Breaking News

Tag Archives: eknath shinde

भाजपा मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी, नाना तुम्ही मशालीची चिंता करा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वासाठी मंत्रिपद सोडून उठाव केला. त्यांच्या पक्षासोबत भारतीय जनता पार्टीची युती असून भाजपा शिंदे यांच्या पाठीशी ताकदीने उभा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांची काळजी करण्यापेक्षा मशालीची आणि पंजाची चिंता करावी, असा टोला भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रेशखर बावनकुळे यांनी बुधवारी लगावला. ते गोंदिया येथे पत्रकार परिषदेत …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंडाळी ही भाजपाप्रणितच…

हिंदूत्वाची मतं फुटतील आणि आपल्याला महाराष्ट्रात कधीच सत्तेवर येता येणार नाही या भीतीने भाजपाला ग्रासले असल्यामुळे शिवसेना फोडण्याचे पाप भाजपाने केले अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापूर येथे माध्यमांशी बोलताना आज केली. शिवसेनेतील बंडाळी ही शिवसेनेची कधीच नव्हती ती भाजपाप्रणितच होती असा जोरदार हल्लाबोलही त्यांनी केला. …

Read More »

मीरा-भाईंदर शहराला मॉडेल शहर करण्यासाठी सर्वतोपरी मदत करू

मुंबई व ठाणे लगतचे शहर असलेले मीरा-भाईंदर हे शहर सर्व सोयीसुविधा युक्त मॉडेल शहर करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राज्य शासन यासाठी सर्वतोपरी मदत करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या मिरा रोड (पूर्व ) महाजनवाडी येथे स्केटींग रिंगचे लोकार्पण, महापालिकेच्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाचे भूमीपूजन, भाईंदर (प.) येथील चिमाजी …

Read More »

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून तर्क-वितर्काला उधान

अंधेरी विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच निवड प्रक्रिया जाहिर केली. त्यातच शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेत वेगळी चुल मांडली. त्यातच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाकडून …

Read More »

अखेर शिंदे गटाच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेला ढाल तलवार चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आदेश जारी

अंधेरी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आणि शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना कोणाची हा वाद सर्वोच्च न्यायालयात व्हाया केंद्रीय निवडणूक आयोगामार्फत पोहोचला. त्यावर निर्णय देताना केंद्रीय निवडणूक आयोगाने या वादावर अंतरिम आदेश देत उध्दव ठाकरे यांच्या गटाला शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे असे नाव वापरण्यास परवानगी देत मशाल हे चिन्ह दिले. एकनाथ शिंदे यांच्या …

Read More »

कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची “त्या” घटनेबाबत केला खुलासा मुख्यमंत्र्यांच्या पीएला शिवीगाळ प्रकरण

काल रविवारी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी एकनाथ शिंदे गटाचे मंत्री, खासदार, आमदार आणि पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीत राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या केली असल्याचे चर्चा सुरू असताना त्यावर आता अब्दुल सत्तार यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत …

Read More »

ठाकरे गटाला मिळाले हे नाव आणि चिन्ह मात्र शिंदे गटाला नाव मिळाले चिन्ह नाही त्रिशुळ आणि गदा ही चिन्हे मात्र बाद

अंधेरी विधानसभा पोटनिवडणूकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला तात्पुरत्या स्वरूपात चिन्ह आणि पक्षाच्या नावासाठी अर्ज करण्याची सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानुसार शिंदे गटाकडून उगवता सुर्य, त्रिशुळ आणि गदा ही तीन चिन्हे पाठविण्यात आली. तर उध्दव ठाकरे यांनी यापूर्वीच त्रिशुळ, उगवता सुर्य, धगधगती मशाल ही चिन्हे पाठविली होती. या …

Read More »

नाना पटोले म्हणाले, ईडी सरकारचा तो निर्णय म्हणजे, ‘भीक नको पण कुत्रा आवर’

शासकीय खरेदी आधारभूत केंद्राअंतर्गत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोंदणीच्या शासकीय निर्णयाचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ई-पीक पाहणी, सातबारासह शेतकऱ्यांची सर्व माहिती सरकारकडे असताना पुन्हा धान खरेदी केंद्रावर जाऊन ऑलनाईन नोंदणी करण्यास सांगणे हे गरिब, सामान्य शेतकऱ्यांचा छळ करणारे तसेच अन्यायकारी आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी …

Read More »

जर आयोगाच्या यादीत चिन्ह नसेल तर? अनिल देसाई म्हणाले, तर ते चिन्ह देऊ शकतं.. आयोगाच्या यादीत नसलेल्या चिन्हाबाबत अनिल देसाईंची माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत शिवसेना हे नाव व पक्षाचे चिन्ह धनुष्य बाण वापर करण्यास उध्दव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गटाला मनाई केली. त्यानंतर नव्या पक्ष नावासाठी आणि चिन्हासाठी अर्ज करण्याचे आदेश दोन्ही गटाला दिले. मात्र उध्दव ठाकरे यांनी पाठविलेली चिन्हे निवडणूक …

Read More »

एकनाथ खडसे म्हणाले, दोघांच्या भांडणात पुण्याई गोठवली… वाडवडीलांनी जे कमावलं पण मुलांनी एका मिनिटात घालविलं

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना हे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय देत एकनाथ शिंदे गटाला आणि उध्दव ठाकरे गटाला मनाई केली. या साऱ्या राजकिय घडामोडीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी चिंता व्यक्त करत शिंदे गटाबरोबर शिवसेनेलाही टोला लगवला. प्रसारमाध्यमांशी बोलताना एकनाथ खडसे यांनी वक्तव्य …

Read More »