Breaking News

Tag Archives: flood

पुण्यातील निळ्या पूररेषेतील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा आराखडा तातडीने तयार करा विमा कंपन्यांशी बोलून नुकसानग्रस्तांना लगेच मदत द्या- मुख्यमंत्री शिंदे

पुण्यात नुकतीच आलेली पूर परिस्थिती वारंवार होऊ नये म्हणून तात्पुरता उपाय म्हणून खडकवासला, एकतानगर, सिंहगड येथे पूर संरक्षक मजबूत भिंत बांधणे सुरु करा असे निर्देश देतांना निळ्या पूर रेषेतील (ब्ल्यू लाईन) नागरिकांचे कायमस्वरूपी पूनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका, जलसंपदा विभाग यांनी समन्वयाने तज्ज्ञांच्या सल्ल्याने एक आराखडा तयार करावा, असे निर्देश …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश, नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतरण, निवारा केंद्रांमध्ये सुविधा द्या 'अलमट्टी'तील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी समन्वय ठेवून नियोजन करा

कोल्हापूर जिल्ह्यातील पूर परिस्थिती आणि पावसाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन माहिती घेतली आणि आपत्तीग्रस्त लोकांना तातडीने मदत उपलब्ध करुन देण्याच्या सूचना दिल्या. बचाव कार्याची आवश्यकता वाटल्यास तिथे एनडीआरएफ, एसडीआरएफच्या तुकड्या पाठविण्यात याव्यात. आवश्यकता वाटल्यास सेनादलाची मदत घेण्यात यावी. त्याचबरोबर अलमट्टी धरणातील पाण्याच्या विसर्गाबाबत कर्नाटक प्रशासनाशी …

Read More »

अजित पवार यांनी पूरग्रस्तांची भेट घेत केली घोषणा, पालिका आणि सरकार मदत करणार एकता नगर आणि सिंहगड रोडवरील पाणी साचलेल्या ठिकाणी भेट

काल दिवसभर पडलेल्या पावसानंतर रात्रीपासून पुण्यात कोसळलेल्या पावसामुळे पुणे शहरात पुर परिस्थिती निर्माण झाली. एकाबाजूला पावसाचे पाणी आणि दुसऱ्याबाजूला खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे सिंहगडरोडवरील एकता नगर आणि अन्य भागात जिकडे तिकडे पाणीच पाणी जमा झाले. एकता नगरमध्ये तर छातीपर्यंत पाणी जमा झाल्याचे पाह्यला मिळाले. यापार्श्वभूमीवर दुपारनंतर पालकमंत्री अजित …

Read More »

आसाममधील पुरात ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू ९५ प्राण्यांची पुरातून सुटका

काझीरंगा नॅशनल पार्क (KNP) आसामच्या पुरात ११४ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ९५ इतर प्राण्यांची सुटका करण्यात आली आहे. शुक्रवारपर्यंत काझीरंगा नॅशनल पार्क KNP मधील प्राण्यांचा मृत्यू ७७ वर पोहोचला आहे. पुरामुळे चार गेंड्यांचा मृत्यू झाला, तर ९४ हरणं (हॉग डियर) बुडाले. तर इतर ११ जनावरांचा …

Read More »

दुबईच्या वाळवंटात पावसाचा महापूर…विमानतळ, रस्ते, मॉल्समध्ये पाणीच पाणी

आतापर्यंत दुबई आणि बहरीन हे तेथील राजेशाही राजवट आणि तेथील वाळवंटी भूभाग, त्याचबरोबर तेथील कच्च्या तेलाचे साठे यामुळे संपूर्ण जगभरात आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय बनलेले आहे. परंतु कालपासून या भागात वादळी वाऱ्यासह कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने रस्ते, घरे आणि मॉल्समध्ये पाणी भरले असून ओमानमध्ये किमान १८ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोल्हापूरकरांची पूर चिंता कायमची मिटणार

अतिवृष्टीमुळे कोल्हापूरात येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरुपी तोडगा काढणारा ३५०० कोटींचा कृती आराखडा राज्य सरकारने मंजुर केला असून त्याचे काम सुरु झाले आहे. यामुळे कोल्हापूरकरांची महापुराची चिंता कायमची मिटणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. कोल्हापूरचे महायुतीचे उमेदवार आणि हातकणंगले मतदार संघाचे उमेदवाराचा अर्ज सादर करण्यापूर्वी आयोजित केलेल्या प्रचार मेळाव्यात ते …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रित कारभाराचे पाप नागपुरातील पूर नैसर्गिक आपत्ती नाही तर सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट, अनियंत्रीत आणि गलथान कारभाराचे पाप

नागपूर शहरात शुक्रवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात पाणी साठले व पूर परिस्थिती निर्माण झाली. नागपूरातील ही भयावह स्थिती सत्ताधारी भाजपच्या भ्रष्ट, गलथान आणि अनियंत्रित कारभाराचे पाप आहे. पुरामुळे शहरातील सुमारे दहा हजाराहून अधिक घरांमध्ये पाणी शिरल्याने जीवन उपयोगी साहित्य पुरात भिजले आहे. त्यामुळे या नागरिकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. यासोबतच …

Read More »

एसडीआरएफच्या नियमात सुधारणा, आपतकालीन परिस्थितीत मिळणार या नव्या दरानुसार भरपाई राज्य सरकारने मंत्रिमंडळात केले शिक्कामोर्तब

राज्य आपत्ती प्रतिसाद निधी एसडीआरएफ (SDRF) साठी केंद्र सरकारने निकष आणि दरांमध्ये सुधारणा केल्या असून, त्या सुधारणा स्वीकृत करण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या सुधारणा २०२५-२६ पर्यंत असतील. तसेच या निर्णयांची अंमलबजावणी १ नोव्हेंबर, २०२२ पासून होणार आहे. मदतीचे सुधारित …

Read More »

बदलापूर आणि अंबरनाथच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री शिंदेंनी दिले ‘हे’ आदेश कुळगांव- बदलापूरमधील पूर रेषेच्या फेर सर्वेक्षण आणि शाळा हस्तांरणासाठी निधी देणार

कुळगांव- बदलापूर शहरातून जाणाऱ्या पूर नियंत्रण रेषेचे नगरपरिषद आणि जलसंपदा विभागाने समन्वयाने फेर सर्वेक्षण करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यासोबतच कोविड काळातील केलेल्या खर्चाचे व नगरपरिषदेला मुद्रांक शुल्काचे अनुदानही लवकरात लवकर दिले जावे यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. कुळगांव – बदलापूर नगरपरिषदेशी निगडीत विविध विषयांबाबत सह्याद्री …

Read More »