Breaking News

Tag Archives: inflation

नाना पटोले यांचा सवाल, जनतेच्या प्रश्नावर आंदोलन करणे गुन्हा का ? दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा भाजपा सरकारचा प्रयत्न, तरीही जनतेच्या प्रश्नावर संघर्ष करतच राहू

देशातील जनता महागाईने त्रस्त असताना केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंवर जीएसटी लावून गोरगरिबांच्या तोंडातला घास हिरावून घेतला. केंद्र सरकारला मात्र महागाई दिसत नाही. बेरोजगारी वाढली असून अग्निपथ योजना आणून तरुणांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. जनतेच्या या प्रश्नांवर जाब विचारण्यासाठी राजभवनला घेराव घालण्याचे काँग्रेसने घोषित केले असता राज्यातील ईडी सरकारने रात्रीपासूनच काँग्रेस …

Read More »

अन्नधान्यावरील जीएसटीवरून संसदेत आंदोलन; काँग्रेसचे खासदार निलंबित लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली कारवाई

देशातील वाढत्या महागाईच्या प्रश्नावरून चर्चेची आणि अन्नधान्यावर लावण्यात आलेली जीएसटी रद्द करण्याची मागणी करत काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात फलक घेऊन निदर्शने केली. फलक फडकाविल्याबद्दल काँग्रेसच्या चार खासदारांना लोकसभेतून संपूर्ण अधिवेशनासाठी निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी यापूर्वी आंदोलन न करण्याचा इशारा दिला होता. तरीही काँग्रेसच्या खासदारांनी सभागृहात आंदोलन …

Read More »

श्रीलंकेपासून आर्थिक धडे: भारताला तूटीचा पट्टा घट्ट आवळावा लागणार दिवाळखोरीतून भारताला अनेक आर्थिक धडे-लेखन स्वामीनाथन एस अंकलेसरीया अय्यर (टाईम्स ऑफ इंडियातून साभार)

नुकतेच श्रीलंकेतील राष्ट्राध्यक्ष गोटाभाया राजपक्षे यांच्या विरोधात राष्ट्रपती निवासस्थानात स्थानिक नागरीकांनी घुसखोरी करत विरोध प्रदर्शन आंदोलन केले. या नाट्यमय घडामोडीनंतर श्रीलंकेतील दिवाळखोरीमुळे एकदंरीतच अर्थव्यवस्थेशी संबधित अनेक शिस्त (थेअरींच्या) त्याचे विश्लेषण करण्यास असमर्थ ठरत आहेत. वास्तविक पाहता मागील काही वर्षापासून श्रीलंकेतील तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट (सरकारकडून प्रमाणाबाहेर खर्च) वाढत असल्याचे दिसून …

Read More »

काँग्रेसचा इशारा; ज्वलंत प्रश्नांकडे वेळीच लक्ष दया अन्यथा परिस्थिती स्फोटक बनेल श्रीलंकेची तीन वर्षापूर्वी जी स्थिती होती तीच स्थिती आज भारताची-अतुल लोंढे

केंद्रातील भाजपाचे सरकार जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे लक्ष न देता धार्मिक प्रश्न पुढे आणत आहे हे देशाच्या हिताचे नाही. महागाईचा आगडोंब उसळला असताना सरकार मात्र आकड्यांचा खेळ करून आभासी व दिशाभूल करणारे चित्र दाखवत आहे. तीन वर्षांपूर्वी श्रीलंकेची जी स्थिती होती तीच आज भारताची असून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळीच पावले …

Read More »

रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर दास म्हणाले, दुसऱ्या सहामाहीत महागाई कमी होण्याचा अंदाज कौटील्य इकॉनॉमिक फोरममध्ये बोलताना केले स्पष्ट

देशातील जीवनाश्यक वस्तूंसह सर्वच गोष्टीत मोठ्या प्रमाणावर किंमती वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांना महागाईचे चटके बसत आहेत. त्यातच अनेक नागरीकांकडून महागाईचा सामना करण्यासाठी स्वत:च्याच खर्चात मोठ्या प्रमाणावर कपात केल्याची बाब पुढे येत आहेत. यापार्श्वभूमीवर दुसऱ्या सहामाहीत महागाईं हळूहळू कमी होईल असा अंदाज रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तीकांत दास यांनी आज व्यक्त …

