Breaking News

Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कवाडेंचा लाँग मार्च योग्य ठिकाणी येऊन थांबला अखेर गटाची कवाडेंच्या पीआरपीसोबत युती बाळासाहेबांची शिवसेनेशी युती

शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत वंचित बहुजन आघाडीची चर्चा  सुरु असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना आणि प्रा जोगेंद्र कवाडे यांच्या नेतृत्वखालील पीपल्स रिपब्लिकन पक्षाची अर्थात पीआरपी आज युती झाल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पीआरपीचे प्रमुख प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत केली. मंत्रालयासमोरील बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार …

Read More »

संजय राऊत यांची टीका, टोळी गँगवारमध्ये किंवा पोलिस एनकाऊंटरमध्ये मारले जातात शिंदे गट एक टोळी असल्याने त्यांना स्वतंत्र अस्तित्व नाही

हिवाळी अधिवेशनानंतर राज्यातील राजकिय वातावरण काही काळ शांत राहिल असे वाटत असतानाच भाजपाने संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावरून राजकिय वातावरण गरम करण्याचा प्रयत्न सुरु केला. त्यात आज शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आणखीनच भर घालत राजकिय वातावरण चांगलेच तापविले. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे …

Read More »

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने केली सहा महिन्यात २६०० रुग्णांना दिली २० कोटींची मदत मुख्यमंत्री कार्यालयाने दिली माहिती

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्ण सेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्यचा प्रकाश आणला आहे. आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या सहा महिन्यात कक्षाकडून २६०० रुग्णांना एकूण १९ कोटी ४३ लाख रुपयांची मदत दिली आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, माहिती घेऊन आणि तारतम्य बाळगून बोललं पाहिजे अजित पवारांच्या अधिवेशनातील त्या वक्तव्यावरून मुख्यमंत्री शिंदेची प्रतिक्रिया

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपा-शिंदे गटातील आमदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आणि महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. त्यावरून विरोधी पक्षाने हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. तसेच महापुरूषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करावी यासाठी नवा कायदा करावा अशी मागणी …

Read More »

भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘जिंदाल’ दुर्घटनेतील मृतांना मदत, उच्चस्तरीय चौकशी करा सिल्लोड येथून थेट रूग्णालयात आणि घटनास्थळाला दिली भेट

इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव शिवारात असलेल्या जिंदाल कंपनीत आज रविवार रोजी पहाटेच्यासुमारास झालेल्या स्फोटानंतर आग लागली. या आगीत दोन कामगारांचा मृत्यू झाला असून अन्य १७ कामगार जखमी झाले आहेत. या घटनेतील मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाखांची मदत राज्य शासनाकडून दिली जाणार आहे, तर जखमींवर मोफत उपचार करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »

हिवाळी अधिवेशनातील त्या भेटीवर दिपक केसरकर म्हणाले, तर शिवसेना एकसंध होईल मी लवकरच एक-दोन दिवसात बोलेन

शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून शिंदे आणि ठाकरे गटातील नेत्यांमध्ये वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संघर्ष सातत्याने सुरु आहे. नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनातही हा संघर्ष पाहायला मिळाला. मात्र अधिवेशन सुरु असताना उपसभापतींच्या दालनासमोर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचे नेते तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक वाद झाल्याची चर्चा चांगलीच …

Read More »

दीपक केसरकर म्हणाले, अब्दुल सत्तार अनेकवेळा गंमतीने बोलत असतात… तर शंभराज देसाई म्हणाले, मुख्यमंत्री माग घेतील अनं समजही देतील

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना विरोधकांनी जमीन घोटाळा, कृषी महोत्सवासाठी वसूली या प्रकरणावरुन लक्ष्य केले. तसेच महिला खासदाराबद्दल वापरलेल्या अपशब्दाबाबतही अधिवेशनात नाराजी व्यक्त केली गेली. यामुळे व्यथित झालेल्या अब्दुल सत्तार यांनी थेट शिंदे गटावरच नाराजी व्यक्त केली. ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आपल्या विरोधात कट रचला …

Read More »

जिंदाल कंपनीतील आग सात तास झाले तरी अद्यापही धुमसतेय: मुख्यमंत्री भेट देणार एकाचा मृत्यू तर १७ जणांवर उपचार सुरु

नाशिक जिल्ह्यात असलेल्या इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव येथील जिंदाल पॉलीफिल्म प्रकल्पात बॉयलरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. एकाचा मृत्यू झाला तर १७ जणांवर खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. तसेच १९ जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे. बॉयलरचा झालेल्या स्फोटानंतर कंपनीत भीषण आग लागली असून …

Read More »

काय करायचं सांगा, सरकार बदललं तसं गुणांका(टक्के)चा आणखी एक टेबलही वाढला कंत्राटदाराकडून नागपूरातील हिवाळी अधिवेशनात धावाधाव

राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाले. मात्र या सहा महिन्यात जितकी चर्चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाची झाली. तितकीच चर्चा सरकारी कंत्राटापोटी आणि झालेली कारवाई रद्द करण्यासाठी जे काही गुणांक द्यावे लागतात त्याच्या दरात जवळपास डबल वाढ झाली असल्याची चर्चा सुरु झाली असून राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या विविध विभागातील गुणांका …

Read More »

अब्दुल सत्तार म्हणाले, विरोधातील कटात पक्षातील नेताही सहभागी असू शकतो… मुख्यमंत्र्यांच्या घरातील बैठकीतील माहिती बाहेर

नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जमिन वाटपाच्या घोटाळ्याचा मुद्दा पुढे आल्यानंतर शिंदे गटाचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांचाही जमिन वाटपाचा आणि टीईटी परिक्षेत सत्तार यांच्या मुलींना फायदा दिल्याचाही घोटाळा उघडकीस आला. मात्र ऐन अधिवेशनात हा मुद्दा कोणी बाहेर पुरविला यावरून शिंदे गटातच आता घमासान सुरु झाल्याचे चित्र दिसून …

Read More »