Breaking News

Tag Archives: mahatma gandhi

काँग्रेस नेते जयराम रमेश यांचा सवाल, पंतप्रधान कुठे उभे गांधी, की नथुरामच्या बाजूने या तीन प्रश्नांची उत्तरे द्या

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विदर्भातील महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येणार असल्याने काँग्रेसने शुक्रवारी त्यांना महात्मा गांधी आणि हिंदूत्ववादी संघटनेचे सदस्य राहिलेले आणि गांधी यांचे मारेकरी नथुराम गोडसे यांच्याबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी करत पंतप्रधान मोदी नेमके गांधींच्या बाजूने की नथुराम गो़डसे यांच्यात नेमके कोठे …

Read More »

पंतप्रधान मोदींची टीका, काँग्रेस टुकडे टुकडे गँग आणि शहरी नक्षली… काँग्रेसला गणपती पूजेची अडचण

विश्वकर्मा जयंती आणि केंद्र सरकारच्या पीएम विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती निमित्त वर्धा येथे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आगमन झाले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी वर्धा येथे महाराष्ट्र सरकारच्या आचार्य चाणाक्य कौशल्य विकास केंद्र योजनेचा शुभारंभही करत पीएम मित्र प्रकल्पाचे आणि पुण्याश्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभही यावेळी केला. यावेळी …

Read More »

राहुल गांधी यांनी उडविली पंतप्रधान मोदी यांच्या महात्मा गांधी यांच्यावरील त्या वक्तव्याची टिंगल महात्मा गांधी यांना जाणून घेण्यासाठी एन्टायर पॉलिटीकल सायन्सच्या विद्यार्थ्यांना पिक्चर बघण्याची गरज

लोकसभा निवडणूकीच्या निमित्ताने मागील काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अचाट वक्तव्यावरून सातत्याने कोणता ना कोणता तरी वाद निर्माण होत आहे. त्यातच नुकत्याच एका खाजगी वृत्त वाहिनीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलाखत दिली. या मुलाखतीत पंतप्रधान मोदी यांनी महात्मा गांधी यांना कोणी ओळखत नव्हते असे धांदात बुध्दीची किव करणारे वक्तव्य …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा इशारा, नथुराम गोडसेचे उदात्तीकरण खपवून घेणार नाही

महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. देशासाठी त्यांनी संपूर्ण जीवन समर्पित केले. स्वातंत्र्य लढ्यातील महात्मा गांधींच्या अतुलनीय योगदानामुळे आजचा प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या अभिमाने साजरा करतो आहे. पण प्रजासत्ताक दिन साजरा करण्याऐवजी महात्मा गांधी यांची हत्या केलेल्या नथुराम गोडसेच्या समर्थनार्थ पंढरपुरात काही समाजकंठकांनी जयजयकाराच्या घोषणा देत पोस्टरबाजी …

Read More »

अहिंसावादी महात्मा गांधी यांच्या जयंती दिवशीच पोलिसांकडून बळाचा वापर मै भी गांधी इंडिया आघाडीची पदयात्रा पोलिसांनी रोखली

आज दोन ऑक्टोंबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती. या जयंतीचे औचित्य साधत केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकारच्या धोरण आणि मनमानी पध्दतीच्या कारभारा विरोधात इंडिया आघाडीच्या काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, समाजवादी पार्टी आणि आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्ये आणि नेत्यांनी मै भी गांधी ही पदयात्रा काढली. परंतु, सदरची पदयात्रा फॅशन स्ट्रीटजवळ पोहोचताच …

Read More »

अतुल लोंढे यांचा सवाल, भाजपा सत्तेत असतानाच ‘गोडसेच्या औलादी’ का फोफावतात ? अतिरेकी नथुराम गोडसेचे उदात्तिकरण करणाऱ्या सदावर्तेला बेड्या ठोका

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी अतिरेकी नथुराम गोडसेचा उदो उदो करण्याची प्रवृत्ती देशात बळावत चालली आहे. नथुराम गोडसे हा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा खुनी आहे हे जगजाहीर असताना त्याचे गुणगान गाण्याची हिम्मत फक्त भारतीय जनता पक्षाचे सरकार असतानाच होते. सदावर्ते नावाच्या एका विकृत इसमाने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या वार्षिक अहवालावर …

Read More »

नाना पटोले यांचा थेट सवाल, देवेंद्र फडणवीस आता संभाजी भिडेला फाशी देणार का? संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का ?

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल संभाजी भिडेने अत्यंत अश्लाघ्य भाषा वापरून अकलेचे तारे तोडले आहेत. संभाजी भिडे सातत्याने महापुरुषांबद्दल अवमानकारक विधाने करत असतो पण भाजपा सरकार त्याविरोधात कारवाई करत नाही. भाजपाला संभाजी भिडेच्या माध्यमातून मणिपूरसारखा महाराष्ट्र पेटवायचा आहे का? असा संतप्त सवाल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. राष्ट्रपिता महात्मा गांधी …

Read More »

महात्मा गांधी यांचे विचार कृतीत आणण्यासाठी शासन प्रयत्नशील राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप

सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्य लढ्याशी जोडून बापूजींनी तो लढा खऱ्या अर्थाने एका मोठया जनांदोलनात परावर्तित केला. बापूजी सर्वसामान्य माणसाच्या सेवेला ईशसेवा – देशसेवा मानत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपित्याचे विचार कृतीत आणण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न सुरू केले आहेत. समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी जाणिवेने काम केले जात आहे म्हणून राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता …

Read More »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली, राष्ट्रपिता महात्मा गांधी एक अनुभूती या नव्या उपक्रमास मान्यता सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाच्या कामांसाठी ८१ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत आज सेवाग्राम विकास आराखड्यांतर्गत करण्यात येत असलेल्या कामांसाठी ८१.५७ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला तसेच एकूण २४४.०८७ कोटी रुपयांच्या सुधारित सेवाग्राम आराखड्यास मान्यता देण्यात आली. सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत करावयाची कामे ही वेळेत पूर्ण व्हावीत तसेच त्या कामांचा दर्जा उत्कृष्ट …

Read More »

हिंमत होती तर जीनांवर गोळी झाडायची?, शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातायत शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप आणि आव्हान

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवसांपासून उत्तर प्रदेशात शिवसेनेच्या उमेदवारांचे अर्ज सुरुवातीला स्विकारले जातात आणि नंतर तेच अर्ज वेगवेगळी कारणे दाखवून रद्द करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करत निवडणूक अधिकारी, जिल्हा दंडाधिकारी या प्रकरणावर सुनावणी करण्यासही तयार नाहीत. हे सगळं भाजपाच्या दबावामुळे होत असल्याचा आरोप शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय …

Read More »