Breaking News

Tag Archives: eknath shinde

सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती, त्यांना बंडखोर मानत नाही ते १०० कॅरेट सोनं इतक्यात अविश्वास ठरावाची मागणी नाही -प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची झाली बैठक

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे आमदार बंडखोर असल्याचे आम्ही मानत नाही. तसेच ते १०० कॅरेट सोनं असल्याचे सांगत ते सर्वजण शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून अद्याप भाजपाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.भाजपा आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील त्यांच्यावर आमची नजर …

Read More »

दिपक केसरकर यांचे खुले पत्र: भाजपाची भलामण, संजय राऊतांवर निशाणा हिंदूत्त्वाच्या रक्षणासाठी... बंड नव्हे, शिवसेनेच्या आत्मसन्मानाचा लढा!

बंडखोरांची बाजू मांडण्यासाठी बंडखोर आमदार दिपक केसरकर यांनी आज खुले पत्र लिहित शिवसेनेसाठी भाजपा कशी चांगली आहे आणि हिंदूत्वाच्या मुद्यावर भाजपाबरोबर एकत्र येणे चांगले (?) यासह भाजपा नेते कसे शिवसेनेवर टीका करत नाही आदींसह अनेक मुद्दे मांडत या सर्वामागे संजय राऊत कसे कट कारस्थानी आहेत याचा उल्लेख करत त्यांच्यावर टीकेचा …

Read More »

राज्यपाल कोश्यारींनी पत्र पाठवित विचारला मविआला जाब; माहिती सादर करण्याचे दिले आदेश विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या पत्राची दखल

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात मंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकावित शिवसेनेसह महाविकास आघाडी सरकारला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना घेऊन आसामची राजधानी गुवाहाटी गाठली. त्यानंतर राज्य सरकारच्या अनेक विभागाकडून मोठ्या प्रमाणावर शासकिय आदेश, निधी वाटपाचे आदेश जारी केले. त्यामुळे हे सारे आदेश कोणत्या आणि कशासाठी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा बंडखोर आणि शिवसेनेला समान धक्का १६ आमदारांना बाजू मांडण्यासाठी १२ जुलैपर्यंतची मुदत

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी बंडखोर १६ आमदारांना बजाविलेल्या नोटीसी आणि शिवसेनेच्या गटनेते पदी शिवडीचे आमदार अजय चौधऱी यांची नियुक्ती केल्याच्या विरोधात बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत आपली बाजू मांडली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दोन्हीकडी बाजू ऐकून घेत बंडखोर आमदारांना १२ जुलैपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने …

Read More »

मुख्यमंत्री ठाकरेंनी काढून घेतली बंडखोरांची खातीः हे आहेत नवे मंत्री जनहिताची कामे अडकू नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय मंत्री, राज्यमंत्री यांच्याकडील खात्यांचे फेरवाटप

शिवसेनेसह राज्य सरकारला पाठिंबा देणाऱ्या अनेक अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदार मंत्र्यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडखोरी करत सूरत मार्गे गुवाहाटीत मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे राज्यातील जनतेची कामे खोळंबा होण्यास सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर जनतेची कामे रखडू नयेत यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी या बंडखोर आमदार मंत्र्यांकडील खाती काढून …

Read More »

दिपक केसरकर यांचे ठाकरे गटाला आव्हान, कशात विलीन व्हायचं ते त्यांनी ठरवावं उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत शिंदे गटाला मिळाले

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारणाऱ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक ४० बंडखोर आमदारांनी जरी गुवाहाटीत तळ ठोकलेला असला तरी मुळ पक्षालाच अर्थात उध्दव ठाकरे यांनाच आव्हान दिले. त्यामुळे एकाबाजूला उध्दव ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना परतण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच दुसऱ्याबाजूला शिंदे गटाच्या दिपक केसरकर यांनी थेट आता ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला …

Read More »

एकनाथ शिंदे बंड दुसरा अंक: बंडखोरांच्या याचिकेवर उद्या न्यायालयात सुनावणी उपाध्यक्षांनी पाठविलेल्या नोटीसीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव

राज्यातील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे यांनी आता ठाकरे यांच्या कायदेशीर आक्रमक पवित्र्यांना कायद्यानेच उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे दाखल केलेल्या अपात्रतेच्या याचिकेनुसार बंडखोर आमदारांना नोटीस पाठविली. आता त्या नोटीसीलाच एकनाथ शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून यावर उद्या २७ जून …

Read More »

शरद पवार यांचा टोला, संख्याबळ आहे तर मग तिकडे का?…तर निवडणूका होतील राष्ट्रपती राजवट लागू केल्यास त्यांना काय फायदा होणार

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या गटाने शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे याचिका दाखल केली. त्यानंतर आजच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना रूग्णालयतून घरी सोडण्यात आले तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे ही आज दिल्लीत आहेत. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या बंडातील …

Read More »

शिवसेनेचे वकील कामत म्हणाले, कायदा सांगतो ‘ते’ अपात्रच ठरणार कायद्यातील तरतूदींची दिली माहिती

मागील चार-पाच दिवसांपासून शिवसेनेतील क्रमांक दोनचे नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावित पक्ष प्रमुख ठाकरे यांना आव्हान दिले. यावरून स्वत: शिवसेनाच संभ्रमावस्थेत असल्याचे आणि एकनाथ शिंदे यांचा गट आत्मविश्वासपूर्वक असल्याचे अद्याप तरी दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेनेचे सर्वोच्च न्यायालयातील वकिल देवदत्त कामत यांनी कायद्यातील …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे वकील म्हणतात, ‌‌विधानसभा उपाध्यक्षांच्या विरोधातील ‘तो’ प्रस्तावच अवैध अपात्रतेबाबत निर्णय विधानसभा उपाध्यक्ष घेवू शकतात

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत जवळपास ३९ आमदार आपल्या सोबत सुरतमार्गे गुवाहाटी येथे नेले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या गटाने आपलीच शिवसेना ही मुळ शिवसेना असल्याचा दावा करत आता आम्ही महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे पत्र विधानसभा उपाध्यक्षांना देणार असल्याचे जाहिर केले. तसेच …

Read More »