज्यातील २५२ तालुक्यातील पाणी पातळीत मोठ्या प्रमाणावर घट भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचा अहवाल

मुंबईः प्रतिनिधी यंदाच्या वर्षी मराठवाडा, विदर्भात पावसाने म्हणावी अशी हजेरी लावली नाही. मार्च महिना यायला अद्याप चार महिन्याचा कालावधी अद्याप शिल्लक राहीलेला असतानाच या दोन्ही विभागातील विहीरी, नद्या, नाले कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनत चालला आहे. त्यातच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या अखत्यारीत असलेल्या भूजल सर्वेक्षण आणि विकास …

Read More »

सत्तेतून बाहेर पडा, मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा ! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील शिवसेनेवर बरसले

फैजपूर : प्रतिनिधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याचा विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर शब्दांत समाचार घेतला असून, अगोदर या दळभद्री सरकारमधून बाहेर पडा; मगच अयोध्येला जाण्याची नौटंकी करा, असे शिवसेनेला सुनावले आहे. काँग्रेस पक्षाच्या जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा फैजपूर येथे प्रारंभ करताना ते बोलत होते. …

Read More »

कॉंग्रेसने त्यांच्या १२ पराभूत जागा द्याव्या आम्ही निवडून आणू भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांची तयारी

मुंबईः प्रतिनिधी आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीच्या दृष्टीने आम्ही कुठलीही आघाडी केली नाही. मात्र भाजप-सेनेला पराभूत करण्यासाठी मी काँग्रेसला आघाडी करण्यासाठी एकत्र बसू असे सांगितले होते. मात्र तेच आले नाहीत. त्यामुळे आम्ही एमआयएमने दिलेला हात स्विकारला. तसेच २००४ ते २०१४ पर्यंत काँग्रेस पक्ष ज्या २२ जागांवर पराभूत होत होता. त्यापैकी …

Read More »

भाजप-सेनेच्या सरकारला उखडून फेकण्यासाठी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा जळगावच्या फेजपूरमधून होणार सुरूवात

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा उद्या म्हणजेच गुरूवारपासून जळगाव जिल्ह्यातल्या फेजपूर येथून सुरू होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व …

Read More »

शरद पवारांनी खोटं बोलू नये भारिप नेते अँड. प्रकाश आंबेडकरांचा शरद पवारांवर पलटवार

मुंबईः प्रतिनिधी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी वगळता काँग्रेस आणि एमआयएमशी आघाडी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्यावरून भारिपवर टीका केली. त्याचा खरपूस समाचार घेत १९९७-९८ साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसचे अध्यक्ष सीताराम केसरी यांच्या बरोबर झालेल्या समझोत्यानुसार निवडणूक लढविली. त्यावेळी झालेल्या समझोत्यात शरद पवार हे …

Read More »