Breaking News

Tag Archives: sachin sawant

वर्षा गायकवाड यांचा आरोप, मिठागरांची १५०० एकर जमीन अदानीला देण्याचा डाव मुंबईकरांच्या हक्काच्या जागा मोदानीच्या घशात घालाल तर याद राखा, गाठ धारावीकरांशी आहे !

पात्र-अपात्र मान्य नाही, धारावीकरांना धारावीतच घरे मिळाली पाहिजेत, धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आडून मोदानी सरकार पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मिठागरांच्या जमिनी फक्त मोदानी आणि कंपनीच्या फायद्यासाठी देत आहे. कांजूरमार्ग येथील २५६ एकर जमीनच नाही तर मुंबईतील मिठागराच्या सर्व जमिनी सरकार लाडक्या बिल्डर मित्राच्या घशात घालत आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील जवळपास १५०० एकर मिठागरांची …

Read More »

बदलापूर प्रकरणी काँग्रेसचा मंत्रालयावर धडक मोर्चा विजय वडेट्टीवार यांची टीका, महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स

महायुती सरकार एसआयटी सरकार आहे. कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते. परंतु कारवाई केली जात नाही. महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे अशा शब्दात विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली. त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का? असा संतप्त सवाल …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, सुशांतसिंह राजपूत…सीबीआय मात्र अद्याप गप्पच का? सुशांतसिंह प्रकरणी भाजपाकडून मविआ, मुंबई पोलीसांची बदनामी व सुशांतचे कुटुंब वेठीस

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूच्या तपासाला आज चार वर्ष झाली परंतु यासंदर्भातील तपास करणाऱ्या सीबीआयने आपला अहवाल अद्याप जाहीर केलेला नाही. भाजपाने सुशांतच्या आत्महत्येला हत्येचे रुप देऊन आपला कुटील राजकीय हेतू साधण्यासाठी वापर केला. मविआ सरकार असताना महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी नसल्याने बिहारमध्ये अत्यंत चुकीच्या पद्धतीने गुन्हा नोंदवून सीबीआयकडे तपास वर्ग …

Read More »

सचिन सावंत यांच्या एक्सवरील तक्रारीवरून निवडणूक आयोगाने घेतली गंभीर दखल

महाराष्ट्रासह देशात लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या कालावधीत घटनात्मक पदावर असलेल्या प्रमुख व्यक्तींकडून मुख्यमंत्री अथवा मंत्र्यांकडून आयोजित सरकारी बैठकांना उपस्थित राहता येणार नाही. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगल्यावर आयोजित केलेल्या बैठकांना मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी उपस्थित रहात आचारसंहिता भंग केल्या प्रकरणी एक्स या सोशल मायक्रो ब्लॉगिंक …

Read More »

सचिन सावंत यांचा आरोप, मोदी…. नापास जागतिक भूक निर्देशांकात पाकिस्तानपेक्षाही भारत खालच्या स्तरावर हे मोदींचे मोठे अपयश

जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला सामोरे जाणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार भारत आता पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशच्याही खाली घसरला आहे ही बाब आपल्यासाठी भूषणावह नाही. …

Read More »

गॅस सबसिडी सोडा म्हणता आणि भाजपा नेत्यांना करोडो रुपये अनुदान म्हणून वाटता ! जनतेला गॅस सबसिडी सोडा असे सांगणारे पंतप्रधान भाजपा नेत्यांना अनुदान सोडण्यासाठी कधी सांगणार? – सचिन सावंत

पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने विरोधी पक्षांच्या घराणेशाही व भ्रष्टाचारावर तोंडसुख घेत असतात पण त्यांना स्वतःच्या पक्षातील घराणेशाही व भ्रष्टाचार दिसत नाही. किसान संपदा योजनेची लाभार्थी भाजपा नेते विजयकुमार गावित यांची मुलगी व आसामचे मुख्यमंत्री हेमंतकुमार विश्वसरमा यांची पत्नी आहेत. हा आर्थिक परिवारवाद मोदींना दिसत नाही का? शेतकरी मजूबत करण्यासाठीच्या योजनेतून …

Read More »

सचिन सावंत यांचा सवाल, डॉ मोहन भागवतजी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आरक्षण कधी देणार? मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर सचिन सावंत यांचा सवाल

ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना समान पातळीवर आणेपर्यंत व भेदभाव संपेपर्यंत आरक्षण सुरुच रहायला हवे, संविधानाने दिलेले आरक्षण संघालाही मान्य आहे, हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे विधान दिशाभूल करणारे व फसवे आहे. मुळात संघ हा आरक्षण विरोधी आहे. संविधानाने दिलेले आरक्षण संपवण्याची भाषा संघाकडून सातत्याने केली जाते. …

Read More »

बाळा नांदगांवकरांच्या ट्विटवर सचिन सावंतांचा खोचक सवाल, अयोध्या दि ट्रॅप चा रचेता कोण? भाजपा खासदार बृजभूषण सरण सिंगवरील मनसेच्या भूमिकेवर केला सवाल

काही महिन्यापूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे उत्तर प्रदेशातील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. मात्र बृजभूषण सिंग हे पुण्यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला हजर राहिले. यावेळी खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंनी त्यांच्या दौऱ्याला विरोध न केल्याबद्दल आभारही मानले. यानंतर मनसे …

Read More »

गुजरातमधील बंदरांमध्ये आलेले हजारो किलो ड्रग्सचा मुंबईतील समस्येशी संबंध आहे का? मुंबईतील झोपडपट्टी परिसरातील ड्रग्सचा फैलाव थांबवा !: सचिन सावंत

मुंबईतील झोपडपट्टी परिसरात ड्रग्सचा फैलाव वाढत चालला आहे. युवा पिढी ही देशाचे भविष्य आहे. ड्रग्स च्या फैलावाने देशाचे भविष्य उध्वस्त होत तर आहेच पण अनेक कुटुंबाच्या आशा आकांक्षा ही ध्वस्त होत आहेत. यामागे फार मोठे रॅकेट असून आता शाळेतील मुले ही लक्ष्य होत आहेत. मध्यमवर्गीय गृहनिर्माण संस्थामध्येही याचा प्रसार होत …

Read More »

काँग्रेस म्हणते, शिंदे-फडणवीसांना मोदींचा वाढदिवस लक्षात पण स्वातंत्र्यसैनिकांचा विसर मराठवाड्यासह कुठेच दिसली नसल्याचे सचिन सावंत यांचे ट्विट

मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाला आजच ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. प्रथेप्रमाणे या दिवशी मुख्यमंत्री पदावर असलेल्या नेत्याकडून औरंगबाद किंवा मराठवाड्यात दिवसभर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर जायचे असल्याने त्यांनी अवघे १५ मिनिटे औरंगाबादेत हजेरी लावत तेलंगणा राज्यात निघून गेले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र …

Read More »