Breaking News

Tag Archives: eknath shinde

एकनाथ शिंदे म्हणाले; असंगाशी संग करण्यापेक्षा कंत्राटी मुख्यमंत्री असणे कधीही चांगले… पोलिसांना १५ लाखात घर, ७५ हजार जागांसाठी भरती

विधानसभेत पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात अंतिम आठवडा प्रस्ताव मांडला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरील सर्व सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत राज्यातील प्रश्नांवर चर्चा केली. त्यावेळी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कंत्राटी मुख्यमंत्री असल्याची टीका केली होती. तसेच फार मुख्यमंत्री राहणार नसल्याचे भाकितही विरोधकांकडून करण्यात आले. या टीकेचा धागा पकडत मुख्यमंत्री …

Read More »

उत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणाले, अजित दादा तुम्ही करेक्ट कार्यक्रम केलेला पण…. पहाटेच्या शपथविधीवरून काढला चिमटा

पावसाळी अधिवेशात विरोधकांनी मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर काल आणि आज चर्चा झाली. त्यानंतर या प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवार आणि अजित पवार यांच्या पहाटेच्या शपथविधीवरून चांगलाच चिमटा काढत जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्या टोप्या उडविल्या. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र पाठवित केली ‘ही’ विनंती मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याच्या प्रस्तावास लवकरात लवकर मंजूरी द्यावी

महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद असणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा प्रस्ताव केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाकडे प्रलंबित असून त्यास लवकरात लवकर मंजूरी द्यावी, अशी विनंती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीच्या अहवालानुसार राज्य शासनाने १६ नोव्हेंबर …

Read More »

शिंदे गटाच्या टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर, त्या आमदारांची मला कीव येते… गद्दार सरकारमध्ये मंत्रीपदासाठी काय काय करावं लागतं

पावसाळी अधिवेशन संपण्यास अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले असताना शिंदे समर्थक गट आक्रमक झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. काल महाविकास आघाडीच्या विरोधात आंदोलन करत धक्काबुक्की केल्याचे प्रकरण शिंदे गटाकडून घडवून आणण्यात आल्यानंतर आज शिंदे गटाने थेट शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लक्ष्य करत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत टीका …

Read More »

जयंत पाटील यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, शिवाजी महाराज सुरतेला लुटायला गेले अन् तुम्ही…. पंतप्रधान पदाच्या शर्यतीमधील नेत्याला उपमुख्यमंत्री केले जाते हे भाजपच्या नेत्यांच्या लक्षात का येत नाही..

छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लूटली… त्या सुरतेला तुम्ही शरण व्हायला गेलात… तुमची सुरतेवर स्वारी झाली परंतु त्याने महाराष्ट्राची बदनामीच झाली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शिंदे गटाला खडेबोल सुनावले अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना जयंत पाटील यांनी सत्ताधारी मंत्र्यांना, आमदारांना तर कधी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना …

Read More »

एकनाथ शिंदेंची उध्दव ठाकरेंवर कडी, मुंबईत २२७ च वॉर्ड, कारभाराची एसीबी मार्फत चौकशी विधानसभेत विधेयकाला अखेर मंजुरी

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने मुंबई महापालिकेच्या वार्डांच्या संख्येत वाढ करत त्यास विधिमंडळाच्या अधिवेशनात मंजूरीही केली. मात्र सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उध्दव ठाकरे सरकारने घेतलेला हा निर्णय रद्दबादल ठरवित मुंबई महापालिकेत जून्याच पध्दतीने वार्ड रचना ठेवण्याचे सुधारीत विधेयक मंजूर करत मुंबई महापालिकेच्या काराभाराची एसीबी मार्फत …

Read More »

तो व्हिडिओ ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या; अमित शहाजी, शिंदे गटाच्या आमदारांना… मविआच्या आमदारांना धमकावणारा शिंदे गटाचा व्हिडीओ ट्वीटरवर केला शेअर

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी ट्वीट करुन गृहमंत्री …

Read More »

सत्ताधारी आमदारांच्या धक्काबुक्कीने मदतीची आस लावून बसलेल्या शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग आंदोलन करणे विरोधकांचा अधिकार, सत्ताधाऱ्यांचा विधानभवन परिसरातील प्रकार दुर्दैवी-बाळासाहेब थोरात

अधिवेशनातून आपल्यासाठी काही मदतीचा हात देणारा निर्णय होईल अशी आशा लावून बसलेल्या शेतकऱ्यांची घोर निराशा झाली आहे. शिंदे-फडणवीसांचे सरकार आल्यापासून १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, दररोज ३ शेतकरी आत्महत्या करत आहेत तर मुख्यमंत्री शेतकऱ्यांना भावनिक आवाहन करत आहे आणि विधीमंडळाच्या पायऱ्यावर मात्र सत्ताधारी आमदार विरोधकांना धक्काबुक्की करतानाचे चित्र पाहिल्यानंतर शेतकरी व …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेच्या इशाऱ्यानंतर आज शिंदे गट- मविआ आमदार भिडले एकमेकांशी रोहित पवार आणि सुरक्षा रक्षकांनाही आवरले नाहीत शिंदे गटाचे आमदार

आतापर्यंत महाराष्ट्राच्या सांसदीय राजकारणात सौजन्य आणि मैत्री सौहार्दाचे असलेले चित्र आज पहिल्यांदाच बिघडल्याचे विधान भवनाच्या आवारात राज्याच्या जनतेला पाह्यला मिळाले. काल मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना चिठ्या काढण्याचा इशारा देत सहनशीलता संपेल अशी वेळ आणू देऊ नका असे आवाहन विरोधकांना केले. मात्र आज विरोधक महाविकास आघाडीच्या आंदोलनाची जागा सत्ताधारी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची पत्राद्वारे शेतकऱ्यांना साद, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया… छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया

राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक आवाहन करत ‘रडायचं नाही, लढायचं…अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी बळीराजाला दिलासा दिला. विधानसभेत नियम २९३ अन्वये झालेल्या चर्चेला उत्तर देतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी राज्यातील …

Read More »