Breaking News

Tag Archives: dy cm ajit pawar

धनंजय मुंडेंची प्रकृती स्थिर: मुख्यमंत्र्यांनी फोनवरून केली चौकशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांची प्रकृती चांगली असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली ते उपचार घेत आहेत. सतत प्रवास, दगदग यातून त्यांना भोवळ येऊन शुद्ध हरपली व त्यानंतर तातडीने त्यांना ब्रीच कँडी मध्ये दाखल करण्यात आले. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसला, हे वृत्त चुकीचे आहे; डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला …

Read More »

अजित पवारांचे आदेश, शिक्षक-शिक्षतेकर कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठी यंत्रणा सुधारा जिल्हा परिषदेच्या तसेच खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनावरील प्रश्नी बैठकीत निर्देश

मुंबईसह राज्यातील शिक्षक, शिक्षकेतरांचे पगार उशीर होत असल्याची तक्रार आज आमदार कपिल पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे केली. आता कोविडची स्थिती पूर्ववत झाल्यामुळे निदान यापुढील काळात तरी पगार वेळेवर करण्याबाबत अजितदादांनी तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश शिक्षण व वित्त विभागास दिले. राज्यातील शिक्षकांच्या वेतनप्रश्नांसदर्भात उपमुख्यमंत्र्यांच्या दालनात बैठक झाली. राज्यातील जिल्हा …

Read More »

अजित पवारांनी केली मुंडे भगिनींवर टीका त्यावर माजी मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या… योग्य उमेदवार निवडूण द्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे जे जरी बिनधास्त बोलण्याच्या शैलीसाठी प्रसिध्द असले तरी त्यांच्या अधून-मधून राजकीय कोट्या करणारा आणि मिश्किल स्वभाव सर्वश्रुत आहे. नुकताच त्यांचा बीड जिल्ह्यात एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात त्यांनी माजी मंत्री पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे यांच्यावर विकास कामांच्या प्रश्नावरून टीका केली. त्यावर भाजपाच्या माजी …

Read More »

अजित पवार म्हणाले, जल्लोष करणारे आंदोलक कर्मचारी नंतर सिल्व्हर ओकवर का? बरंच काही ऐकायला आलंय पण त्याबाबत बोलणे योग्य नाही

मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनप्रश्न अंतिम निकाल दिल्याच्या दुसऱ्या दिवशी काही एसटी कर्मचारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावर हल्लाबोल करत चपला आणि दगडफेक केल्याची घटना घडली. या घटनेवर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केल्यानंतर शरद पवारांचे …

Read More »

अजित दादा म्हणाले, आम्ही पवारसाहेबांशी बोललो त्यांनी आम्हाला सांगितले… काहीजण जाणीवपूर्वक बातम्या पसरवून समाजामध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न

शरद पवार व पंतप्रधान यांची दिल्लीत भेट झाली. त्यानंतर पवारसाहेबांनी पत्रकार परिषद घेऊन भेटीचे कारण स्पष्ट केले आहे त्यामुळे त्या भेटीचा पुनरुच्चार मी करावा असं मला वाटत नाही असे सांगतानाच नवाबभाई व अनिल देशमुख यांच्याबाबत विचारले नाही असे जे काही तुमचे प्रश्न आहेत त्याबाबत आम्ही पवारसाहेबांशी बोललो. पवारसाहेबांनी सर्व विषयावर …

Read More »

अजित पवार यांची ग्वाही, पोलीसांच्या सोयी-सुविधा व घरांसाठी अधिकचा निधी शिर्डी विमानतळाच्या विकासासाठी १५० कोटींचा निधी व ग्रीन फिल्डचा दर्जा

पोलीस दलाच्या आधुनिकीकरणासह पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना सुसज्ज घरे मिळवून देण्यासाठी शासन कटीबद्ध आहे‌. यासाठी पोलीसांच्या सोयी-सुविधांसाठी जुलै महिन्यातील अधिवेशनात अधिकचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री अजित पवार यांनी आज येथे केले. शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिर्डी पोलीस ठाणे व शिर्डी येथील पोलीस अंमलदारांच्या ११२ …

Read More »

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले अधिकाऱ्यांना, आपल्यावर सीबीआयची नजर मी सांगितले तरी ऐकू नका पण...

राज्याचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आणि १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु झाले असून आता नव्याने निविदा, निधी वाटप यासंदर्भात प्रशासकिय पातळीवर बैठकांचे सत्र सुरु झाले. मात्र या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट शब्दात निर्देश देत म्हणाले की, सीबीआयची नजर आपल्यावर असून मी सांगितले तरी ऐकू नका असे …

Read More »

जमीन वाटपाच्या प्रक्रियेला होणार सुरुवात कोयना धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावा- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कोयना धरण प्रकल्पग्रस्तांच्या अद्ययावत संकलन यादीचे बहुतांश काम पूर्ण झाले असून येत्या १ मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनापासून पात्र प्रकल्पग्रस्तांच्या जमीन वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. कोयना धरणाच्या वर्धापनदिनी (१६ मे) प्रातिनिधीक स्वरुपात प्रलंबित पात्र प्रकल्पग्रस्तांना जमिनीचे प्रत्यक्ष वाटप करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज …

Read More »

अजित पवारांचा इशारा, जर १० रूपये दिले नाही तर पुढच्या वर्षी… साखर कारखान्यांना दिला इशारा

जर कोणत्या साखर कारखान्याने ऊसतोड कामगारांच्या निधीसाठी टनामागे १० रुपये दिले नाही, तर पुढच्या वर्षी त्याच्या कारखान्याला ऊस जाणार नाही, असा दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साखर कारखान्यांना दिला. तसेच सरळ देत नसतील तर बोट वाकड करावं लागतं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. ऊसतोड कामगारांच्या जीवावर मोठे होता आणि त्यांच्यांसाठी …

Read More »

ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी पुस्तक देणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची ग्वाही

ऊसतोड कामगारांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांच्या मुलांच्या हातात कोयत्याऐवजी शैक्षणिक साहित्य यावे असा प्रयत्न महामंडळाच्या माध्यमातून करण्यात येणार असून त्यांच्या शिक्षणासाठी शासन सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. सामाजिक न्याय भवन परिसरातील लोकनेते गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाच्या  दुरदृष्यप्रणालीद्वारे  उदघाटन प्रसंगी  ते बोलत होते. कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक …

Read More »