Breaking News

Tag Archives: eknath shinde

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आता प्रशासनच जनतेच्या दारी जाणार 'शासन आपल्या दारी' अभियान अधिक व्यापक करणार

शासनाच्या विविध योजना जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य शासनातर्फे सुरू करण्यात आलेल्या ‘शासन आपल्या दारी’ अभियानाचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (मरळी) येथे करण्यात आला. नागरिकांना मोठ्या प्रमाणात शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी हे अभियान अधिक व्यापक करण्यात येईल, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. दौलतनगर येथील श्रीमती विजयादेवी …

Read More »

अजित पवार म्हणाले, ….कुणी मनातही आणू नका हे राजीनामा देतील अटलबिहारी वाजपेयींची उंची आणि आताच्या लोकांची उंची यामध्ये जमिन आस्मानचा फरक

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल दिला. सरकार स्थापन करण्यासाठीचे मार्ग, राज्यपालांची भूमिका या सगळ्यावर सर्वोच्च न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत अजित पवारांना विचारलं असता एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस स्वप्नातही राजीनामा देणार नाहीत …

Read More »

संत चोखोबाराय मंदिर तीर्थक्षेत्र विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

महाराष्ट्र संतांची भूमी आहे. समाजप्रबोधन करण्याचे काम संत विचारांनी केले आहे. याच विचारांचा वसा घेऊन शासन वाटचाल करीत आहे. इसरूळ येथील श्री संत चोखोबारायांचे मंदिर आणि ही भूमी तीर्थस्थळ म्हणून विकसित होण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. संत चोखोबारायांची जन्मभूमी असलेल्या मेहुणा …

Read More »

अनिल परब म्हणाले, निकाल स्पष्ट… तर गटनेत्याची निवडच बेकायदेशीर ठरते बेकायदेशीर व्यक्तीला मुख्यमंत्री होता येत नाही

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) निकाल दिल्यानंतर सत्ताधारी मुख्यमंत्री (Chief Minister) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजपा (BJP) नेत्यांकडून आपापल्या परिने निकालाचे विश्लेषण करण्यात येत आहे. तर दुसऱ्याबाजूला ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडूनही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आपल्याच बाजूने लागल्याचा दावा करण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी वांद्रे येथील …

Read More »

‘शासन आपल्या दारी’ राज्यस्तरीय अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते साताऱ्यात होणार शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राहणार उपस्थित

सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारी जाणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून राज्यात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा राज्यस्तरीय शुभारंभ उद्या१३ मे रोजी सातारा जिल्ह्यातील दौलतनगर (ता.पाटण) येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला …

Read More »

परमबीर सिंग यांचे निवृत्तीनंतर निलंबन मागेः वाचा गृह विभागाचे आदेश सेवानिवृत्तीनंतरच्या सर्व सुविधा मिळण्याचा मार्ग मोकळा

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त (Former Mumbai Police Commissioner) तथा राज्याच्या होमगार्ड दलाचे प्रमुख आयपीएस अधिकारी परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्यावरील निलंबनाची कारवाई नव्या शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतली आहे. परमबीर सिंग यांनी १०० कोटी रूपयांच्या खंडणी वसूली प्रकरणी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर …

Read More »

भगतसिंग कोश्यारी म्हणाले, जो गलत था गलत हो गया, न्यायालयाने बोलणे के बाद… न्यायालयाच्या निकालानंतर कोणी बोलू शकत नाही

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर न्यायालयाने मोठा निकाल दिला असून यात राज्यपालांनी घेतलेल्या निर्णयांवर ताशेरे ओढले. राज्यपालांनी घेतलेले निर्णय कायद्याला धरून नव्हते, असं स्पष्ट मत न्यायालयाने आपल्या निकालात नोंदवले. यासंदर्भात आता विरोधी पक्षांनी टीका करायला सुरुवात केली असतानाच दस्तुरखुद्द माजी राज्यपाल …

Read More »

निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्यांना चपराक घटनाबाह्य सरकार म्हणणारेच कालबाह्य

महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सर्व निर्णय बेकायदेशीर आणि चुकीचे होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजची राजकीय स्थिती …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा… सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध शिंदे-भाजपा सरकार असंवैधानिक, बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामार्तब

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक …

Read More »

जयंत पाटील न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाले, शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार शिंदे सरकार जरी वाचले तरी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. जयंत पाटील म्हणाले, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला …

Read More »