Breaking News

Tag Archives: eknath shinde

आदित्य ठाकरे यांच्या रावणराज च्या टीकेला मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, त्यांच्या जन्मा… बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसीय अयोध्या दौऱ्यावर जात आहेत. एकनाथ शिंदे खासदार, आमदार, नगरसेवक आणि इतर पदाधिकारी अयोध्येला जाणार आहे. यावरून शिवसेना ( ठाकरे गट ) आमदार आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. रावणराज्य चालवणारे अयोध्येला चालले आहेत, अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

मुंबई उच्च न्यायालयाचा पर्यावरणवाद्यांना दिलासा, आरे आंदोलकांवरील गुन्हे रद्द पर्यावरण वाद्यांकडे कोणतेही आक्षेप साहित्य नाही

मेट्रो ३ प्रकल्पाचा आरे कारशेडचा मुद्दा गेल्या तीन वर्षात प्रचंड तापला. तीन वर्षांपूर्वी महाराष्ट्रात युती सरकार होतं. तेव्हा सत्ताधारी शिवसेनाच भाजपच्या विरोधात उभी राहिली होती. मेट्रोचं कारशेड आरे कॉलनीत होऊ नये. आरेतील झाडे तोडली जाऊ नयेत यासाठी सत्ताधारी शिवसेना पक्षदेखील आक्रमक झालेला बघायला मिळाला. याशिवाय पर्यावरण प्रेमींनी तर प्रचंड मोठं …

Read More »

कांदा अनुदानप्रश्नी मुख्यमंत्री शिंदेंना पत्र लिहीत छगन भुजबळ यांनी केली ‘ही’ मागणी अट शिथिल न झाल्यास ९०% शेतकरी या अनुदान योजनेपासून वंचित राहणार

शासनाने कांदा अनुदान योजनेचा लाभ देताना पिक पेऱ्याची अट घातली आहे. यामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहत आहे.पिक पेऱ्याची अट वगळून शेतकऱ्यांना सरसकट या योजनेचा लाभ द्यावा अशी मागणी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा उपरोधिक टोला, जे लोक घरात बसायचे ते आता रस्त्यावर येऊ लागले धास्ती घेतली की नाही माहित नाही पण कामाला लागले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ९ एप्रिल रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असून तिथे ते रामलल्लांचं दर्शन घेणार आहेत. तसेच तिथे ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील भेट घेणार आहेत. त्याआधी शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्ते आज ठाण्यावरून विशेष रेल्वेने अयोध्येला रवाना झाले. या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः …

Read More »

जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यात आजपासून ‘सुंदर माझा दवाखाना’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा

राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या. आजपासून राज्यात आठवडाभर ‘सुंदर माझा दवाखाना’ हा उपक्रम सुरू होत असून सामान्यांना दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा देण्याचे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी यानिमित्ताने …

Read More »

कार्यकर्त्यांच्या वन्समोअरवर आदित्य ठाकरे म्हणाले, असे लोक ‘ओनली वन्स’ होतात… गद्दार गँगला मदत करणाऱ्या चिलट्यांचे जेलभरो करणार

शिवसेना (ठाकरे गट) युवा सेनेच्या नेत्या रोशनी शिंदे यांना सोमवारी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्यानंतर पोलिसांनी योग्य कारवाई केली नाही, असा आरोप करत महाविकास आघाडीच्या वतीने आज ठाण्यात जनक्षोभ मोर्चा काढण्यात आला. तीनही पक्षाचे अनेक नेते, पदाधिकारी ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात एकत्र जमले आणि त्यांनी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी …

Read More »

नारायण राणे यांची उध्दव ठाकरेंवर टीका, ‘मोले घातले रडाया…’ ओळीतून फटकारत महाफडतूस माणूस तोंडाला आवर घालावा, अन्यथा परिणाम भोगण्यास तयार रहावे

अडीच वर्षांच्या सत्ताकाळात राज्याला अधोगतीकडे नेणा-या,कायदा व सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवणा-या, गुन्हेगारांना मदत करणा-या निष्क्रीय माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल यापुढील काळात अनुचित उद्गार काढू नये , अन्यथा परिणाम भोगण्यास तयार राहावे असा इशारा ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय सूक्ष्म , लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सात निर्णयांना मान्यता नागपूर मेट्रो, देवनार डंपिंग ग्राऊंडवर वीज निर्मिती प्रकल्प, महावितरणच्या कर्जाला हमी यासह अन्य महत्वाच्या प्रस्तावांना मान्यता

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नागपूर मेट्रो, देवनार डंपिंग ग्राऊंडवर वीज निर्मिती प्रकल्प, महावितरणच्या कर्जाला हमी, नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास मंजुरी, अकृषी विद्यापीठातील शिक्षक समकक्ष पदांना सहावा, सातवा वेतन आयोग, उच्चशिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी परीस स्पर्श आदी महत्वाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. नौदलाच्या सेलर इन्स्टिट्यूटसाठी भाडेपट्टीच्या नूतनीकरणास …

Read More »

वाळू उत्खननातील ठेकेदारी संपुष्टात, सरकारचे उत्पन्न वाढणार, नागरिकांना स्वस्त दरात रेती अनधिकृत उत्खननाला आळा घालणाऱ्या नव्या रेती धोरणास राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

राज्यातील नागरिकांना स्वस्त दराने रेती मिळण्यासाठी तसेच अनधिकृत रेती उत्खननाला आळा घालण्यासाठी नवे सर्वंकष सुधारित रेती धोरण तयार करण्यात आले असून, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या धोरणास मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या नव्या धोरणामुळे राज्यातील वाळू उत्खनन क्षेत्रातील माफिया राज संपुष्टात येण्याची शक्यता व्यक्त करण्यात …

Read More »

अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीसाठी राज्य सरकारने या निकषात केली दुरूस्ती शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

“सततचा पाऊस” ही राज्य शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती घोषित करुन शेती पिकांच्या नुकसानीकरिता मदत देण्यात यावी, असा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार आता शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ‘अतिवृष्टी’ ही राज्य शासनाने घोषित केलेली आपत्ती असून महसूल मंडळामध्ये उपलब्ध करुन देण्यात आलेल्या स्वयंचलित …

Read More »