राज्य सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक पार पडली. या बैठकीत कुळगांव-बदलापूर मधील मंजूर विकास आराखड्यातील चार एकर जमीन वीज उपकेंद्र उभारणीसाठी देणार, नाबार्डकडून मच्छिमारांच्या मुलभूत सोयी सुविधांकरिता ६१ कोटी २४ लाख, मुंबईत आयईएस स्कील टेक विद्यापीठ होणार, वैद्यकीय शिक्षण, नर्सिंग, आरोग्य सेवा सशक्तीकरणासाठी जायकाकडून ३ हजार ७०८ कोटींची सहाय्यता, आकांक्षित …
Read More »आशा भोसले यांचा स्वर कायमचा शांत, राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना शोक उद्या होणार अंत्यसंस्कार
ख्यातनाम आयकॉनिक पार्श्वगायिका आशा भोसले यांचे आज रविवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मृत्यूचे वृत्त समजताच राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी शोक व्यक्त करत श्रध्दांजली वाहिली जो भी है बस यही एक पल है’ हे गीत त्यांच्या जीवनाचे तत्वज्ञान होते’ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो २बीच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण व पॉड टॅक्सी प्रकल्पाचे ई भूमीपूजन संपन्न मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्थेचे शहर बनविण्याचा संकल्प
मुंबईला देशातील सर्वाधिक सुगम आणि एकात्मिक वाहतूक व्यवस्था असलेले शहर बनविण्याचा संकल्प असून मल्टी-मोडल इंटिग्रेशनच्या माध्यमातून नागरिकांना अखंड आणि सुलभ प्रवासाचा अनुभव देण्यावर राज्य शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई मेट्रो लाईन २ ब (डी.एन. नगर ते मंडाले) चा पहिला टप्पा देशभक्त …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९चा पहिला टप्पा सुरू मुंबई-मीरा-भाईंदर प्रवास होणार जलद
दहिसर पूर्व ते काशीगाव या ४.७ किलोमीटर लांबीच्या मार्गिकेवर चार स्थानकांसह आजपासून मेट्रो सेवा सुरू झाली आहे. यामुळे मुंबई आणि मीरा-भाईंदर हा प्रवास जलद होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते, “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” राज्यव्यापी अभियानाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री, आरोग्य मंत्र्यासह मंत्रिमंडळाची उपस्थिती
जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या ग्रामीण भागाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी आणि ग्रामीण जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा त्यांच्या उंबरठ्यावर उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या “माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव” या महत्त्वाकांक्षी अभियानाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज शुभारंभ करण्यात आला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आवाहन, बिनविरोध नसला तरी सुनेत्राताईंना विक्रमी विजय मिळवा अजितदादांच्या कार्याची पोचपावती भव्य विजयातून मिळणार
महाराष्ट्राच्या जडणघडणीत माजी मुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार या निवडणूक लढवत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा असली तरी कोणताही कार्यकर्ता गाफील राहता कामा नये. निवडणूक लागलीच तर ती झुंजारपणे लढून सर्व रेकॉर्ड मोडीत काढत विक्रमी …
Read More »बारामती पोटनिवडणुकीत महायुती सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी निवडणूक बिनविरोध करण्याचे उपमुख्यमंत्री शिंदेंचे इतर सर्व पक्षांना आवाहन
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडून सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही जागा दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झाली आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व पक्षांनी सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देत ही निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले आहे. ठाणे येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, अशा …
Read More »एकनाथ शिंदे यांची स्पष्टोक्ती, धम्म म्हणजे जीवनाचा मार्ग; बुद्धांच्या विचारांतूनच समाज परिवर्तन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 'बुद्ध रत्न' पुरस्कार प्रदान
“बौद्ध हा केवळ धर्म नसून तो एक व्यापक सामाजिक विचारसरणी आहे. तो फक्त श्रद्धेचा विषय नाही, तर परिवर्तनाची चळवळ आहे. ही केवळ धार्मिक क्रांती नसून सामाजिक आणि राजकीय क्रांती होती. बुद्धांचे विचार हे प्रवचनापुरते मर्यादित नसून आचरणासाठी आहेत असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सम्राट अशोक जयंतीचं औचित्य साधून …
Read More »शशिकांत शिंदे यांची हमी, ऑपरेशन तुतारी होणार नाही याची हमी सरकारला शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही
अतिवृष्टी आणि अवकाळी पाऊस नुकसानीची भरपाई सरकारकडून अजूनही मिळाली नाही,केंद्राकडून इतर राज्यांना मदत झाली आपल्य राज्याला मदत मिळाली नाही, राज्य सरकार शेतकऱ्यांविषयी गांभीर्य नाही, हे आम्हाला सभागृहात दिलेल्या उत्तरातून समजले आहे, एकही मंत्री अवकाळी पाऊस जिथं झाला तिथं गेले नाहीत, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी …
Read More »शिंदे शिवसेनेकडून राज्यातील लोकसभा मतदार संघांच्या संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने कंबर कसली
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेनेने आतापासूनच कंबर कसली आहे. शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने पक्षाने राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघांसाठी संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मुंबईत सहा लोकसभा मतदार संघ आणि ठाणे लोकसभेची जबाबदारी शिवसेनेचे संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे. …
Read More »
Marathi e-Batmya