Breaking News

Tag Archives: eknath shinde

उध्दव ठाकरेंचा शिंदे गटावर निशाणा, उलट्या… आईच्याच काळजात कट्यार घुसवली याचं काळीजच उलट आहे त्यामुळे रक्तच गोठलेले

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव आणि धनुष्य बाण गोठविण्याचा निर्णय काल शनिवारी दिला. या पार्श्वभूमीवर आपली भूमिका मांडण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी सोशल मिडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, शिवसेना म्हणजे सळसळत रक्त. मात्र काही उलट्या काळजाच्या माणसांनी होय त्यांना काळीज आहे पण …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आज महाशक्ती आनंदात असेल… हिंदूस्थानात कोणाची हिंमत नव्हती पण आज त्यांनी करून दाखवलं

संपूर्ण देशात हिंदूस्थानात कोणाची हिंमत नव्हती. कोणाला करून दाखविता आल नाही. पण आज ४० तोंडाच्या रावणाने प्रभू रामचंद्राचे असलेले धनुष्य बाण चिन्ह गोठविले. त्यामुळे ती जी कोणती महाशक्ती आहे ती आनंदात असेल असा खोचक टोला शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटाला लगावला. शनिवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील …

Read More »

अरविंद सावंत म्हणाले, आम्ही आयोगाला ही तीन नावे आणि चिन्हे पाठविली निवडणूक आयोगाच्या निकालाकडे लक्ष्य

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील फुटीवर शिक्कामोर्तब करत अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे गट आणि उध्दव ठाकरे गटाला शिवसेना नावासह धनुष्यबाण वापरण्यास मनाई केली. तसेच या निवडणूकीसाठी तात्पुरते नाव आणि चिन्ह आयोगाकडे मागण्याची सूचना दोन्ही गटाकडे केली. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांच्या गटाकडून तीन नावे आणि तीन चिन्हांची मागणी करणारे …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, आमचं बाळासाहेबांवर आणि धनुष्यबाणावर प्रेम… केवळ त्यांच्यामुळेच हे सगळं झालंय

केंद्रिय निवडणूक आयोगाने शिवसेनेतील शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या फुटीवर शिक्कामोर्तब करत या दोन्ही गटाला शिवसेना नाव आणि चिन्ह धनुष्यबाण वापरण्यास मनाई करणारा आदेश काल शनिवारी रात्री दिला. तसेच अंधेरी पोट निवडणूकीसाठी पर्यायी पक्षाचे नाव आणि चिन्ह सूचविण्याची सूचना दोन्ही गटाला केली. या आज रविवारी सकाळपासून शिंदे गट आणि ठाकरे …

Read More »

सुषमा अंधारे म्हणाल्या,…ते सांगतात पण तशी आयोगात नोंदच नाही

शिवसेनेसह निवडणूक चिन्हावर दावा करणारी याचिका एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल केली होती. त्या याचिकेला उध्दव ठाकरे गटाकडून काल सविस्तर कागदपत्रे सादर करत प्रत्युत्तर दिले. त्यावर निवडणूक आयोगाने शिवसेनेत फूट पडल्याचे अधोरेखित करत मुंबईतील अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोट निवडणूकीत शिंदे गट आणि ठाकरे गटाला शिवसेना हे नाव आणि …

Read More »

उध्दव ठाकरेंच्या अपेक्षेनुसार निवडणूक आयोगाने “धनुष्य बाण” चिन्ह गोठवलं शिवसेनेकडून अंधेरी पोटनिवडणूकीत नव्या चिन्हाचा वापर

सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय निवडणूक आयोगाला परवानगी दिल्यानंतर एकनाथ शिंदे गटाने मूळ शिवसेना आणि चिन्हावर दावा केला. शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही शिवसेना आणि धनुष्य बाण आपल्याच गटाचे असल्याचा दावा केला. परंतु निवडणूक आयोगाकडून नियमानुसार दोन्ही गटाकडून कागदपत्रे सादर झाल्यानंतर आज दुपारी सुट्टी असतानाही आयोगाच्या वरिष्ठांची बैठक झाली. त्यानंतर शिवसेनेचे चिन्ह …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही, पंढरपूरसह देहू-आळंदीचाही विकास करणार वारकरी संप्रदाय हे महाराष्ट्राचे वैभव

वारकरी संप्रदाय ही मोठी शक्ती असून या संप्रदायाने भजन व किर्तनाच्या माध्यमातून मानवकल्याण आणि विश्वशांतीचा संदेश दिला. मानवाला सद्विचार देणारा वारकरी संप्रदाय महाराष्ट्राचे वैभव आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मृदंग ज्ञान शिक्षण संस्थेव्दारे आळंदी येथे आयोजित संत दासोपंतस्वामी आळंदीकर यांचा गुरुपूजन सोहळा, संस्थेचा रौप्य महोत्सव सोहळा आणि …

Read More »

रात्रीचे आठ.. अन् मंत्रालयात आलेल्या सामान्य माणसाला भेटण्याची मुख्यमंत्र्यांची तळमळ जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही

मंत्रालयातील सहाव्या मजल्यावर अभ्यागतांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या सामान्य नागरीकाला आस असते ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीची. मुख्यमंत्री देखील या जनतेची भेट घेतल्याशिवाय मंत्रालय सोडत नाही. काल, शुक्रवारी ७ ऑक्टोबरला रात्री साडेआठ पर्यंत मुख्यमंत्री शिंदे सामान्यांना भेट होते. योगायोगाने काल मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला शंभर …

Read More »

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील विविध कामांचा मुख्यमंत्र्यांकडून आढावा मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण एमएमआरडीएच्या माध्यमातून करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबई महानगर परिसर क्षेत्रातील रस्ते खड्डे विरहीत असावेत यासाठी एमएमआरडीएने रस्त्यांची तपासणी करावी. अवजड वाहनांची वर्दळ असलेले रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि हलक्या वाहनांची वर्दळ असलेले रस्ते यूटीडब्ल्यू तंत्राने करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. मंत्रालयात आज …

Read More »

बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुषखबरः कामावर घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

एसटी महामंडळाच्या ताफ्यात डिसेंबरपर्यंत दीडशे इलेक्ट्रिक आणि मार्चपर्यंत एक हजार सीएनजी बसगाड्यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा पुरविण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. दरम्यान, एसटी संपाच्या काळात बडतर्फ केलेल्या ११८ कर्मचाऱ्यांना कामावर घेण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी महामंडळाला दिले. परिवहन विभागाच्या अखत्यारितील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन …

Read More »