Breaking News

Tag Archives: mumbai

बागेसाठी आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवावे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आदेश

आरक्षित जागेवरील बेकायदेशीर बांधकाम त्वरित थांबवून परिसर सील करण्याचे निर्देश पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. अंधेरी पश्चिम येथील के. ईस्ट वॉर्ड येथे आज झालेल्या ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी आमदार अमित साटम, भारती लव्हेकर सर्व विभागाचे अधिकारी आणि …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, मुंबईकरांसाठी राज्य सरकार वेगाने निर्णय घेतेय चर्नी रोड रेल्वे स्थानकात तात्पुरत्या स्वरुपात तिकीट खिडकी सुरु

मुंबईकरांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना सुविधा निर्माण करुन देण्यासाठी राज्य शासन वेगाने निर्णय घेत आहे. शहराचे सौंदर्यीकरण वाढवणे, अधिकाधिक मुलभूत सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देणे यावर राज्य शासनाचा भर आहे. त्यामुळेच चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या दक्षिण बाजूकडील तिकीट खिडकी तात्पुरत्या स्वरुपात पूर्ववत सुरु करुन नागरिकांची गैरसोय दूर करण्यात आली आहे. यापुढील …

Read More »

दिपक केसरकर यांची ग्वाही, मुंबईतील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणार

मुंबई शहर हे देशाची आर्थिक राजधानी आहे. देशातील सर्वच भागातून रोजगारासाठी अनेकजण याठिकाणी येतात. त्यामुळे अनेकांना झोपडपट्टीत निवारा शोधावा लागतो. शहरातील झोपडपट्टीचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसमावेशक धोरण राबविणार असल्याचे शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे सांगितले. फोर सेशन हॉटेल, वरळी येथे …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा, ९० दिवसात मुंबईचा कायापालट स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० चा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ

स्वच्छता अभियानात महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर असून आता स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) २.० अंतर्गत स्वच्छ, सुंदर आणि कचरामुक्त शहरे ही लोकचळवळ बनणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. यशवतंराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी (२.०) चा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची घोषणा, मुंबईत नेत्रविकारांसाठी विशेष रुग्णालय मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचारासाठी आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करावा

मुंबईकरांना दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळण्यासाठी उपलब्ध आरोग्य सुविधांचा पुनर्विकास जलदगतीने करण्यात यावा. मुंबईत नेत्र विकारांसाठी विशेष रुग्णालय करावे, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मुंबईत सध्या महापालिकेमार्फत १९ उपनगरीय रुग्णालयांचे बांधकाम सुरू असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. देशभरातून कर्करोगाच्या उपचारासाठी मोठ्यासंख्येने रुग्ण येथील …

Read More »

मुंबईतील गणेशोत्सवांना आणखी १५ देशांच्या महावाणिज्य दूतांनी दिल्या भेटी गणेशोत्सव जगातील महाउत्सव बनेल-- पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा

विविध देशांतील महावाणिज्य दूतांना मुंबईतील मानाच्या गणरायांचे दर्शन घडविण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून परदेशात प्रचार-प्रसार होऊन लाखो भाविक पर्यटक गणेशोत्सवासाठी महाराष्ट्रात येतील आणि नजिकच्या काळात हा उत्सव जगातील महाउत्सव बनेल, असा विश्वास पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होणाऱ्या गणेशोत्सवाची जगभरात ओळख व्हावी यासाठी शासन …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न करता दिले ‘हे’ स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर अखेर राजभवनाकडून भगतसिंग कोश्यारी यांचे एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात त्यांनी कालच्या वक्तव्याबाबतचे फक्त स्पष्टीकरण दिले. तसेच त्या वक्तव्याबाबत कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. अंधेरी मुंबई येथे२९ जुलै २०२२ रोजी चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी …

Read More »

राज्यपालांच्या त्या वक्तव्यावर शरद पवार म्हणाले, टोपीचा आणि अंत:करणाचा रंग सारखाच.. काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही

मुंबई आणि ठाण्यातून राजस्थानी आणि गुजराती बाहेर काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. त्यामुळे मुंबईला आर्थिक राजधानी कोणीही म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्याने राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आणि त्याचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. काँग्रेस आणि शिवसेनेकडून हे पार्सल पाठवून देण्याची मागणी करण्यात येत आहे. …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, राज्यपाल कोश्यारींची उचलबांगडी करा मुंबईबद्दलचे राज्यपालांचे वक्तव्य संतापजनक, महाराष्ट्राची माफी मागा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबदद्ल अनावश्यक वक्तव्य करून मुंबई व महाराष्ट्राचा अपमान केला आहे. मुंबई उभारण्यात मराठी माणसाचेच योगदान सर्वात जास्त आहे हे त्यांनी विसरू नये परंतु अभ्यास न करता कोश्यारी यांनी बोलून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे तसेच कोश्यारी यांची महामहिम …

Read More »