Breaking News

Tag Archives: eknath shinde

आरटीओत नव नियुक्त होत असलेल्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री शिंदेंनी दिले नियुक्ती पत्र नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या सहायक मोटर वाहन निरीक्षक मुख्य परीक्षा २०२० मधील शिफारसपात्र २३३ उमेदवारांपैकी प्रातिनिधिक स्वरुपात १३ उमेदवारांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देवून रस्ते अपघात व मृत्यू कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा …

Read More »

राज्यपाल कोश्यारी राज्याला उद्देशून बोलताना म्हणाले, बलशाली महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प प्रजासत्ताक दिन मुख्य शासकीय समारंभात राज्यपालांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताकाच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य शासन काम करीत आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी याप्रसंगी राज्याला …

Read More »

अजित पवारांचे समर्थन करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडून आता मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेची री… मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पाठोपाठ फडणवीसांकडून जूनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याचा सुतोवाच

नुकत्याच झालेल्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यातील शिक्षकांकडून जूनी पेन्शन लागू करण्याची मागणी करण्यात येत असल्याचा मुद्दा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांकडून विधान परिषद आणि विधानसभेत उपस्थित करण्यात आला. या मुद्यावर राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जून्या पेन्शन योजनेबाबत अजित पवार यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत ही योजना लागू …

Read More »

दावोसमध्ये मुख्यमंत्री शिंदे नेमके ७६ की २८ तास उपस्थित? केसरकर-सामंताच्या दाव्यात विसंगती आदित्य ठाकरेंच्या टीकेनंतर मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यातील उपस्थितीबाबत मंत्र्यांच्या दाव्यात विसंगती

दोन वर्षाच्या कोरोना कालावधीनंतर स्वित्झर्लंडमधील दावोस येथे भरलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत हे गेले होते. दावोस येथून परतल्यानतर मुख्यमंत्री शिंदेंनी १ लाख ४० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सामंजस्य करार केल्याची माहिती दिली. मात्र या गुंतवणूकीबाबत आणि मुख्यमंत्र्यांनी तेथे जावून नेमके किती तास काम …

Read More »

दावोसवरून आदित्य ठाकरेंची मुख्यमंत्र्यांवर टीका, ३३ देशांना मेल पाठवला असता तरी कळले असते… अबब! मुख्यमंत्र्यांचा दावोसमध्ये २८ तासांत ४० कोटींचा खर्च

शिवसेना नेते युवा सेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस दौऱ्यावरून खोचक टीका केली. यावेळी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यात गुंतवणूक आणण्यासाठी घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस दौऱ्याला गेले होते. मात्र दावोस दौऱ्यावरून आल्यानंतर त्यांना विचारले तर ते सांगतात आम्ही मोदींची …

Read More »

महाराष्ट्र मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ: दोन वर्षात १४ लाख शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त राज्यात महाराष्ट्र राज्य मोतीबिंदू मुक्त अभियानास प्रारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत यावर्षी आणि पुढील वर्षी मिळून १४ लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. विधान भवन येथे एका दिमाखदार सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी अशा …

Read More »

माजी गृहमंत्र्यांच्या उत्तरावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी वळसे-पाटलांवर आरोप केलाच नाही माझ्यावरील कारवाईसाठी वरून आदेश आले होते

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार होते. अडीच वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं, काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेटच किंवा सुपारी त्यावेळचे मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिलं होतं असा खळबळजनक आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. फडणवीस …

Read More »

कोश्यारींच्या इच्छेनंतर दिल्लीत अमित शाहंनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक पंकजा मुंडेही पोहोचल्या अमित शाहच्या कार्यालयात

एरवी एकाही वादग्रस्त घटनांबद्दल किंवा वक्तव्यावरून राजभवनाकडून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अनुषंगाने एकही प्रसिध्दी पत्रक जारी केले जात नाही. मात्र काल पहिल्यांदाज राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्याची विनंती आपण नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केल्याचे पत्रक राजभवनाकडून जारी करत शिंदे-फडणवीस सरकार स्थानपन्न झाल्यानंतरही पडद्यामागे सगळंच आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. …

Read More »

उध्दव ठाकरे यांची तैलचित्रावरून टीका, चांगली गोष्ट, मात्र तुमचा हेतू वाईट पवारांचे फोनवरून मार्गदर्शन घेतो, मग आम्ही काय करत होतो?

आगामी मुंबई महापालिका निवडणूका डोळ्यासमोर ठेवत शिंदे-फडणवीस सरकारकडून आज विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात शिवसेना पक्षमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र बसविण्यात आले. या जयंतीनिमित्त शिवसेनेकडून (ठाकरे गट) एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमातून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख …

Read More »

उध्दव ठाकरे गैरहजरः विधान मंडळात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह अनेक मान्यवर उपस्थित

शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत त्यांचे तैलचित्र विधान मंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात आज बसविण्यात आले. या कार्यक्रमाला बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव तथा माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे वगळता इतर ठाकरे कुटुंबिय आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नातू यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे …

Read More »