Breaking News

Tag Archives: eknath shinde

दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांचा आधार, “तुम्ही स्वत:ला सावरा, बाकीचं आमच्यावर सोडा” आम्ही सर्वांचंच पुनर्वसन करणार असल्याची दिली ग्वाही

महाड (तळीये) : प्रतिनिधी डोंगराच्या पायथ्याला असलेल्या तळीये गावावर काल अतिवृष्टीने दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत ४० जणांना मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. काल संध्याकाळपर्यंत जवळपास ३७ जणांचे मृतदेह ढिगाऱ्यांखालून काढण्यात आले. त्यात  आज आणखी वाढ होवून ही संख्या ४० वर पोहोचली. घटनास्थळाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज येथे आले. …

Read More »

संपूर्ण शहराचा पुनर्विकास करणारे ठाणे शहर हे देशातील पहिले शहर ठरणार क्लस्टर पु्र्नविकासाच्या यशस्वी अंमलबजावणीने वाटचाल शाश्वत विकासाकडे

क्लस्टरचा रिडेव्हलेपमेंट अर्थात समुह पुर्नविकासाचे धोरण ठाणेकरांसाठी ऐतिहासिक ठरणार आहे. समुह पुर्नविकासासंतर्गत जुन्या मोडकळीस आलेल्या अनेक इमारतींचा एकत्रितरित्या पुर्नविकास करणे सहजशक्य होणार आहे. अशा इमारतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांना चांगले हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क असून ठाणेकरांच्या जीविताशी निगडित असल्याने त्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न क्लस्टरच्या माध्यमातून सोडविण्याचे उत्तरदायित्व राज्य शासनाने आणि राज्याच्या …

Read More »

दररोज १५ लाख लोकांना लस देण्याची तयारी नागरिकांच्या आरोग्याच्या हित जपले जाईल कोणतीही उणीव भासू देणार नाही- मुख्यमंत्री ठाकरे

 मुंबई : प्रतिनिधी तिसऱ्या संभाव्य लाटेची शक्यता असताना आपल्याला अधिक सावध राहिले पाहिजे, जगात इतरत्र कोरोनाच्या डेल्टा प्लसचा संसर्ग परत वाढत असून आपल्याकडे सध्या रुग्णसंख्या घटत असली तरी आरोग्याचे नियम काटेकोरपणे पाळणे अतिशय महत्वाचे आहे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शासनाची दररोज १५ लाख लसीकरणाची तयारी असल्याचे स्पष्ट केले. …

Read More »

अखेर आंबिल ओढ्यात घरे पाडण्याच्या कारवाईला स्थगिती उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या प्रयत्नाला यश नगरविकास मंत्र्यांनी दिले आदेश

मुंबई : प्रतिनिधी पुणे शहरातील आंबिल ओढा झोपडपट्टी भागातील घरे पाडण्याची अचानक कारवाई अचानक आज सकाळपासून सुरु करण्यात आली. त्यामुळे स्थानिक रहिवाशी आणि पोलिसांमध्ये वाद निर्माण झाला. याप्रश्नी अखेर विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची तातडीने बैठक घ्यायला लावून …

Read More »

लस घेतली तरी विधिमंडळ अधिवेशनासाठी कोरोना चाचणी आवश्यकच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी ५ व ६ जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक विधानभवनाच्या प्रांगणात झाली. या बैठकीला विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, …

Read More »

पोलिसांच्या २ लाख हक्काच्या घरासाठी नगरविकास विभागाचा पुढाकार गृह आणि गृहनिर्माण विभागाच्या समन्वयाने लवकरच धोरण अंतिम

मुंबई : प्रतिनिधी पोलिसांच्या घरांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागून निवृत्तीनंतर त्यांची घरासाठीची वणवण थांबावी, यासाठी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांना त्यांच्या हक्काची घरे मिळवून देण्यासाठी नगरविकास विभाग विशेष धोरण तयार करत असून गृह आणि गृहनिर्माण या विभागांच्या समन्वयाने लवकरच त्याला अंतिम स्वरूप देऊन मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

फडणवीस आणि उध्दव ठाकरेंचे आवडते मोपलवार यांना चवथ्यांदा मुदतवाढ दोन आयएएस अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारली

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्यातील भाजपाच्या नेतृत्वाखालील फडणवीस सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची निवृत्तीनंतर एक वर्षासाठी समृध्दी महामार्गाच्या समितीवर नियुक्ती करत मुदतवाढ देण्यात आली. त्यामुळे फडणवीस यांचे लाडके म्हणून मोपलवारांना ठाकरे सरकारने थेट चवथ्यांदा मुदतवाढ दिल्याने एकाबाजूला निवृत्त सनदी अधिकाऱ्यांना मुदतवाढ नाकारायची दुसऱ्याबाजूला …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी मुख्यमंत्री ठाकरे लवकरच पंतप्रधान मोदींच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने दिले राज्यपालांना निवेदन

मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देण्यासंदर्भात राष्ट्रपती व केंद्र शासनाने पावले उचलावीत, यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद व केंद्र शासनाला लिहिलेले पत्र देण्यासाठी शिष्टमंडळासह आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. आमच्या भावना केंद्रापर्यंत पोचविण्याची विनंती यावेळी त्यांना केली आहे. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याची माहिती …

Read More »

मराठा आरक्षणः मराठा उमेदवारांसाठी सर्व जिल्ह्यांत ‘विशेष कार्य अधिकारी’ सोमवारपासून मुख्य सचिव घेणार नोकरभरती प्रक्रियेचा आढावा

 मुंबई : प्रतिनिधी सामाजिक व शैक्षणिक मागास (एसईबीसी) प्रवर्गाच्या प्रलंबित नोकर भरती प्रक्रियेचा मुख्य सचिव येत्या सोमवारपासून संबंधित विभागाच्या सचिवांकडून आढावा घेणार असून, मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधिशांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी जाहीर केले. सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या मराठा आरक्षण विषयक …

Read More »

सर्व खाजगी, सरकारी रुग्णालयाचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे महापालिकांना निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगरातील खाजगी आणि सरकारी रूग्णालयांमध्ये आगीच्या घटना वारांवार घडत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातीलमधील सर्व महानगरपालिकांच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश आज नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेशही …

Read More »