Breaking News

Tag Archives: eknath shinde

आता शिंदे-फडणवीस सरकारची सर्वसामान्यांसाठी ‘शासकिय योजनांची जंत्री’ शासकीय योजनांची जत्रा पोहचणार शेवटच्या व्यक्तीपर्यंत

सामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती, अर्ज केल्यावर लाभ कसा मिळतो, कुठे अर्ज करावा…कागदपत्रे काय जोडावीत…याची माहिती नसते. यामुळे काहीजण शासकीय योजनांपासून वंचित राहतात. याचा विचार करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय योजना गतिमान आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘शासकीय योजनांची जत्रा’ हा उपक्रम राज्यभर सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत आज …

Read More »

उच्च न्यायालयाच्या समन्सवर संजय राऊत यांचे तिरकस उत्तर, जनतेला हे माहित… न्यायालयात कायदेशीर उत्तर देऊ

सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या ४० आमदार आणि १० अपक्ष आमदारांना घेऊन जाण्यामागे नेमके कोणतं कारण आहे. यावरून बरीच चर्चा झडली. या दरम्यानच्या काळात राज्यातील सर्वसामान्य जनतेच्या घराघरात पोहोचलेली ५० खोके… या घोषणेवरून शिंदे गटाने न्यायालयाचे दार ठोठावले. त्यावर ठाकरे गटाचे उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांना …

Read More »

महिलेच्या मृत्यूनंतर शिंदे सरकारला आली जाग, नागरिकांसाठी वेळा राखून ठेवण्याचे दिले आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून सर्व अधिकारी-मंत्र्यांनाही केल्या सूचना

हिंदूत्ववादी आणि सावरकरवादी प्रेमात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या व्यस्ततेमुळे काल तीन व्यक्तींनी मंत्रालयाच्या परिसरात येऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. यामध्ये एका अपंगाचा तर दोन महिलांचा समावेश होता. परंतु यातील एका महिलेचे आज उपचारा दरम्यान निधन झाल्याची माहिती बाहेर आली. त्यानंतर हिंदूत्ववादी आणि सावकरवादाच्या प्रेमात आखंड बुडालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला अखेर काही काळासाठी का …

Read More »

स्वा.सावरकरांच्या प्रेमापायी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री सह्याद्रीवर, मात्र न्यायासाठी ३ चा मंत्रालयाच्या परिसरात आत्महत्येचा प्रयत्न काल दिवसभरात एक अपंगासह दोन महिलांचा मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न अखेर एकीची प्राण ज्योत मालवली

राज्यात सध्या सावकरप्रेमी आणि हिंदूत्ववादी विचारसरणीचे सरकार असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र ज्या हिंदूत्ववाद्यांचे सरकार असल्याचा प्रयत्न शिंदे-फडणवीस सरकारकडून करण्यात येतो त्याच हिंदू धर्मिय तीन व्यक्तींकडून आपल्या न्याय मागण्यांसाठी मंत्रालयासमोर काल आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यातील एका महिलेचा …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री शिंदे यांचा सवाल, म्हणजे नेमके काय करणार? सावरकरांचा अपमान झाल्या तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प

काल मालेगांव येथे झालेल्या जाहिर सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी स्वा.सावरकर प्रश्नावरून इशारा दिला. त्या इशाऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मंत्री मणिशंकर अय्यर यांचा फोटो दाखवत उध्दव ठाकरे यांना उद्देशून म्हणाले, वीर सावरकरांचा अपमान झाला तेव्हा यांचे नेते मूग गिळून गप्प होते, …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितले महाविकास आघाडीच्या विजयाचे रहस्य, भाजपाची खरी ताकद… निष्ठावान शिवसैनिक भाजपा विरोधात

शिवसेना भाजपासोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपाला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपाची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपाने केले. त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपाविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपाला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »

मनसेप्रमुख राज ठाकरे, मुख्यमंत्री शिंदे यांच्यात एकतास चर्चा, बैठकीनंतर निवडणूकीसाठी… खटले मागे घेण्याबाबतचा निर्णय तपासून घेण्यात येईल -मुख्यमंत्री

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांची मालेगावात आज सभा झाली. उद्धव ठाकरे यांनी या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर सडकून टीका केली. उद्धव ठाकरे यांची मालेगावात अनेक वर्षांनी ही सभा झाली. त्यामुळे संपूर्ण राज्याचं या सभेकडे लक्ष लागलेलं होतं. या दरम्यान मुंबईत अचानक राजकीय घडामोडींना वेग आला. महाराष्ट्राचे …

Read More »

संजय राऊत यांची खोचक टीका, कांद्याला फेकून द्यायचय, तर ढेकूण चिरडायला तोफेची गरज नाही गुलाबरावला रस्त्यावर फेकून द्यायचाय

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज रविवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे जाहीर सभा झाली. या सभेतून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर जोरदार टीकास्र सोडले. राऊत यांनी आपल्या भाषणातून अप्रत्यक्षपणे मालेगावचे आमदार दादा भुसे यांचा उल्लेख ढेकूण असा केला. तर सुहास कांदे यांना बाजारातील कांद्याची उपमा दिली. …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा भाजपासह शिंदे गटाला खोचक टोला, किमान आडनावाप्रमाणे तरी जागा द्या… २०२४ निवडणूकीत आपण यांना फेकून दिलं नाही तर हुकुमशाहीत रहावं लागेल

मालेगांव येथील जाहिर सभेत बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर टीकास्त्र सोडत म्हणाले, तुम्हाला खरी शिवसेना बघायची असेल तर या इथे मालेगावात या तुम्हाला पाह्यला मिळेल. माझं पक्ष नाव, निवडणूक चिन्ह चोरलंत. पण माझ्यावर आणि बाळासाहेब ठाकरेंवर जीवापाड करणारी माणसं तुम्ही हिरावून घेऊ शकला नाहीत. त्यामुळे …

Read More »

कॅग अहवालावर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून चौकशी… भाजपा आमदार अमित साटम यांच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीसांचे उत्तर

मुंबई महापालिकेच्या कारभारात पारदर्शकता नाही. तसंच निविदा न काढताच कामं देण्यात आली असे मुद्दे कॅगच्या अहवालात नमूद करण्यात आले आहेत. आमदार अमित साटम यांनी कॅगच्या अहवालातले मुद्दे वाचून दाखवण्याची विनंती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली. त्यानंतर अध्यक्षांच्या संमतीने देवेंद्र फडणवीस यांनी अहवालातल्या मुद्द्यांचं वाचन केलं. त्यानंतर पुढे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »