Breaking News

Tag Archives: eknath shinde

उद्धव ठाकरे यांचा इशारा,… अन्यथा आम्हाला सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे उघडे असतील शिंदे-ठाकरे गटाच्या आमदारांना पाठविलेल्या नोटीसांवर प्रतिक्रिया

बरोबर एक वर्षापूर्वी एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपाच्या मदतीने राज्यात सत्ता स्थापन केली. त्यानंतर ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली होती. दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने यावर निर्णय दिला. तसेच संबंधित आमदारांना अपात्र ठरवण्याचा अधिकार न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देत …

Read More »

शिवसेनाः दोन्ही गटातील ५४ आमदारांना विधानसभा अध्यक्षांच्या नोटीसा लेखी म्हणणे सादर करण्यास सात दिवसांची मुदत

शिवसेना नेमकी कोणाची आणि राज्यातील सत्तासंघर्षाच्यादृष्टीने महत्वाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने देऊनही जवळपास दोन महिन्याहून अधिक काळ लोटला गेला. विशेष म्हणजे त्यास येत्या ११ जुलै रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत. यापार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयानुसार शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटातील आमदारांच्या पात्र-अपात्रेबाबतच्या कारवाईस सुरुवात केली आहे. …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, शासन आपल्या दारी उपक्रमास राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद गडचिरोलीमध्ये स्टील सिटी उभारण्याचे नियोजन – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाने सर्वसामान्य जनतेच्या दारी शासनाच्या योजना पोहोचल्या असून राज्यात सर्वच जिल्ह्यांमध्ये या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या अभियानांतर्गत गडचिरोली जिल्ह्याने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले असून जिल्ह्याच्या ११ लाख लोकसंख्येपैकी सुमारे ६ लाख ९७ हजार लाभार्थ्यांना जिल्हा प्रशासनाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून दिला असे मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या त्या टीकेवर शरद पवार यांनी दिले या तीन शब्दात उत्तर तोंडात अंजीर हातात खंजीर असल्याची मुख्यमंत्री शिंदे यांनी केली होती टीका

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शिवसेनेने पाठोपाठ झालेल्या बंडखोरीची चर्चा अद्याप खाली बसायला तयार नाही. त्यातच पक्षाच्या बांधणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा बंडखोरांच्या मतदारसंघातून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. मात्र गडचिरोली येथील शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे तिघेजण …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, अजित पवार आले आणि आम्ही विकासाचं एक त्रिशुळ… विरोधकांच्या विरोधात त्रिशुळ म्हणून काम करू

गडचिरोली येथे शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज ८ जुलै रोजी आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार आणि भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाषण करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व उपस्थितांचं स्वागत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचा शरद पवारांना टोला, तोंडात अंजिर आणि हातात खंजीर…. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत शरद पवारांवर टीका

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपात नवा भिडू मिळाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गडचिरोली येथे शासन आपल्या दारी या कार्यक्रमासाठी नुकताच शासकिय दौरा पार पडला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्यांच्या तोंडात अंजिर आणि हातात खंजीर असणाऱ्या लोकांचा काय भरोसा …

Read More »

नाना पटोले यांची टीका, शिंदे आणि पवार यांची भाषा म्हणजे मोदी-शाह यांची स्क्रिप्टच गद्दारांना सर्व गद्दारच दिसतात, काँग्रेसमध्ये कोणीही गद्दार नाही

राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु असून त्यामागे भारतीय जनता पक्षच आहे. दिल्लीतून मोदी व शहा जशी स्क्रिप्ट लिहून देतात तीच भाषा बोलली जात आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेना सोडल्यावर जी भाषा वापरली तशीच भाषा अजित पवार वापरत आहेत, हा काही योगायोग नाही तर दिल्लीतून मोदी-शहांनी दिलेली स्क्रिप्टच आहे. शिवसेना व राष्ट्रवादी …

Read More »

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले हे निर्देश शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीचा तगादा नको

नाशिक जिल्हा बॅंकेकडून कर्जधारक शेतकऱ्यांमागे कर्ज वसुलीसाठी तगादा लावण्यात येत आहे यासंदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या मागे कर्ज वसुलीसाठी तगादा न लावण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीद्वारे दिले. आज सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास ठाकरे यांनी वर्षा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आश्वासन, पात्र गिरणी कामगारांसाठी घरकुलांची निर्मिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित

गिरणी कामगारांची पात्रता निश्चित करून पात्र कामगारांना घरे देण्यासाठी शासनामार्फत जे निर्णय घेणे आवश्यक असेल ते घेतले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. विविध योजनांमधून घरे उपलब्ध होत असून सर्व पात्र गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी अधिकच्या घरकुलांची निर्मिती करणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण …

Read More »

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून कामकाजाचे १५ दिवस चालणार

राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या …

Read More »