Breaking News

Tag Archives: eknath shinde

कल्याण-डोंबिवली मनपात समाविष्ट २७ गावांतील मालमत्ता कर, बांधकांमांबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ आदेश विविध शिष्टमंडळांनी आपले म्हणणे मुख्यमंत्र्यांकडे सादर केले

कल्याण – डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांतील मालमत्ता करांबाबत, गावठाण व त्याबाहेरील बांधकामांबाबत सर्वंकष धोरण ठरवण्याबाबत सर्व्हेक्षण करा. आवश्यकतेनुसार समिती स्थापन करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. या २७ गावांतील विविध प्रश्नांसंदर्भात सर्वपक्षीय संघर्ष समितीने आज मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. यावेळी श्री संत सावळाराम महाराज …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा अमित शाहंना थेट इशारा, जमिन काय असते हे दाखविल्याशिवाय राहणार नाही… वज्रमुठ सेभेत शिंदे-फडणवीस सरकारसह विरोधकांवर साधला निशाणा

काही महिन्यांपूर्वी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुंबई दौऱ्यावर आलेले असताना तत्कालीन महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना जमिन दाखविणार असल्याचा जाहिर इशारा दिला. त्यानंतर शिवसेनेत फुट पडली आणि महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्याच वक्तव्याचा धागा पकडत आज महाविकास आघाडीचे मुंबईतील वज्रमुठ सभेत ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव …

Read More »

अजित पवार यांचा सरकारवर निशाणा, हे काम शिंदे-फडणवीसांचे नाही का? ते काय करतायत ? मागच्या वर्षीची बिलं द्यायला पैसे नाहीत...मदतीच्या घोषणा अनेक केल्या पण लोकांपर्यंत त्या पोहोचल्याच नाहीत

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना शेतकऱ्यांसह विकास कामांसाठी मुबलक निधी उपलब्ध करून दिला. पण आर्थिक अडचणीमुळे कधीही निधी अडविला गेला नाही. मात्र आता महाविकास आघाडीचे सरकार गेल्यानंतर नव्या आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीसाठी मोठ्या प्रमाणावर घोषणा केल्या पण त्याचे पैसे अद्याप पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचले नाहीत. त्याचबरोबर अर्थसंकल्प होऊन …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, मरीन ड्राईव्हला पर्यटकांसाठी सी साईड प्लाझा आणि लेझर शो… प्रसाधनगृह, आसन व्यवस्था, स्वच्छता, सुशोभीकरण यासाठी मुंबई महानगरपालिका करणार उपाययोजना

देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरात एक व्ह्युविंग डेक (सी साईड प्लाझा) तयार करण्यासोबतच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा तसेच सार्वजनिक प्रसाधनगृहांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगरपालिका प्रशासनाला दिले. मरीन ड्राईव्ह परिसरात देश विदेशातून येणारे पर्यटक आणि मुंबईकर नागरिकांसाठी सुविधा, स्वच्छता …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ई- शिवनेरीचा शुमारंभ पण, १०० बसेस धावणार मुंबई ते… आता एसटीच्या इलेक्ट्रिक बसेस धावायला सुरुवात बसस्थानके ही होणार स्वच्छ, सुंदर

एसटीने चेहरामोहरा बदलण्याचा संकल्प सोडला असून शासन आपल्या सदैव पाठीशी असेल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. एसटी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी असून सध्याच्या स्पर्धात्मक वातावरणात एसटीने जास्तीत जास्त गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख सेवा द्यावी अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. आज सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ई-शिवनेरी बसचे लोकार्पण, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, ….जी वागणूक दिली जातेय ती आपली मराठी संस्कृती नाही कोकणातील जनतेला विश्वास द्यावा

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. आजच्या दिवशी स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबांनी महाराष्ट्रासाठी मंगल कलश आणला. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मराठी भाषिकांना संघर्ष करावा लागला आणि मुंबईसह महाराष्ट्र निर्माण करणे आणि …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची ग्वाही, आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आमचे ध्येय महाराष्ट्र दिनी नागरी आरोग्यवर्धिनी केंद्रांचा विस्तार, गरजूंसाठी घराजवळ उपचार सुविधा

‘आरोग्यपूर्ण महाराष्ट्र हे आपले ध्येय आहे. सर्व सामान्यांच्या आयुष्यात बदल घडवण्याचे आपला प्रयत्न आहे. त्यादिशेने आपला आरोग्य विभाग काम करत आहे, याचे समाधान आहे,’ असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजनेचा आज मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्या …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, समित्यांचा निकाल म्हणजे राज्यात त्यांचे सरकार… याचा अर्थ सहकारी क्षेत्रात सोसायटीत काम करणारे, कार्यकर्ते हे महाविकास आघाडीच्या बाजूने

महाविकास आघाडी एकसंघ राहिल्यामुळे महाराष्ट्रात भाजपाची ताकद किती कमी आहे हे पुन्हा एकदा बाजार समितींच्या निवडणूकीतून महाराष्ट्रासमोर आले आहे. आणि एकनाथ शिंदे हे चाळीस आमदार घेऊन गेले तरी त्यांना म्हणावे इतके यश मिळाले नाही याचा परिणाम हा भाजपा आणि एकनाथ शिंदे एकत्रित आले तरी महाराष्ट्रात त्यांचे सरकार येणार नाही हे …

Read More »

मुंबईत ५ हजार ठिकाणी ‘मन की बात’ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची उपस्थिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या ऐतिहासिक संवादाचा शतकोत्सव मुंबईसह उपनगरातील ३६ विधानसभा क्षेत्रात तब्बल ५ हजाराहून अधिक ठिकाणी प्रचंड उत्साहात साजरा करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विलेपार्ल्यातील म. ल. डहाणूकर महाविद्यालयातल्या केशवराव घैसास सभागृहात हजर राहून कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण …

Read More »

शिंदे-फडणवीस सरकारला मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाचा विसर मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष गौरव समितीकडून महाराष्ट्रदिनी विविध कार्यक्रम

मराठवाडा मुक्ती संग्रामाचे यंदा ७५ वे वर्ष असून हे अमृत महोत्सवी वर्ष मोठ्या प्रमाणात साजरे करून मराठवाडा मुक्तीसंग्रामात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे व स्वातंत्र्याचे स्मरण करून त्यांना अभिवादन करणे, नव्या पिढीला मुक्तीसंग्रामाच्या लढ्याची माहिती व्हावी या उद्देसाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने मराठवाड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. १ मे …

Read More »