Breaking News

Tag Archives: pune

मंत्रिमंडळ उपसमितीने ७० हजार कोटी गुंतवणुकीच्या प्रकल्पांना दिली मान्यता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

राज्यातील विदर्भ, मराठवाडा, नाशिक, पुणे या भागातील औद्योगिक विकासाला चालना देत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या चौथ्या बैठकीत ७० हजार कोटी रुपयांच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता देण्यात आली. यामुळे सुमारे ५५ हजार रोजगार निर्मिती होणार आहे. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीस पोषक वातावरण असून उद्योगांना सवलत देण्याचं राज्य शासनाचे धोरण आहे. सकारात्मक …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, पुणे मनपात मागील पाच वर्षात ‘अर्थाचा अनर्थ’ झाला पुण्यातील पावसाच्या संकटाची शास्त्रीय चौकशी व्हावी...

मराठवाड्यातील शेतकऱ्यांची झालेली हानी आणि पुणे शहराची प्रचंड वाताहात लक्षात घेता सरकारने जनतेच्या मदतीला जायला पाहिजे होते मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचे दिल्लीला सांभाळण्यात दिवस जात असल्याची जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. जयंत पाटील म्हणाले, पुण्यात प्रलय आल्याने शहराची …

Read More »

अजित पवार म्हणाले, या सरकारला १०० दिवस झाले तरी यांच्यासमोर भलतीच कामे.. दोन्ही पिके वाया गेली ओला दुष्काळ आणि मदत जाहीर करा

महाराष्ट्रात पावसाने शेतकऱ्यांचे खरीप व रब्बी ही दोन्ही पिके वाया गेली असून सरकारने ओला दुष्काळ जाहीर करतानाच आपला शेतकरी राजा कसा उभा राहिल यासाठी तातडीची मदत जाहीर करावी अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केली. मुंबईतील बॅलार्ड पिअर्स येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार …

Read More »

‘नव्या पुण्याच्या शिल्पकारांनी‘ केलेला विकास पुण्याच्या रस्त्यावरून वाहतोय

पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात मागील २४ तासापेक्षा जास्त काळ सतत पाऊस पडत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी गटारीतून वाहण्याबरोबरच पुण्याच्या रस्त्यावर आणि घराघरात पाणी शिरले. तर अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचे तळे झाले. तर अनेक नागरीकांची वाहने पावसाच्या पाण्यात वाहून जाताना दिसत होते. त्यामुळे पुणे पावसाच्या पाण्यात बुडाल्याचे दिसत होते. या …

Read More »

पुण्यातील त्या घोषणेवरून मुख्यमंत्री शिंदेंचा इशारा, असले नारे खपवून घेणार नाही.. उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, त्यांना सोडणार नाही

पुण्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान जिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. या घटनेची दखल राज्य सरकार व गृहविभागाने गांभीर्याने घेतली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “ज्यांनी पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा दिल्या त्यांना सोडणार नाही,” असं म्हणत गंभीर इशारा दिला आहे. तर, आता या गंभीर …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, मग केंद्र सरकार त्या संघटनांवर बंदी का घालत नाही? पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांवर कडक कारवाई करा

दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवल्याच्या आरोपाखाली एनआयए, ईडी या केंद्रीय यंत्रणांनी पुण्यासह महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छापेमारी करून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) संघटनेच्या अनेकांची धरपकड करताना पुण्यात काही लोकांनी पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या हे अत्यंत निषेधार्ह आहे. अशा घोषणा देणाऱ्या व दहशतवाद्यांचे समर्थन करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. कोणतीही संघटना धार्मिक …

Read More »

खासदार गिरिश बापट यांचा घरचा आहेर; सत्तेसाठी पक्षनिष्ठा, वैचारीक बासनात… भाजपावरच केला वार

सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपाही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, अशा शब्दात भारतीय जनता पक्षाचे पुण्याचे खासदार गिरिश बापट यांनी सध्याच्या …

Read More »

वाहतूक कोंडीचा फडका बसल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले ‘हे’ आदेश शासन जनतेसाठी आहे, त्यांना त्रास व्हायला नको

 मुंबईहून आपल्या मूळ गावी जाताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुण्यातून पुढे जाताना त्यांना चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा फटका बसला. त्यामुळे तातडीने चांदनी चौकातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी लगेच बैठक बोलावून घेत आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश देत जनतेला दिलासा देण्यास सांगितले.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील चांदणी चौक …

Read More »

नितीन गडकरी म्हणाले, “दादा तुमच्यामध्ये ती ताकद आहे….” पुण्यातील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गडकरींचे विधान

पुणे: प्रतिनिधी पुण्यातील रिंगरोडचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आम्ही जमिन अधिग्रहणाच्या अनुषंगाने या संबधीची विचारणा आम्ही शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांनीही जमिनी द्यायची तयारी दर्शविली. मात्र त्याची किंमत जास्त सांगितली. त्यामुळे फक्त जमिन अधिग्रहणाच्या कामाची किंमत १८ हजार कोटी रूपयांवर जात असल्याने आमच्या अधिकाऱ्यांनी हे काम करू शकत नसल्याचे स्पष्ट …

Read More »

पालकमंत्री दत्ता भरणे म्हणाले, सोलापूरची तुलना पुण्याशी नकोच एकाच दिवसात शनिवारी होणार २ लाख जणांचे लसीकरण

सोलापूर : प्रतिनिधी सोलापूर जिल्ह्याच्या तुलनेत पुणे जिल्हा मोठा आहे. सिरम इन्स्टिट्यूटसह विविध सामाजिक संस्था व संघटना पुणे जिल्ह्यासाठी कोरोना लसींची उपलब्धता करून देत आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण होत आहे. आज राज्यामध्ये सर्वाधिक लसींचे डोस सोलापूर जिल्ह्याला मिळत आहेत. लसीकरणात सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱ्या स्थानी आला आहे. ही …

Read More »