Breaking News

Tag Archives: eknath shinde

नाना पटोलेंचा सवाल, विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व खा. संजय राऊत प्रकरणी चौकशी करून दोषींना अद्दल घडवा

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर पाळत ठेवली जात असून त्यांचा घातपात करण्याचा डाव समोर आला आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मारण्याची सुपारी देण्यात आल्याचे समजते. असे प्रकार राज्यात वाढत असून विरोधकांना संपवण्याचा सत्ताधारी पक्षांचा डाव आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विचारला …

Read More »

जयंत पाटील यांचा इशारा,… तरुणांच्या पदरी निराशा टाकण्याचे पाप करू नका शिंदे-फडणवीस सरकारला दिला इशारा

MPSC अभ्यासक्रमात अचानक होणारा बदल हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे. सरकारने याची नोंद घ्यावी आणि बेरोजगारीने बेजार झालेल्या तरुणांच्या पदरी पुन्हा निराशा टाकण्याचे पाप सरकारने करू नये अशी जोरदार इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला. MPSC परीक्षेसाठीचा नवीन पॅटर्न २०२३ ऐवजी २०२५ पासून लागू करावा या …

Read More »

कपिल सिबल यांचा सवाल, अपात्रतेची टांगती तलवार असताना मुख्यमंत्री पदाची शपथ कशी? विधिमंडळातील सदस्यांच्या अपात्रतेसंदर्भात न्यायालय निर्णय घेऊ शकत का? सिबल म्हणाले होय

शिवसेनेतील बंडखोरीनंतर शिवसेना पक्ष नाव आणि चिन्ह धनुष्यबाण मुळ पक्षातून बाहेर पडलेल्या गटाला दिल्याने अनेक कायदेशीर वाद निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठासमोर युक्तीवाद करताना ठाकरे गटाचे वकील कपिल सिबल यांनी युक्तीवाद करताना म्हणाले, राज्यघटनेतील १० व्या परिशिष्टानुसार मुळ पक्षातून बाहेर पडलेल्यांना स्वतंत्र गट म्हणून मान्यता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, राज्यात २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करणार सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचा कणेरी मठ येथे शुभारंभ

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध योजना व उपक्रम आखून त्याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यात सेंद्रिय शेतीचे प्रमाण वाढण्यासाठी प्रयत्न केले जात असून २५ लाख हेक्टरवर सेंद्रिय शेती करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाच्या शुभारंभ प्रसंगी केले. कणेरी मठ येथे २० ते …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा खोचक टोला, आमच्याकडे रद्दी वाढली म्हणून ती कागदपत्रे आयोगाला… निवडणूक आयोगाच्या एककल्ली कारभारावरून साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगाने ठाकरे गटाने सादर केलेल्या कागदपत्रांची पाहणी न करताच शिवसेना पक्ष नाव आणि पक्ष चिन्ह एकनाथ शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यानंतर निवडणूक आयोगाचा निकाल एकांगी असून त्या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे जाहिर केले. आज सोमवारी २० फेब्रुवारी रोजी शिवसेना भवनात आयोजित …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, याचा सामना आत्ताच केला नाही तर देशात हुकूमशाहीचा… धनुष्यबाण आणि शिवसेना नाव चोरण्याचा पूर्वनियोजित कट

नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहिर केल्यानंतर काल भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना धोकेबाज असल्याची टीका करत भाजपासोबत निवडणूका लढवून काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत जाऊन सत्ता स्थापन केल्याने आम्ही ठाकरेंना रस्त्यावर …

Read More »

ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या निकाला विरोधात घेतली सर्वोच्च न्यायालयात धाव तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकारः मात्र नियमित याचिकेसोबत यावरही सुनावणी घ्या

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय घेतल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाबाबत सर्वचस्तरातून संशय व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाने निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालाच्या विरोधात आज सकाळी याचिका दाखल करत या प्रकरणी तातडीने सुनावणी घ्यावी अशी मागणी केली. त्यावर न्यायालयाने तातडीने सुनावणी घेता येत नसल्याचा निर्णय दिला. …

Read More »

उध्दव ठाकरेंचा मोदींना इशारा, केंद्राची भीक नकोय, मुंबई ही कष्टकऱ्यांची यांचा डोळा मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर

शिंदे-फडणवीस सरकार स्थानापन्न झाल्यानंतर मुंबईतील विविध विकास कामांच्या शुमारंभ करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बँकांमध्ये पैसा ठेवून विकास होत नसतो असे मोठे विधान केले. या वक्तव्याचा धागा पकडत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे म्हणाले, यांचा डोळा मुंबई महापालिकेने विकास कामे करून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, गड-किल्ल्यांचा इतिहास जपण्याचे काम शासन करेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशिर्वादानेच आपल्याला शिवसेना हे नाव मिळाले

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ राज्याचे नव्हे तर देशाचे, जगाचे आदर्श असून त्यांनी उभारलेले गडकोट, किल्ले आपला इतिहास आणि संपत्ती असल्याने ती जपण्याचे काम योग्यप्रकारे करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. किल्ले शिवनेरीवर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिवजन्मोत्सव उत्साहात साजरा झाला, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री …

Read More »

संजय राऊतांचा खळबळजनक आरोप, शिवसेना नाव आणि धनुष्यबाणासाठी २००० कोटींचा सौदा जे लोक न्याय विकत घेतात त्यांच्याबद्दल काय बोलणार

शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या अपात्रतेविषयीची याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आणि दुसऱ्याबाजूला केंद्रीय निवडणूक आयोगासमोर शिवसेना आणि धनुष्यबाण कोणाचा याप्रश्नी बंडखोर एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांनी केलेल्या दाव्यावर सुनावणी सुरु होती. मात्र शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांच्या गटाला देण्याचा निकाल दिला. यावरून राजकिय क्षेत्रासह सर्वसामान्य …

Read More »