Tag Archives: legislative council

काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांनी घेतली उद्धव ठाकरे यांची भेट विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदासाठी घेतली भेट

विधान परिषदेतील शिवसेना उबाठाचे आमदार तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे आमदाराकीचा कालावधी संपुष्टात आला. त्यामुळे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेत पदा सध्या रिक्त आहे. तर शिवसेना उबाठाच्या संख्याबळानंतर काँग्रेसचे सर्वाधिक संख्याबळ आहे. त्यामुळे विधान परिषदेतील रिक्त झालेल्या विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेसने दावा केला आहे. त्यातच काँग्रेस आणि शिवसेना उबाठा हे …

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देणार

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …

Read More »

उद्धव ठाकरे जनसुरक्षा विधेयकावर म्हणाले, विरोधकांना त्रास देण्यासाठी कायदा विधान परिषदेत विशेष जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात सभात्याग, बहुमताने विधेयक मंजूर

विधानसभेनंतर महाराष्ट्राचे बहुचर्चित जन सुरक्षा विधेयक शुक्रवारी विधान परिषदेत बहुमताने मंजूर करण्यात आले. प्रचंड गदारोळात गृह राज्यमंत्री (शहर) योगेश कदम यांनी सभागृहात विधेयक मांडले. विधानसभेत जन सुरक्षा विधेयक सादर केले. त्यावर चर्चा झाल्यानंतर, विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. विधानसभेत मंजूर झाल्यानंतर योगेश कदम यांनी शुक्रवारी विधान परिषदेत हे विधेयक सादर …

Read More »

मुद्दा मराठी माणसाच्या हक्काच्या घराचाः पण शिवसेनेच्या दोन गटात गद्दारीवरून रंगला वाद अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात गद्दारीवरून एकमेकांना धमकी

मागील काही दिवसांपासून मराठी -अमराठीचा वाद सातत्याने चांगलाच रंगला आहे. त्यातच मराठी माणसांना मुंबईतील विविध सोसायट्यांमध्ये घरे नाकारण्याचा प्रकारातही चांगलीच वाढ होत आहे. या मुद्यावरून आज विधान परिषदेत शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात चांगलीच शाब्दीक वाक्ययुद्ध रंगल्याचे चित्र पाह्यला मिळाले. विधान परिषदेत यासंदर्भात शिवसेना उबाठाचे …

Read More »

अंबादास दानवे यांचा सवाल, एक रूपयांची संपत्ती नावावर नसताना ६५ कोटींची निविदा कशी भरली? सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हॉटेल खरेदी प्रकरणी अडचणीत

२०२४ च्या विधानसभा निवडणूकीत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञा पत्रामध्ये मुलगा सिद्धांत शिरसाट याच्या नावे एक रूपयांची मालमत्ता नसल्याची माहिती दिली होती. तसेच त्यांच्या नावे कोणतीही संपत्ती नसल्याचे सांगितले होते. मग कोणतीही मालमत्ता आणि संपत्ती नावे नसताना हॉटेल विट्स खरेदी …

Read More »

दादाजी भुसे यांची स्पष्टोक्ती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा शासनाचा प्रयत्न यु-डायस प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या घसरलेली

शासन विद्यार्थ्यांची घटती पटसंख्या, शाळाबाह्य विद्यार्थी आणि शिक्षणाच्या गुणवत्तेसंदर्भात गंभीर असून सर्वंकष उपाययोजना राबवत आहे. यु-डायस (UDISE) प्रणालीच्या आकडेवारीनुसार विद्यार्थ्यांची संख्या काहीशी घसरलेली असली तरी त्यामागील कारणे समजून घेऊन योग्य ती कार्यवाही केली जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी विधानपरिषदेत सांगितले. नियम ९२ अन्वये अर्धातास चर्चेला उत्तर देतं मंत्री भुसे बोलत …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, अंमलीपदार्थ तस्करी ‘मकोका’ अंतर्गत कारवाई कायद्यात बदल करणार असल्याचे दिले आश्वासन

‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. विधान परिषद सदस्य डॉ.परिणय फुके, एकनाथ खडसे यांनी ड्रग तस्करी संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील …

Read More »

स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या गाण्यावरून विधान परिषेदत गोंधळ कुणाल कामरा यांना अटक करण्याची भाजपा सदस्य प्रसाद लाड यांची मागणी

स्टॅड अप कॉमेडियन कुमाल कामरा याने महाराष्ट्रातील राजकिय परिस्थितीवर आणि दिल्लीतील पंतप्रधान मोदी यांच्यावर विडंबनात्मक गायलेले गाण आज सकाळी प्रसारीत झालं. त्या गाण्यावरून विधान परिषदेत भाजपाच्या सदस्यांनी गोंधळ घालत सभागृहाचे कामकाज बंद पाडले. तर भाजपाचे प्रसाद लाड यांनी कुणाल कामरा याने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी …

Read More »

दिशा सालियन मृत्यू प्रकरणः चित्रा वाघ-मनिषा कायंदे-अनिल परब वाद, कामकाज स्थगित आदित्य ठाकरे यांच्या कथित नावावरून भाजपा आणि- शिवसेना उबाठा आक्रमक

बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंह राजपूत यांची व्यवस्थापन दिशा सालियन हिच्या मृत्यू प्रकरणी दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी जवळपास पाच वर्षानंतर नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्या याचिकेत शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरे यांचे नाव त्या याचिकेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर न्यायालयात जर एखादी याचिका दाखल आणि …

Read More »

नीलम गोऱ्हे यांच्या विरोधातील अविश्वास ठराव सत्ताधाऱ्यांनी जिकला, पण विरोधकांना बोलू न देता फेटाळलेला प्रस्ताव पुन्हा आणून प्रस्ताव जिंकला

विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश केल्याच्या विरोधात आणि त्यांच्या पक्षपाती वागण्यावरून विरोधी पक्षाच्या शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांनी उपसभापती गोऱ्हे यांच्या विरोधात अविश्वासदर्शक ठराव आज चर्चेला आणण्यात आला. मात्र प्रस्ताव दाखल करणाऱ्या विरोधकांनाच या विषयावर बोलू न देता सत्ताधारी …

Read More »