Breaking News

Tag Archives: eknath shinde

संजय राऊत म्हणाले, छत्रपतींनी माफी मागितली तर मोदी जयजयकार का करतात?

काल दिवसभरात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपा प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी शिवाजी महाराजाविषयी अवमानकारक वक्तव्ये केली. त्यावरून उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी माफी मागितली तर मग महाराष्ट्रात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, आता ते जोडे कोणाला मारणार भाजपा प्रवक्ता की राज्यपालांना?

राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर शिंदे गट, मनसे आणि भाजपाने राहुल गांधी यांच्यासह शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. तसेच राहुल गांधी यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले. मात्र महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणारे वक्तव्य भाजपा प्रवक्ते आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले. त्यावरून उध्दव …

Read More »

संजय राऊत यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सवाल, कुठे गेला आता तुमचा स्वाभिमान?

तीन-चार दिवसांपूर्वी भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या माफीनाम्यावर टीका केली. राहुल गांधी यांच्या या टीकेवर राज्यात चांगलेच रणकंदन माजले. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण ऐन थंडीतही चांगलेच तापले. त्यातच आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाचे प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने उध्दव …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान मोदींच्या प्रयत्नातून दोन लाखा कोटींचे प्रकल्प येणार

जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी बैठका घेवून कालबद्धरीत्या प्रश्नांचे निराकरण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. नाशिक औद्योगिक व एसएमई यांच्यातर्फे आयोजित परिषदेत मुख्यमंत्री शिंदे यांनी आज …

Read More »

आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा, पालिकेत सध्या तीन टी सुरु

मुंबई महापालिकेतील कारभारावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) आमदार आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. मुंबई महापालिकेत दडपशाही, हुकूमशाही सुरु असून अधिकारी दबावाखाली काम करत आहेत. पालिकेत सध्या तीन टी सुरु असून ते तीन टी म्हणजे टेंडर, ट्रान्सफर आणि टाईमपास सुरु असल्याचा खोचक टोला लगावत घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एसटी महामंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्त्वाचे निर्णय

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात भाडेतत्त्वावर पाच हजार इलेक्ट्रिक तसेच दोन हजार डिझेल बसगाड्या खरेदी करण्यात येणार आहेत. त्याशिवाय  डिझेलवरील पाच हजार बसगाड्यांचे टप्प्या-टप्प्याने ‘एलएनजी’ मध्ये रुपांतर करण्यास आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संचालक मंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. दरम्यान, महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचा चेहरामोहरा बदलणे आवश्यक असून …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेतले “हे” महत्वाचे निर्णय

दर आठवड्याला होणारी राज्य मंत्रिमंडळाची बैठक मागील आठवडाभरात झाली नाही. त्यामुळे गतवेळी प्रस्तावित असलेले विषय आणि सध्याच्या चालू आठवड्यातील नवे विषय घेवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज गुरूवारी झाली. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जवळपास १४ हून अधिक निर्णय घेण्यात आले.  ते निर्णय खालीलप्रमाणे नागपूर येथील महाराष्ट्र राष्ट्रीय विधी …

Read More »

शिंदे-फडणवीसांचा मोठा निर्णयः या स्वातंत्र्य सैनिकांच्या निवृत्तीवेतनात दुप्पटीने वाढ

राज्यातील स्वातंत्र्य सैनिकांचे  निवृत्तीवेतन दुप्पटीने वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. यामुळे आता स्वातंत्र्य सैनिकांना १० हजार रुपयांऐवजी दरमहा २० हजार रुपये निवृत्ती वेतन मिळेल. भारतीय स्वातंत्र्य संग्राम, मराठवाडा मुक्ती संग्राम व गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्य सैनिकांना याचा लाभ मिळणार आहे. या …

Read More »

महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालमत्ता दर जैसे थे

आगामी मुंबई महापालिका निवडणूका नजरेसमोर ठेवत मुंबईतील मालमत्ता दरात कोणतीही वाढ न करण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला. कोविडमुळे झालेल्या विपरीत परिणामांमुळे मुंबईतील भांडवली मूल्याधारित मालमत्ता दर सध्या म्हणजे २०२२-२३ या वर्षा करीता सुधारीत केला जाणार नसल्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. याप्रमाणे मुंबई महानगरपालिका अधिनियम, १८८८ मधील कलम …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश, अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली

राज्यात १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत …

Read More »