राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांसह विकास कामांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला. पण आर्थिक अडचणीमुळे कधीही निधी अडविला गेला नाही. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या पण त्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत. त्याचबरोबर अर्थसंकल्प होऊन …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मरीन ड्राईव्हला पर्यटकांसाठी सी साईड प्लाझा आणि लेझर शो… प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरण यासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना
देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ई- शिवनेरीचा शुमारंभ पण, १०० बसेस धावणार मुंबई ते… आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात बसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदर
एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, ….जी वागणूक दिली जातेय ती आपली मराठी संस्कृती नाही कोकणातील जनतेला विश्वास द्यावा
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या दिवशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्रासाठी मंगल कलश आणला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांना संघर्ष करावा लागला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करणे आणि …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा
‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या …
Read More »जयंत पाटील म्हणाले, समित्यांचा निकाल म्हणजे राज्यात त्यांचे सरकार… याचा अर्थ सहकारी क्षेत्रात सोसायटीत काम करणारे, कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या बाजूने
महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची ताकद किती कमी आहे हे पुन्हा एकदा बाजार समितींच्या निवडणूकीतून महाराष्ट्रासमोर आले आहे. आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गेले तरी त्यांना म्हणावे इतके यश मिळाले नाही याचा परिणाम हा भाजपा आणि एकनाथ शिंदे एकत्रित आले तरी महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही हे …
Read More »मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजाराहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या केशवराव घैसास सभागृहात हजर राहून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण …
Read More »शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीकडून महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम
मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी या उद्देसाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे …
Read More »३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा देशातील २२ राज्यांच्या राजधान्यांमध्ये साजरा करणार आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय केंद्र करणार -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
राज्य शासनामार्फत ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला १ व २ जून २०२३ रोजी रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. स्वराज्याचा, स्वातंत्र्याचा प्रेरणा देणारा हा दिवस असून त्यानिमित्त राज्यात वर्षभर प्रत्येक जिल्ह्यात सांस्कृतिक कार्यक्रम, पोवाडे, शाहिरी स्पर्धा, महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांवर शिववंदना, जाणता राजा महानाट्याचे राज्यभर प्रयोग आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन …
Read More »अजित पवार यांचा लोककलावंतांसाठी पुढाकार, आर्थिक विकास महामंडळ स्थापन्यासाठी सरकारला पत्र लोककलावंतांना वृद्धापकाळात निवास, भोजन, औषधोपचार, मुलांच्या शिक्षणासाठी महामंडळ आवश्यक...
महाराष्ट्राची लोककला, लोकसंस्कृती असलेल्या तमाशा कलेला लोकमान्यता, राजमान्यता मिळवून देणाऱ्या लोककलावंतांना वृद्धापकाळात सन्मानाने चांगले जीवन जगता यावे, त्यांच्या निवास, भोजन, औषधोपचाराची सोय व्हावी, लोक कलावंतांसाठी वृध्दाश्रम असावेत, त्यांना अल्पव्याजाने कर्ज मिळावे, मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी, शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी तमाशासम्राज्ञी स्व. विठाबाई नारायणगावकर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची मागणी …
Read More »
Marathi e-Batmya