Read More »

मुलभूत प्रश्नांना बगल देण्यासाठीच धार्मिक मुद्द्यांना प्राधान्य देण्याचे षडयंत्र देशातील ज्वलंत प्रश्नांची काँग्रेसला चिंता, जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारू : नाना पटोले

देशातील सध्याची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. रुपयाची दररोज घसरण होत आहे, महागाई व बेरोजगारी प्रचंड वाढलेली आहे. जनतेच्या जीवन मरणाचे प्रश्न असताना धार्मिक मुद्द्यांना पुढे करून वातावरण बिघडवायचे व मुख्य प्रश्नांवरून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचे एक मोठे षडयंत्र भाजपकडून सुरु आहे. परंतु काँग्रेस जनतेच्या हितासाठी केंद्र सरकारला जाब विचारत राहिल, …

Read More »

घाऊक महागाईच्या दराने गाठला विक्रमी टप्पा मागील दहा वर्षांतील सर्वाधिक

कोरोना कालावधीनंतर सातत्याने देशात महागाई सातत्याने वाढत आहे. बाजारात पेट्रोल, डिझेल आणि गँसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत असतानाच आता जीवनाश्वक वस्तुंच्या किंमतीतही मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे काही वस्तुंचे भाव वाढलेले आहेत. तर काही वस्तुंच्या किंमती आहे तितक्याच ठेवण्यात आल्या आहेत. मात्र त्याच्या आकारमानात वजनात कंपन्यांनी घट केली आहे. …

Read More »

आरबीआयने निश्चित केलेला दराचा टप्पा महागाईने ओलांडला खाद्य तेल, खाद्य महागाई आणि किरकोळ महागाई दर आतापर्यंतचा सर्वाधिक

कोरोनानंतर पेट्रोल-डिजेल आणि गॅसच्या किंमतीत सातत्याने वाढ होत करण्यात येत असल्याने त्याचा परिणाम जीवनाश्यक वस्तू, भाजीपाला, साबण, खाद्य पदार्थ, खाद्य तेल आदींच्या किंमतीतही वाढ होत असल्याने संपूर्ण देशभरातील जनता महागाईने चांगलीच होरपळून निघत आहे. विशेष म्हणजे वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने निर्धारीत केलेल्या महागाईच्या दराचा टप्पाही ओलांडला गेला आहे. …

Read More »

महागाई, बेरोजगारीची किंमत लोकं केंद्र सरकारकडून योग्य वेळी वसूल करतील संभाजीराजेबाबत कॉंग्रेस आणि शिवसेनेशी बोलावे लागेल ;शक्यतो एकत्रित निर्णय घेऊ...

राजद्रोह कायद्याचा पुनर्विचार करण्याची भूमिका केंद्रसरकारने घेतली असेल तर त्या भूमिकेचे स्वागत आहे. राजद्रोहाच्या कायद्याबाबत केंद्रसरकार फेरविचार करत असेल तर ते योग्य आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी कोल्हापूर येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. आज कोल्हापूरमध्ये विविध विषयांवर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यात …

Read More »

राऊतांचा मनसेवर निशाणा साधत भाजपाला आव्हान पोलिसांच्या भीतीने भोंगे गायब झाले, महागाईवर बोला

मागील काही दिवसांपासून राज्यात मस्जिदीवरील भोंग्यावरून मनसे, भाजपाने राज्यातील महाविकास आघाडीवर निशाणा साधत असतानाच आज शिवसेनेचे प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांनी मनसेवर टीकेची झोड उठवित भाजपाला महागाईच्या मुद्यावरून बोलण्याचे आव्हान दिले. महाराष्ट्रात पोलिसांच्या भीतीने सर्व राजकीय भोंगे गायब झाले, असे सांगत त्यांनी हिंदू समाजातच फूट पाडण्याचा प्रयत्न केला. खरंतर …

Read More »