Breaking News

Tag Archives: opposition leader

अमित शाह यांची राहुल गांधी यांच्यावर टीका, फूट पाडणाऱ्यांच्या मागे उभे राहुल गांधी यांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावरून केली टीका

काँग्रेस खासदार राहुल गांधी हे त्यांच्या परदेश दौऱ्यांदरम्यान ‘भारतविरोधी’ आणि ‘देशविरोधी’ वक्तव्य करत असल्याबद्दल सडकून टीका करत राहुल गांधींनी “नेहमीच देशाच्या सुरक्षेला धोका दिला आहे आणि भावना दुखावल्या असल्याची टीका, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली. अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, देशात फूट पाडण्याचा कट रचणाऱ्या शक्तींच्या पाठीशी उभे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचे आव्हान, …कोणाला फाशी दिली त्याचे नाव जाहिर करा खुद्द मुख्यमंत्र्यांकडून फेक नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न

राज्यात वाढत्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांवरून संतापाची लाट उसळलेली असताना दुसरीकडे मुख्यमंत्री मात्र भर सभेत खुलेआम जनतेशी खोटं बोलून स्वतःची पाठ स्वतःच थोपटून घेत आहेत. खुद्द मुख्यमंत्रीच दोन महिन्यात एका आरोपीला फाशी दिल्याचे सांगत फेक नरेटीव्ह सेट करत आहेत. पराभवाच्या चिंतेने ग्रासल्यानेच फेकू सरकारच्या नेत्यांची फेकाफेकी सुरु असल्याची सांगत विधानसभा विरोधी …

Read More »

राहुल गांधी यांची रेल्वे कर्मचाऱ्यांना भेटलेः रेल्वे विभाग म्हणतो, दिल्लीच्या बाहेर रेल्वेच्या दाव्याला मात्र लोको पायलट यांचा विरोध

सध्या लोकसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. मात्र मध्येच मोहरम सणाच्या सुट्टी आहे. मात्र काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रेल्वे विभागातील लोको पायलटची अर्थात रेल्वे-ड्रायव्हरची भेट घेत, त्यांच्या अडचणी जाणून घेत, रेल्वेला भेडसावत असलेल्या विविध अडचणींची माहिती जाणून घेतली. दरम्यान रेल्वेच्या लोको पायलट हे दिल्ली विभागातील नसलेल्या आणि बाहेरून आणलेल्या लोको …

Read More »

दिलगिरीचे पत्र दिल्यानंतर अंबादास दानवे यांचा निलंबन कालावधी झाला कमी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत केला निर्णय जाहिर

संसदेचे सध्या अधिवेशन सध्या सुरु आहे. या अधिवेशाच्या सुरुवातीला राष्ट्रपतीचे भाषण झाले. राष्ट्रपतींच्या भाषणावरील चर्चेदरम्यान लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील काही वक्तव्य केली. त्या वक्तव्याचे पडसाद सध्या राज्यातील विधिमंडळाच्या सुरु असलेल्या अधिवेशनात उमटले. त्यावरून भाजपाचे आमदार प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यात …

Read More »

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पाच दिवसांसाठी निलंबित प्रसाद लाड-अंबादास दानवे शिवीगाळ प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हे यांची घोषणा

लोकसभेत राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणाचे पडसाद विधान परिषदेत उमटले. भाजपा सदस्य प्रविण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी निषेधाचा ठराव मांडण्यावरून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. त्यावरून अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांच्यात काल संध्याकाळी शाब्दीक बाचाबाची झाली. त्यावरून भाजपाच्या सदस्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर …

Read More »

राहुल गांधी यांचा प्रहार, हिंदू धर्माच्या नावाखाली तुम्ही हिंसा घडवताय पंतप्रधान नरेंद्र मोदी राहुल गांधी यांचे भाषण ऐकण्यासाठी स्वतः लोकसभेत उपस्थित

संसदेत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या सदस्यांनी NEET परिक्षा लिकच्या प्रकरणी चर्चेची मागणी केली. मात्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी चर्चेची मागणी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी साभात्याग केला. त्यानंतर लोकसभेत राष्ट्रपती यांच्या अभिभाषणावरील आभार प्रदर्शनावरील चर्चा लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी उपस्थित केली. त्यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल …

Read More »

उदय सामंत यांची माहिती, दावोसच्या सामंजस्य कराराबाबत श्वेतपत्रिका काढणार तीन वर्षात केलेल्या सामंज्यस करारावर श्वेत पत्रिका काढणार

थेट परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्राला सलग दोन वर्ष प्रथम स्थानावर ठेवण्याचे काम उद्योग विभागाच्या माध्यमातून झाले असून मोठ्या प्रमाणात परदेशी उद्योग समूह राज्यात गुंतवणूक करण्यास इच्छुक आहेत. दावोस येथे गेल्या तीन वर्षांत राज्याने केलेल्या विविध सामंजस्य करारांची (एमओयू),गुंतवणूक प्रकल्पाबाबतची माहिती देणारी श्वेतपत्रिका उद्योग विभाग प्रसिद्ध करणार असल्याचे घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, अंतरीम अर्थसंकल्पातून कंत्राटदारांना पोसण्याचं काम

पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पात कंत्राटदारांना पोसण्याचं काम या सरकारने केलं आहे. जनतेच्या हाती केवळ भोपळा देण्याचं काम सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर विविध विषयांवर जोरदार हल्ला चढविला. अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने आणलेला सहकार विधेयक हे …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, अंतरिम अर्थसंकल्पातून राज्यातील तिजोरीची लूट

बेरोजगार, गोरगरीब, शेतकरी व सर्वसामान्यांवर अर्थसंकल्पातून अन्याय करणारा असून सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा राज्याची तिजोरी लुटणारा असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत हा अंतरिम अर्थसंकल्प बेरोजगार, गोरगरीब, शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय न देणारा असल्याचा आरोप केला. तसेच जनतेच्या हितविरोधी असलेल्या या अर्थसंकल्पाचा निषेध करत युती …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …

Read More »