Breaking News

Tag Archives: MahaNCPSpeaks

शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे १५ सप्टेंबर रोजी होणार लोकार्पण सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे १० सप्टेंबर रोजी येवल्यात होणार जल्लोषात स्वागत

येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीत १५ सप्टेंबर २०२४ रोजी करण्यात येणार आहे. तसेच १० सप्टेंबर २०२४ रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे येवला शहरात जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे. राज्याचे अन्न,नागरी …

Read More »

सुनिल तटकरे यांची माहिती, जनसन्मान यात्रेचा तिसरा टप्पा… राष्ट्रवादी काँग्रेसच्या संसदीय मंडळाची बैठक मुंबईत पार

जनसन्मान यात्रेचा नुकताच दुसरा टप्पा संपला असून आता तिसरा टप्पा कधी घ्यायचा याच्या नियोजनावर चर्चा झाली. शिवाय महायुतीच्या नेत्यांची जी बैठक पार पडली त्याअनुषंगाने मतदारसंघनिहाय आढावा घेणे आणि त्याचे नियोजन करण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले …

Read More »

प्रविण दरेकर यांची टीका, मविआने घोडे नाचवले तरी… नौटंकीला थारा नाही भाजपा गटनेते प्रविण दरेकरांची महाविकास आघाडीवर टीका करत तानाजी सावंत यांना दिला सबूरीचा सल्ला

छत्रपतींच्या पुतळ्याच्या आडून जे काही किळसवाणे राजकारण मविआतर्फे सुरू आहे ते थांबले पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेला छत्रपतींच्या पुतळ्याचे राजकारण करणे आवडत नाही. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी छत्रपती हे आमचे आराध्य दैवत आहे त्यासाठी एकदा काय शंभरदा नतमस्तक व्हायला लागले तरी होऊ, अशी कुठलाही अहंभाव न ठेवता भुमिका घेतली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी …

Read More »

अजित पवार यांचे प्रत्युत्तर,… माझ्या अंगाला काही छिद्रं पडत नाहीत तानाजी सावंत आणि भाजपाच्या गणेश हाके यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले मत

मागील दोन अडीच वर्षापासून राज्यातील महायुती सरकारचा कारभार विनाविघ्न आणि कुरबुरीविना सुरु असल्याचा देखावा किंवा राजकिय गरज म्हणून तसे चित्र राज्याच्या राजकारणात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच सहकारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाची नवी खेळी आता नव्याने महायुती सरकारकडून सुरु झाली आहे. …

Read More »

सुनिल तटकरे यांचा टोला,… ठाकरेंना दिलेली सुरक्षा पाळत ठेवण्यासाठी होती का? महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी

महिलांवर होणारे अत्याचार हे अत्यंत निंदनीय आणि दुर्देवी आहेत. अत्याचार करणार्‍या नराधम विकृत प्रवृत्ती ठेचून काढल्या गेल्या पाहिजेत हे पक्षाचे आणि वैयक्तिक मत आहे आणि सरकारमधील सर्व नेत्यांचेही तेच मत आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना आपला संताप व्यक्त केला. पुढे बोलताना सुनिल तटकरे …

Read More »

अजित पवार, पार्थ पवार विधानसभा निवडणूकीचे स्टार प्रचारक राष्ट्रवादीकडून २५ स्टार प्रचारकांची घोषणा-प्रभारी सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची माहिती

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहिर केलेले विधानसभा निवडणूकीच्या तारखा जाहिर केली असून जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा आज केली. या स्टार प्रचारकांची यादीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याबरोबरच त्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांचेही नाव स्टार प्रचारक म्हणून जाहिर केले. या दोघांसह पक्षाच्या २५ नेत्यांची …

Read More »

अजित पवार यांच्या हस्ते, महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ उपक्रमाचे उद्घाटन भ्रष्टाचाराबाबतही तक्रारी करता येणार

राज्यात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे त्यामध्ये विशेषतः महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठीच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘महा – राष्ट्रवादी व्हॉटसअप हेल्पलाईन’ हा नवीन उपक्रम तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांपर्यंत जलदगतीने पोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे हा उपक्रम राज्यातील महिलांसाठी जीवनदायी ठरणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, माझी लाडकी बहिण योजनेचा शानदार शुभारंभ लाडक्या बहिणींच्या जीवनात सुखाचे-आनंदाचे क्षण यावे हीच या भावाची इच्छा

महिलांच्या ढोल आणि लेझीम पथकाचे सादरीकरण, उत्सवाच्या वातावरणात सजलेला आणि महिला भगिनींनी फुललेला शिवछत्रपती क्रीडानगरीचा परिसर, महिलांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहणारा आनंद आणि मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांनी महिलांना दिलेल्या शुभेच्छा… अशा उत्साहपूर्ण वातावरणात ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजने’चा पुणे येथे राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. महिलांच्या जीवनात सुखाचे, आनंदाचे दिवस यावे हीच भाऊ म्हणून प्रामाणिक इच्छा …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, बारामतीतून ७-८ वेळा निवडणूक लढवलीय आता… सुपुत्र जय पवार यांना उमेदवारी देण्याबाबत जनताच निर्णय घेईल

मागील काही दिवसांपासून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार हे सातत्याने चर्चेत आहेत. त्यातच अजित पवार यांनी जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राचा दौरा सुरु केला आहे. या निमित्ताने महिला वर्गाला आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्यदिनी ‘संविधान वाचन’ उपक्रम राबवणार जनसन्मान यात्रेला पाच दिवसात अभूतपूर्व प्रतिसाद ;महिलांची उपस्थिती लक्षणीय...

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने स्वातंत्र्य दिनी ‘संविधान वाचन’ असा उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रात पक्षाच्या मुख्य कार्यालयात व प्रत्येक जिल्हा कार्यालयात ध्वजारोहणानंतर साजरा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत आज दिली. सुनिल तटकरे पुढे बोलताना म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत संविधानाबाबत प्रश्न निर्माण करण्यात आला होता. देशाचे संविधान हा …

Read More »