Breaking News

Tag Archives: covid-19

मास्कबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिला “हा” अल्टीमेटम निर्बंध नको तर शिस्त पाळा, मास्क वापरा

कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज येथे केले. …

Read More »

राज्यातील कोरोना लाटेसंदर्भात आणि मास्कमुक्तीबाबत आरोग्य मंत्री टोपे म्हणाले… घाईगडबडीत निर्णय घेणे अडचणीचे

मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील रूग्णसंख्येत चांगलीच घट आली आहे. तसेच मृतकांच्या संख्याही नियंत्रित राहीलेली आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, आता राज्यातील कोरोनाची तिसरी लाट आटोक्यात आली असून हा चिंतेचा विषय नक्कीच नाही. पण तिसरी लाट संपली हे माझं वैयक्तिक असल्याचा खुलासा करायला विसरले …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंचा इशारा, “बेसावध राहू नका, ऑक्सीजन वापराचे प्रमाण वाढतेय” जिल्हा प्रशासनांनी लसीकरण वाढवावे, सुविधा तयार ठेवा-मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मराठी ई-बातम्या टीम गेल्या दोन दिवसांपासून कोविड रुग्णसंख्या कमी होत आहे असे जे चित्र निर्माण होत आहे ते बरोबर नसून दैनंदिन रुग्ण वाढ झपाट्याने होतच असून जानेवारी शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारी पहिल्या आठवड्यात रुग्णालयांमध्ये रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढेल असे सार्वजनिक आरोग्य विभागाने आपल्या सादरीकरणात सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »

केंद्राची कोरोना रूग्णांसाठी नवी नियमावली : फक्त ३ दिवसात डिस्जार्च डिस्जार्च करताना चाचणीची आवश्यकता नाही

मराठी ई-बातम्या टीम देशातील वाढत्या कोरोना आणि ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाने बाधित रूग्णाला किती दिवस रूग्णालयात ठेवायचे आणि किती दिवसानंतर डिस्जार्च द्यायचा यासंदर्भात नवी नियमावली जारी केली आहे. त्यानुसार आता फक्त तीन दिवसात रूग्णाला डिस्जार्च देण्यास सांगण्यात आले आहे. डिसेंबर २०२१ अखेरीस पासून देशभरातील जवळपास सर्वच राज्यात …

Read More »

अजित पवार मास्कबद्दल म्हणाले, त्या डिझाईनवाल्याचा उपयोग नाही सर्जिकल आणि एन-95 मास्कच वापरा

मराठी ई-बातम्या टीम कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेनंतर घराबाहेर जायचे असेल तर मास्क वापरणे राज्य आणि केंद्र सरकारने बंधनकारक केले आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आणि कंपन्यांनी वेगवेगळ्या डिझाईनचे कापडी मास्क बाजारात आणले आहेत. मात्र हे मास्क लोकांच्या खरोखरीच उपयोगाचे आहेत का याबाबत नेहमीच चर्चा होत होती. मात्र त्यावर ठामपणे आणि …

Read More »

नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे कोरोनाबाधित दोघांनी लोकांना काळजी घेण्याचे केले आवाहन

मराठी ई-बातम्या टीम ठाण्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे ठाण्याचे खासदार राजन विचार यांना आज कोरोनाची लागण झाली असून त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी तपासणी करून घ्यावी असे आवाहन या दोन्ही नेत्यांनी केले आहे. काल दिवसभर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे न्हावा शेव्हा प्रकल्पाचे काम पाहण्यासाठी न्हावा …

Read More »

जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख म्हणतात, जर ही गोष्ट केली तर कोरोनामुक्त होवू जगातील असमानता नष्ट केल्याशिवाय सर्वांना लस मिळणार नाही

मराठी ई-बातम्या टीम जवळपास दोन वर्षे झाली जगात कोरोनाने केलेला प्रवेश काही केल्या परत जात नाही. त्यामुळे कोरोनाला पराभूत करण्यासाठी जवळपास सर्वच देशांनी वेगवेगळ्या पध्दतीने प्रयत्न सुरु केलेले असले तरी त्यात म्हणावे तसे यश येताना दिसून येत नाही. त्यामुळे जगभरात अद्यापही भीतीचे वातावरण आहे. यापार्श्वभूमीवर डब्लूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेचे …

Read More »

कोविड, ओमायक्रोनचा पार्श्वभूमीवर आजपासून आणखी कडक निर्बंध लागू: जाणून घ्या निर्बंध लग्न समारंभ, सामाजिक- धार्मिक कार्यक्रमांसाठी ५० लोकांनाच परवानगी

मराठी ई-बातम्या टीम राज्यात कोविड आणि ओमायक्रोनचा प्रसार होऊ नये या साठी सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आता लग्न समारंभ, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक व राजकीय कार्यक्रमांसाठी उपस्थित राहणाऱ्यांची मर्यादा ५० केली असून अंतिम संस्कारासाठी केवळ २० लोकांना मुभा देण्यात आली आहे. राज्य शासनाच्या वतीने जारी परिपत्रकात सदर माहिती देण्यात आली असून …

Read More »

राज्यात ओमायक्रॉन आणि कोरोना बाधितांच्या संख्येत मोठ्याप्रमाणावर वाढ ओमायक्रॉनचे ३१ तर कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळून आले

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात असल्याचे दिसून येत होते. तर ओमायक्रॉनचे रूग्ण एकदं-दुसरा आढळून येत होता. परंतु नववर्ष स्वागतानिमित्त खरेदीच्या आणि अन्य कारणासाठी घराबाहेर पडणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरीकांकडून काहीप्रमाणात निष्काळजीपणा होत आहे. यापार्श्वभूमीवर आज कोरोनाचे १६४८ रूग्ण आढळले असून यापैकी सर्वाधिक रूग्ण ८९६ …

Read More »

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ख्रिसमस सणासाठी गृह विभागाने जाहीर केले हे नियम साध्या पद्धतीने साजरा करण्यासंदर्भात

मराठी ई-बातम्या टीम नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांनी आरोग्याच्या दृष्टीने मोठ्या प्रमाणात एकत्र न येता या वर्षी देखील नाताळचा सण पूर्णत: खबरदारी घेऊन साध्या पध्दतीने साजरा करण्यासंदर्भात शासनाच्या गृह विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये “ओमायक्रॉन” ही नवीन विषाणू प्रजाती आढळून आल्यामुळे संसर्गाचा नवीन …

Read More »