Breaking News

Tag Archives: k c venugopal

हिंडेनबर्ग प्रकरणी काँग्रेसचा इशारा, जेपीसी कमिटीमार्फत चौकशी करा अन्यथा… संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशी करा नाही तर देशभर आंदोलन

सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच यांच्यावरील हिंडेनबर्ग संशोधनाच्या आरोपांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर हल्ला चढवत काँग्रेसने सोमवारी या प्रकरणाची जाँईट पार्लमेंटरी समिती अर्थात जेपीसी JPC -संयुक्त संसदीय समिती मार्फत चौकशीची मागणी मान्य न केल्यास देशव्यापी आंदोलन छेडण्याची धमकी दिली. काँग्रेस सरचिटणीस (संघटना), के सी वेणुगोपाल यांनी आरोपांचे वर्णन “अत्यंत गंभीर” म्हणून …

Read More »

राहुल गांधी यांची घोषणा, वायनाड भूस्खलन दुर्घेटनेतील कुटुंबियासाठी १०० घरे बांधणार केंद्र आणि राज्य सरकारकडून एकत्रित मदत देण्याची गरज

नुकतेच केरळमधील वायनाड येथे भूस्खलनाची दुर्दैवी घटना घडली. या दुर्दैवी दुर्घटनेत २००हून अधिक नागरिकांना मृत्यू झाला. तसेच संपूर्ण परिसरात चिखल आणि माती पसरली. या पार्श्वभूमीवर वायनाडचे माजी खासदार तथा काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तातडीने यांनी केरळ येथील दुर्घटनाग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर राहुल गांधी यांनी प्रसार माध्यमांशी …

Read More »

विधानसभा निवडणूक जागा वाटपाबाबत काँग्रेसची १० सदस्यीय समिती स्थापन महाविकास आघाडीतील घटक पक्षांसोबत चर्चा करणार

राज्यातील आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपाच्या चर्चेला महाविकास आघाडीतील काँग्रेसकडून लवकरच सुरुवात करण्यात येणार असल्याचे संकेत काँग्रेसने दिले असून महाविकास आघाडीतील घटक पक्षांशी जागावाटपाबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस हायकमांडने १० सदस्यांची समिती स्थापन केली. त्यापैकी ३ सदस्य मुंबईतील जागावाटपाबाबत चर्चा करणार आहेत. या समितीचे नेतृत्व काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले करणार …

Read More »

के सी वेणुगोपाल यांचा इशारा, पक्षात बेशिस्त खपवून घेणार नाही…आमदारांवर कारवाई राज्याला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही: नाना पटोले

विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाणार असून आजच्या बैठकीत काँग्रेस संघटन मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभा निवडणुका व त्यानंतर देशभरात झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपाचा सुपडा साफ झालेला आहे. जनतेला महाराष्ट्रातही परिवर्तन हवे आहे. महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्रित बसून जागावाटपाची चर्चा करणार आहेत. आम्ही मिळून या …

Read More »

आगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते के सी वेणुगोपाल मुंबईत निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेऊन रणनिती ठरवणार

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला व महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळावून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली असून या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल व महाराष्ट्र प्रभारी रमेश …

Read More »

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या ठरावावर काँग्रेसने व्यक्त केली नाराजी पत्र लिहित के सी वेणूगोपाल यांनी नाराजी व्यक्त केली

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आणीबाणीच्या विरोधात ठराव आणल्याबद्दल नाराजी व्यक्त करताना काँग्रेसने म्हटले आहे की, राजकीय संदर्भ देणे, तेही पदभार स्वीकारण्याच्या दिवशी, “खूप धक्कादायक” आणि “संसदेच्या इतिहासातील आश्चर्य कारक” होता. “अध्यक्षांकडून असा राजकीय संदर्भ घेणे संसदेच्या इतिहासात आर्श्चयकारक आहे. नवनिर्वाचित सभापतींच्या ‘पहिल्या कर्तव्या’पैकी एक म्हणून अध्यक्षपदावरून येणारे हे आणखी …

Read More »

काँग्रेसची दुसरी ४३ जणांची लोकसभा उमेदवारांची यादी जाहिर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने मंगळवारी ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्यासह ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांच्या मुलांची नावे आहेत. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांचे पुत्र नकुल नाथ यांना मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथून उमेदवारी देण्यात आली आहे. ते या जागेवरून विद्यमान खासदार आहेत. वैभव गेहलोत …

Read More »

काँग्रेस-डिमकेच्या आघाडीत कमल हसनही सहभागीः जागा वाटपावर शिक्कामोर्तब

इंडिया आघाडीतील तामिळनाडू राज्यातील डिमके अर्थात द्रविड मुनेत्र कझघम पक्षाबरोबर असलेली काँग्रेसबरोबरील आघाडीवर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे या आघाडीत दाक्षिणात्य स्टार कमल हसन यांचा मक्कल निधी मैय्यम हा पक्षही सहभागी झाला आहे. त्यामुळे तामिळनाडू मध्ये डिएमके पक्षाबरोबर काँग्रेस आणि मक्कल निधी मैय्यम हा पक्ष आघाडी म्हणून लोकसभा निवडणूकीला …

Read More »

काँग्रेसची ३९ लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहिरः राहुल गांधी वायनाड

आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने आपली ३९ उमेदवारांची यादी आज जाहिर केली. काँग्रेस नेते तथा राहुल गांधी हे उत्तर प्रदेशातील अमेठीबरोबरच केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज जाहिर करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र काँग्रेसने आज जाहिर केलेल्या ३९ उमेदवारांच्या यादीत दक्षिण भारतातील आणि ईशान्य भारतातील उमेदवारांची यादी …

Read More »

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला मणिपूर सरकारने परवानगी नाकारली

देशातील हिंदूत्ववादी राजकारणामुळे धार्मिक राजकारणाला मोठे बळ मिळत देश दोन धर्माच्या विचारधारेत विभागत असल्याच्या काही घटना घडल्या. त्यानंतर राजकिय विचारधारेबरोबरच सामाजिक दुभंगलेपण देशात निर्माण होत असल्याची चर्चा सातत्याने विविधस्तरावर सुरु झाली. या पार्श्वभूमीवर कोणत्याही राजकिय हेतूशिवाय काँग्रेस नेते राहुल गांधी आणि काही सामाजिक संघटनांनी देशात निर्माण झालेले दुभंगलेपण कमी करण्याच्या …

Read More »