Breaking News

Tag Archives: eknath shinde

नाना पटोले यांचा सवाल, त्या दुर्घटनेप्रकरणी शिंदे सरकार काय लपवतंय ? राज्यपालांना पत्र, खारघर येथील सदोष मनुष्यवधप्रकरणी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील १४ श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून …

Read More »

आदित्य ठाकरे यांचा आरोप, लोकप्रतिनिधी नसताना ४८ टक्के जास्तीच्या दराने निविदा.. फक्त पाचच कंत्राटदारांना निविदांचे वाटप, निविदेत अनेक नियमांचा समावेश नाही

राज्यातील सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील जवळपास ४०० किमीचे रस्ते सिमेंटचे बनविणार असल्याची घोषणा करत ही कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार असल्याचे जाहिर केले. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केल्याप्रमाणे ही कामं अद्यापही सुरू झाली नसून या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे …

Read More »

टपालाची पोहोच संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर मिळणार मंत्रालयातील मध्यवर्ती टपाल केंद्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

शासकीय कारभार जलदगतीने व पारदर्शक पद्धतीने होण्यासाठी आता मंत्रालयात मध्यवर्ती टपाल केंद्र उभारण्यात आले असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या केंद्राचे आज उद्घाटन करण्यात आले. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर, सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, …

Read More »

‘महाराष्ट्र भूषण’ सोहळ्यातील दुर्घटना सरकार निर्मित, अजित पवार यांनी सुनावले, केली ही मागणी दुर्घटनेची निवृत्त न्यायाधिशांमार्फत चौकशी करुन दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा; मृतांच्या नातेवाईकांना २० लाख तर बाधितांना मोफत उपचारांसह ५ लाख रुपये मदत द्या

खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा अशी मागणी …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, कृष्णा, पंचगंगेचे पूर नियंत्रण, प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कोल्हापूर, इचलकरंजी महानगरपालिकेशी निगडीत विविध योजनांबाबत कार्यवाहीचे निर्देश

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पुराची तीव्रता कमी व्हावी यासाठी जलसंपदा विभागाने कृष्णा, पंचगंगा नदी पात्रांतील गाळ काढण्यासाठी तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी सांडपाणी प्रक्रीया तसेच अन्य उपाययोजनांबाबत तातडीने पावले उचलावीत असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. कोल्हापूर शहरातील रस्त्यांच्या कामांसाठीचा नगरोत्थान योजनेतील १०० कोटींचा निधी तत्काळ उपलब्ध करून …

Read More »

झाडं तोडण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने फटकारत मेट्रो कार्पोरेशनला केला १० लाखाचा दंड मेट्रो रेल कार्पोरेशनला अधिकची झाडं तोडण्यास केली मनाई

मुंबईतल्या आरे कॉलनीतील वृक्ष तोड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारवर तीव्र नाराजी व्यक्त केली. आम्ही तुम्हाला ८४ झाडं तोडण्याची संमती दिली होती. तरीही मेट्रो रेल कॉर्पोरेशनने वृक्ष प्राधिकरणाकडे जाऊन न्यायालयाचा अपमान केला असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारलं आहे. तसंच न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करून आणखी झाडं तोडल्याप्रकरणी मुंबई मेट्रोला …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, लाखो लोक रखरखत्या उन्हात अन् VIP लोक मात्र AC त, हा कुठला न्याय? शिंदे सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा

ज्येष्ठ निरुपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचे ढिसाळ नियोजन होते. या ढिसाळ नियोजनाचा मोठा फटका कार्यक्रमाला आलेल्या श्रीसदस्यांना बसला व उष्माघाताने १३ श्रीसदस्यांचा मृत्यू झाला व ५०० च्या वर रुग्णालयात उपचार घेत आहेत, ही घटना अत्यंत वेदनादायी व शरमेने मान खाली घालायला लावणारी आहे. हा …

Read More »

भर उन्हात कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून? उदय सामंत म्हणाले, त्यांच्याशी चर्चा करूनच वेळ ठरविली… कार्यक्रमाची वेळ हुकूमशाही पध्दतीने ठरविली नव्हती

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री परिवाराचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आला. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर पुन्हा ऐन उन्हाळा सुरु झालेला असताना खारघर येथे पुरस्कार …

Read More »

१३ जणांचे बळी गेल्यानंतर महाराष्ट्र भूषण डॉ धर्माधिकारी यांनी व्यक्त केल्या आपल्या भावना घडलेली घटना अत्यंत क्लेशदायक

ऐन एप्रिलमध्ये बदलेल्या वातावरणामुळे नैसर्गिक तापमानात सातत्याने बदल घडून येत असल्याचा इशारा हवामान खात्याने दिल्यानंतरही नवी मुंबईतील खारघर येथे नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र भूषण सोहळ्याला उपस्थित राहीलेल्या श्री सेविकांना उष्माघाताने त्रास होऊ लागला. त्यामुळे काल रात्रीत ११ श्री सदस्यांचा मृत्यू झाल्यानंतर आज दिवसभरात आणखी दोघांची वाढ होत ही संख्या १३ …

Read More »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्याला गालबोट, उष्माघाताने ७ ते ८ जणांचा मृत्यू एमजीएम रूग्णालयात झाला मृत्यू, मृतांमध्ये महिला, लहान मुलं आणि पुरुषांचा समावेश

मागील वर्षीचा २०२२ चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळा आज सकाळी खारघर येथे पार पडला. या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना बोलावित आणि तब्बल महाराष्ट्रातील सर्वच टोल नाक्यांवर टोलमाफी देत जवळपास लाखो लोकांच्या उपस्थित ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाच्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने आज ( १६ एप्रिल …

Read More »