Breaking News

Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदेंकडून आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक पटकाविणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन ठाण्याच्या रुद्रांक्ष पाटीलसह तिघांची नेमबाजीत कामगिरी

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने नेमबाजीमध्ये एअर रायफल्स प्रकारात देशाला या स्पर्धेतील पहिले सुवर्णपदक पटकावून दिले आहे. या सुवर्ण वेधासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय संघातील नेमबाज रुद्रांक्ष बाळासाहेब पाटील, दिव्यांशसिंह पनवर, ऐश्वर्यसिंह तोमर यांचे अभिनंदन केले आहे. या संघाने जागतिक चॅम्पियनशीप स्पर्धेतील विक्रमही मोडीत काढला आहे. याबद्दलही मुख्यमंत्र्यांनी या …

Read More »

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने नवा ट्रेंड महाराष्ट्रात निर्माण होतोय का ? मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री केसरकर मात्र शेवटपर्यंत उपस्थित

केंद्रात भाजपा सत्तेवर आल्यानंतर एक नवा ट्रेंड महाराष्ट्राच्या राजकारणात रूळला असून नवी दिल्लीतून केंद्रीय मंत्री गृहमंत्री अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी जर मुंबई दौऱ्यावर आले तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नव्याने उपमुख्यमंत्री झालेले अजित पवार यांच्यासह खासकरून भाजपाच्या मंत्र्याऐवजी शिंदे गटातील मंत्र्यांनी उपस्थित राहिलेच पाहिजे, असा अलिखित …

Read More »

अमित शाह म्हणाले, सहकार चळवळीने स्वतःला बदलणे आवश्यक देशातील तीन लाख विकास सेवा संस्थांचे बळकटीकरण करणार

सहकार चळवळीने कालानुरुप स्वत:ला बदलणे आवश्यक आहे. देशात रोजगारनिर्मिती सोबतच आर्थिक विकास वाढविण्याची ताकद सहकार क्षेत्रात आहे. केंद्र सरकारही सहकार विद्यापीठाची स्थापना करुन त्या माध्यमातून बॅंक, दुग्धव्यवसाय, कृषी, विपणन क्षेत्रासाठी प्रशिक्षित मनुष्यबळ निर्माण करणार आहे. ग्रामीण भागातील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे बळकटीकरण करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यामुळे …

Read More »

आता ओबीसीसाठीही बैठक बोलवा विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्र्यांना फोन

राज्यात आरक्षणाच्या मागणीवरून मराठा, धनगर तसेच ओबीसी समाजाची राज्यभर आंदोलने सुरू असून मराठा धनगर समाजाच्या बैठकीनंतर आता ओबीसी समाजाच्या प्रश्नांवर देखील बैठक बोलवा अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. जालन्यात मराठा समाजासाठी तर अहमदनगर मधील चौडी येथे धनगर समाजाचे आरक्षणासाठी आंदोलने सुरू आहेत. पैकी …

Read More »

अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ‘नाबार्ड’ सारख्या संस्थांकडून अतिरिक्त निधी प्रकल्पांची कामे वर्षभरात पूर्ण करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातील जलसंपदा विभागाचे अपूर्ण सिंचन प्रकल्प तातडीने पूर्ण करण्यासाठी नाबार्डसह इतर वित्तीय संस्थांकडून अतिरिक्त निधी उभारून सप्टेंबर २०२४ पर्यंत प्रकल्पांची कामे पूर्ण करावीत, राज्य शासनाकडून सर्व आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. सह्याद्री राज्य अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत राज्यातील अपूर्ण सिंचन प्रकल्प …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, … गरज पडल्यास न्यायाधीशाच्या नेतृत्वाखाली समिती धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत शासन सकारात्मक

शासन धनगर समाजाच्या पाठीशी असून आरक्षणाबाबत जी धनगर समाजाची भूमिका आहे, तीच शासनाची भूमिका आहे. धनगर आरक्षणाबाबत शासन सकारात्मक आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. धनगर समाज आरक्षणाबाबत आज सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, इतर मागास …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय आता व्हॉटसॲप चॅनलवर योजना, निर्णयांची अचूक, अधिकृत माहिती मिळणार…

‘जनसामान्यांचे मुख्यमंत्री’ अशी ओळख असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेशी आता थेट व्हॉटसॲपद्वारे ‘कनेक्ट’ झाले आहेत. काल गणेश चतुर्थीच्या दिवशी मुख्यमंत्री सचिवालयाच्या ‘सीएमओ महाराष्ट्र’ या व्हॉटसॲप चॅनलचा श्री गणेशा करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी घेतलेले निर्णय, मंत्रिमंडळाचे निर्णय, शासनाच्या योजना, विविध विकास प्रकल्प आदींची अचूक आणि अधिकृत माहिती या चॅनलच्या माध्यमातून …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे गणरायाला साकडे, “सर्वसामान्यांना सुख, समृद्धी मिळू दे” ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते श्री गणरायाची प्रतिष्ठापना

गणेशोत्सवानिमित्त आज ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक श्री गणरायाची विधिवत पूजा करुन प्रतिष्ठापना केली. चांगला पाऊस पडू दे आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यात सुख- समृद्धी, समाधानाचे चांगले दिवस येऊ दे, यासाठीच्या आमच्या प्रयत्नांना बळ देण्याचे साकडे मुख्यमंत्र्यांनी यावेळी गणरायाला घातले. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी गणरायांचे …

Read More »

कारागिल-द्रास युद्ध स्मारकाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,… ऊर्जा आणि प्रेरणादायी 'कारगिल आश्चर्याचा धक्का ते विजय' पुस्तकाचे प्रकाशन

द्रास येथील युद्ध स्मारकाला भेट दिल्यावर आणि आपल्या शूर सैनिकांच्या पराक्रमाची गाथा जाणून घेतल्यानंतर खूप अभिमान वाटला. द्रास युद्ध स्मारकाला दिलेली भेट प्रेरणादायी आणि ऊर्जा देणारी असून देशभक्तीची भावना अधिक वृद्धिंगत करणारी आहे, या शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मुख्यमंत्री शिंदे रविवारपासून काश्मीर दौऱ्यावर असून आज …

Read More »

राज्य सरकारकडून नरेंद्र मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची सरकारवर जोरदार टिका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त संभाजीनगर येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषित केलेला ११ कलमी नमो शासकिय योजना म्हणजे बोलघेवडेपणा असून राज्य सरकारकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अवास्तव उदात्तीकरण सुरू असल्याची जोरदार टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजना …

Read More »