Breaking News

Tag Archives: rahul gandhi

राहुल गांधीही १३ तारखेला मुंबईत भाजप शिवसेना सरकारच्या कामाचा करणार पंचनामा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी हे ही १३ ऑक्टोंबरला मुंबईच्या दौऱ्यावर येत आहेत. या एकाच दिवशी ते लातूर जिल्ह्यातील औसा, मुंबईतील चांदिवली आणि धारावी येथे त्यांची काँग्रेस उमेदवारांसाठी प्रचारसभा होणार आहे. मुंबईतील दोन मतदारसंघातील काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार नसीम खान, वर्षा …

Read More »

माजी खासदार एकनाथ गायकवाड मुंबईचे कार्यकारी अध्यक्ष काँग्रेस वर्किंग कमिटीकडून नियुक्ती जाहीर

मुंबईः प्रतिनिधी मागील काही दिवसांपासून मुंबईला अध्यक्ष नसल्याबाबतची ओरड होत होती. त्यामुळे अखेर मुंबई प्रदेशच्या कार्यकारी अध्यक्ष पदी माजी खासदार एकनाथ गायकवाड यांची नियुक्ती करण्यात येत असल्याची माहिती केंद्रीय काँग्रेस वर्किंग कमिटीने एका प्रसिध्दी पत्रकान्वये दिली. लोकसभा निवडणूकीत झालेल्या पराभवामुळे तत्कालीन मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे …

Read More »

राष्ट्रवादी, काँग्रेस पक्षात विलीन करणार हे वृत्त तथ्यहीन प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतिपादन

मुंबईः प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कॉग्रेस पक्षात विलीन होणार या बातम्यांमध्ये तथ्यता नाही असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केले आहे. गुरुवारी दहा जनपथ येथे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर देशात उलटसुलट बातम्यांचे पेव फुटले …

Read More »

एक्झीट पोलमधील भाजपोत्सवाने नेत्यांमधला उत्साह वाढीला पण २३ मे च्या शिक्कामोर्तबाची वाट

मुंबई: प्रतिनिधी नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणूकीच्या मतदानानंतर जाहीर झालेल्या एक्झीट आणि ओपिनियन पोलमध्ये भाजप पुरस्कृत रालोआला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे भाजपच्या राज्य आणि केंद्रामधील भाजप नेत्यांच्या उत्साहाला उधाण आलेले असले तरी २३ मे रोजी लागणाऱ्या निकालाच्या दिवसापर्यत पक्षाच्या संकल्प विजयावर शिक्कामोर्तब होण्याची वाट पहावी अशी …

Read More »

राफेलमधील चाेरीच्या कागदपत्रांची संरक्षण मंत्रालयाकडून चौकशी माहिती अधिकारात मंत्रालयाची स्पष्टोक्ती

मुंबईः प्रतिनिधी सर्वोच्च न्यायालयात राफेल खरेदी कराराच्या कागदपत्रांवरून मोदी सरकारकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहेत. तसेच याप्रकरणातील कागदपत्रे चोरीस गेल्याचा दावा केला करण्यात आला होता. या चोरीस गेलेल्या कागदपत्र प्रकरणाची संरक्षण मंत्रालयाकडून अंतर्गत चौकशी सुरु असल्याची माहिती अधिकार कायद्यांतर्गत आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली. माहिती अधिकारातंर्गत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर …

Read More »

अनिल अंबानींच्या उद्योगसमुहात सोनिया गांधीची गुंतवणूक भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांचा गौप्यस्फोट

मुंबई: प्रतिनिधी सोनिया गांधी यांनी अनिल अंबानी यांच्या म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्याचे त्यांच्या निवडणूक शपथपत्रात दिसते. रिलायन्स हायब्रिड बॉन्ड – जी या म्युच्युअल फंडात दोनवेळा १५,०३२ युनिट गुंतवणूक केल्याचे दिसते व त्याचे प्रत्येकी मूल्य ६,५५,६९५ रुपये आहे. शपथपत्रातील सातव्या पानावर ही माहिती आहे. राफेल विमान खरेदी प्रकरणात राहुल गांधी यांनी …

Read More »

कमी मतदानाच्या टक्केवारीने सत्ताधारी-विरोधक काळजीत ५ टप्प्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्याचे आव्हान

मुंबईः प्रतिनिधी लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील ९१ लोकसभा जागांकरीता गुरूवारी मतदान पार पडले. या ९१ पैकी महाराष्ट्रातील ७ जागांकरीताही मतदान झाले. मात्र या पहिल्या टप्प्यात ५५.९७ टक्के मतदान झाल्याने या कमी मतदानाचा फटका सत्ताधारी की विरोधकांना बसणार या चिंतेने महायुती आणि महाआघाडीतील राजकिय पक्षांना ग्रासले असल्याने पुढील ५ टप्प्यातील मतदानावेळी मतांची …

Read More »

राजकारण्यांनी वयाच्या ६० व्या वर्षी निवृत्त व्हावं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे मत

पुणेः प्रतिनिधी वयाच्या ६० व्या वर्षी राजकारणातून निवृत्त झालं पाहिजे असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं. राहुल गांधी यांनी पाच हजार महाविद्यालीयन विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अनेक प्रश्नांची दिलखुलास उत्तरं दिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी राजकारणात निवृत्ती असली पाहिजे का? असा प्रश्न विचारला असता आपण त्याच्याशी सहमत असल्याचं सांगितलं. …

Read More »

मोदींसारख खोट बोलून प्रगती करतो असे सांगायचे नाही काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांची टीका

नागपूर : प्रतिनिधी महिना १२ हजार रुपये प्रति महिना उत्पन्नापेक्षा एकही व्यक्ती देशात नको हे आम्ही ठरवले आहे. देशात कोणत्याही वर्गाचे उत्पन्न महिन्याला १२ हजारांपेक्षा कमी नको. भारताच्या २० टक्के सर्वात गरीब वर्गाच्या बँक खात्यात काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर पैसे जमा होतील याचं आश्वासन मी तुम्हाला दिले आहे. १५ लाख …

Read More »

भाजपच्या ‘मै भी चौकीदार’ ची सोशल मिडीयावर टींगल-टवाळी सोशल मिडीयातील ट्वीटर, व्हॉट्सअपवरून लघुकथा आणि उपरोधिक टोल्यांना महापुर

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा भाग म्हणून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘चौकीदार चोर है’ चा आरोप केला. मात्र या आरोपातील हवा काढून घेण्यासाठी भाजपकडून अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मै भी चौकीदार’ची घोषणा करत चौकीदार हा शब्द नावाआधी वापरण्यास सुरुवात केली. मात्र सोशल …

Read More »