Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली

मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी …

Read More »

काँग्रेस नेते वेणुगोपाल ठाकरे यांना भेटल्यावर म्हणाले, आम्ही उध्दव ठाकरेंच्या सोबत…भेटीचे निमंत्रण संयुक्त पत्रकार परिषदेत दिली चर्चेची माहिती

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी आज मातोश्री येथे जाऊन शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर वेणुगोपाल यांनी माध्यमाशी बातचित केली. वेणुगोपाल म्हणाले की, उद्धव ठाकरे हुकूमशाहीविरोधात लढत आहेत आणि या लढाईत काँग्रेस त्यांच्यासोबत आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचा हाच निरोप घेऊन मी …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, संघाला असला कारभार चालतो का?… शेतकरी हवालदील अन हे रामभक्त म्हणून अयोध्येत

राज्यात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलो म्हणून माझ्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. पण मी माझ्या वाड-वडिलांपासून सांगत आलोय की आमचं हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदूत्व नाही. आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेले आहे. पण भाजपाने एकदा जाहिर करावं कि त्याचं हिंदूत्व हे नेमकं कशाचं हिंदूत्व आहे ते कदाचीत त्याचं हिंदूत्व हे गोमूत्रधारी …

Read More »

जयंत पाटील यांच्या “त्या” वक्तव्यावर भरसभेतच अजित पवार यांनी लावला कपाळाला हात भारत जर विश्वगुरू बनणार असेल तर त्यास आमचा पाठिंबा

मागील काही दिवसांपासून राज्यातील शिंदे-फडणीस सरकार कोसळणार असल्याच्या चर्चांना मोठ्या प्रमाणावर ऊत आला आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार हे भाजपासोबत पुन्हा जाणार असल्याच्या चर्चाही जोरात सुरु आहेत. नेमके महाराष्ट्र भुषण पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने मुंबई दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि अजित पवार यांची …

Read More »

अॅड आशिष शेलार यांचा खोचक सवाल , “हे” महाराष्ट्रात धारातीर्थी का पडत आहेत? अतिक बंधुच्या एनकाँऊटरवरून संजय राऊत, ठाकरेंवर साधला निशाणा

उत्तर प्रदेशमध्ये गोळ्या झाडल्या गेल्या आणि तुम्ही धारातीर्थी मुंबईंत का पडताय? असा सवाल भाजपा मुंबई अध्यक्ष आमदार अॅड आशिष शेलार यांनी उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांना विचारला आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांशी ते बोलत होते. अतिकचा एनकांऊटर झाला तो गुंड होता त्याची बाजू का घेताय? उत्तर परदेशमध्ये जी काल घटना घडली …

Read More »

भाजपा म्हणते,… खोटी माहिती देणे थांबवा कांजूर येथील १५ एकर जागा मेट्रो ६ च्या कारशेडला

केवळ स्वतःच्या हट्टापायी मेट्रो कारशेड कांजूर मार्गला हलवत मुंबईकरांवर २० हजार कोटी अतिरिक्त खर्च लादून प्रकल्पाला विलंब करणाऱ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा त्याबद्दल माफी मागावी व पत्रकार परिषदेत खोटी माहिती देणे आदित्य ठाकरेंनी थांबवावे अशी मागणी भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे. भाजपा प्रदेश प्रवक्ते …

Read More »

भाजपाचा काँग्रेस नेते राहुल गांधींना इशारा, …आधी माफी, मग पाय ठेवा सावरकर प्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अलीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. अशातच आता राहुल गांधी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर येऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. …

Read More »

त्या बैठकीनंतर संजय राऊत यांनी स्पष्टच केले, २०२४ च्या दृष्टीने प्रक्रिया सुरु उध्दव ठाकरेंच्या भेटीसाठी राहुल गांधी मातोश्रीवर येणार

काही दिवसांपूर्वीच शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्वो शरद पवार यांची मुंबईत सिल्व्हर ओकवर भेट घेतली. यानंतर गुरुवारी १३ एप्रिल रोजी शरद पवार यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राहुल गांधी उद्धव ठाकरेंना भेटणार …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आदित्य ठाकरे यांच्या गौप्यस्फोटावर नेहमीच्या स्टाईलमध्ये प्रत्युत्तर अरे जाऊ द्या रे.....

२१ जून २०२२ ला एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड आणि त्यानंतर शिवसेनेत पडलेली उभी फूट ही आपण पाहिली आहेच. त्यानंतर सातत्याने एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांचा उल्लेख गद्दार असा करण्यात येतो आहे. तसंच दोन्ही गटांकडून एकमेकांवर टीकाही होते आहे. अशात आदित्य ठाकरेंनी एक गंभीर आरोप एकनाथ शिंदेवर केला. एकनाथ शिंदे …

Read More »

त्या गौप्यस्फोटावर शिंदे गटाचे मंत्री म्हणाले, खोटं बोलण्याचं ट्रेनिंग सुरुय दिसतंय…. एजन्सी नेमलेली दिसतेय

राज्यात उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील बंडखोरीला जवळपास ९ महिन्याचा कालावधी उलटून गेला. तसेच या नऊ महिन्यात शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून सातत्याने वेगवेगळे खुलासे आतापर्यंत करण्यात आले. त्यानंतर आता पहिल्यांदाच बंडखोरी होण्यापूर्वी मातोश्रीवर गेलेल्या एकनाथ शिंदे यांनी काय केले आणि काय कारण सांगितले याबाबतचा नवा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे आमदार आदित्य …

Read More »