Breaking News

Tag Archives: congress

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर …

Read More »

घोटाळेबाजांना शासन होईपर्यंत काँग्रेसकडून पाठपुरावा सुरुच ठेवणार काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नुकतीच चिक्की घोटाळा प्रकरणात क्लीनचीट दिली. त्यामुळे राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार हे ‘क्लीन-चीटर’ सरकार असून चिक्की खरोदीत ज्यांनी भ्रष्टाचार केला, ज्यांच्या विरोधात तक्रार केली. त्यांच्याच कडून लाचलुचपत विभागाने अभिप्राय घेत चोराच्या साक्षीवर  मंत्र्याला क्लीन चीट दिल्याचा …

Read More »

एससी-एसटीचा अखर्चीक विकास निधी राखीव ठेवण्याचा कायदा करा शिवसेना, काँग्रेसच्या मागासवर्गीय आमदारांची मागणी तर भाजपाच्या आमदारांची पाठ

नागपुर : संजय बोपेगांवकर राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आणि आदीवासी यांच्या विकासाकरीता विविध योजना सरकारकडून राबविण्यात येतात. या योजनांच्या अंलबाजवणीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात असलेला विकासनिधी राज्यकर्त्ये इतर कामाकरीता पळवापळवी करत असल्याने मागास व आदीवासी समाजाची विकास कामे ऱखडली जात असल्याने भारतीय नियोजन आयोगाच्या अपेक्षा प्रमाणे अखर्चीक निधी आंध्र व कर्नाटक सरकारप्रमाणे राखून ठेवण्यासाठी …

Read More »

जमिन नसलेल्याला आणि शिवसेनेच्या आमदाराला कर्जमाफीचा लाभ विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्याकडून सरकारची पोलखोल

नागपूर : प्रतिनिधी राज्य सरकारकडून कर्जमाफी योजनेत पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळावा यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन स्वरूपात केल्याचा दावा राज्य सरकारने केला. तरीही कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका आमदाराचे नाव अर्ज भरलेला नसताना कर्जमाफीच्या यादीत आहे. तर उस्मानाबादमधील एक गुंठा जमिन नसलेल्या मुलाला कर्जमाफीची रक्कम मिळाल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील …

Read More »

बोंडअळी आणि तुडतुड्याच्या प्रादुर्भाव प्रश्नी अध्यक्ष विरूध्द विरोधक लक्षवेधी पुढे ढकलणे नवीन नसल्याचा अध्यक्ष बागडे यांचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना उत्तर

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतीवर बोंडअळी आणि तुडतड्याचा प्रादुर्भाव झाल्याप्रश्नी मांडण्यात आलेली लक्षवेधीला राज्य सरकारकडून अद्याप उत्तर आलेले नसल्याने पुढे ढकलण्यात आल्याची विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी जाहीर केले. त्यावर विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत या लक्षवेधीवर आताच चर्चा घेण्याची मागणी केली. त्यामुळे अध्यक्ष बागडे विरूध्द विरोधक असा सामना विधानसभेत पाह्यला …

Read More »

मदत न करणाऱ्या सरकारची कोणतीही बीले भरू नका जनआक्रोश मोर्चाच्या सभेत शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्याची घोषणा देत सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी तातडीने मदत करावीशी वाटत नाही. कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही त्यांच्याकडून अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. यांच्या हृदयाला पाझर कसा …

Read More »

राज्य सरकारच्या विरोधात विरोधकांच्या हल्लाबोल मोर्चाला सुरुवात काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे), सपा, माकप सहभागी

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक महत्वाच्या प्रश्नावर कॉंग्रस, राष्ट्रवादी काँग्रेससह समविचारी पक्षांच्यावतीने राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चाची सुरुवात नागपूर येथील दिक्षाभूमीवरून सुरुवात झाली. या मोर्चामध्ये कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्यासह अनेक वरीष्ठ नेते सहभागी झाले होते. या मोर्चात शेकाप, आरपीआय (कवाडे) गट, समाजवादी …

Read More »

विरोधकांचा १२ डिसेंबरला विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नेतृत्व करणार

नागपूर : प्रतिनिधी सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली १२ डिसेंबर २०१७ रोजी विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री …

Read More »

नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान मिळण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आणि राज्य व केंद्र सरकारच्या कारभारवरून भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सातत्याने टीका सुरु केली होती. मात्र त्याची दखल भाजपश्रेष्ठींकडून घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी कंटाळून भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देत घरवापसी अर्थात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून …

Read More »