Breaking News

Tag Archives: shivsena (UBT)

सुषमा अंधारेंचा खोचक टोला, त्यांनी बोंब मारली असेल तर आपण समजून घेऊ ते वैरी असले तरी आम्ही त्यांच्या सुखाची आणि मांगल्याची कामना

उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी शिंदे गटासह भाजपावर उध्दव ठाकरे यांनी चौफेर टीका केली. त्यानंतर शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी १९ मार्चला उध्दव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर देणार असल्याचा इशारा दिला. यासंदर्भात ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना याबाबत विचारले असता त्या …

Read More »

काँग्रेसने भूमिका स्पष्ट करताच संजय राऊत म्हणाले, उध्दव ठाकरे पंतप्रधान पदासाठी उत्तम चेहरा राहुल गांधी यांनी लंडनमधील आवाहनानंतर संजय राऊतांनी केली भूमिका जाहिर

सध्या परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आगामी २०२४ च्या निवडणूकीत भाजपाचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्रित येण्याची गरज असल्याचे मत लंडन येथील भारतीय पत्रकार संघटनेने घेतलेल्या मुलाखती दरम्यान व्यक्त केले. त्यानंतर महाराष्ट्रात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी जे सोबत येतील त्यांना घेऊन जाऊ अशी …

Read More »

उध्दव ठाकरेंचा पलटवार, मी घरात बसून महाराष्ट्र सांभाळला पण तुम्ही दिल्लीसमोर… चोर वृत्तीला मतदान करून नका

भाजपा आणि एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांकडून कोरोना काळात उध्दव ठाकरे घराच्या बाहेर पडत नव्हते अशी जहरी टीका सातत्याने करण्यात येत आहे. या टीकेला खेड मधील सभेत प्रत्युत्तर देताना उध्दव ठाकरे म्हणाले, मी शून्य आहे. माझ्यामागे बाळासाहेब आहेत, म्हणून मला किंमत आहे. पण, गुजरातला सरदार वल्लभभाई पटेल, बंगालमध्ये सुभाषचंद्र बोस आणि …

Read More »

उध्दव ठाकरेंची टीका, देशद्रोही बोलाल तर जीभ हासडून देईन, मग संगमांचं काय… खेडमधील जाहिर सभेत शिंदे गटाबरोबर भाजपावर साधला निशाणा

केंद्रीय निवडणूक आयोगानं अलीकडेच ‘शिवसेना’ नाव आणि ‘धनुष्यबाण’ हे पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला बहाल केले. निवडणूक आयोगाच्या या निर्णयानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे पहिल्यांदाच रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभेनिमित्त आले होते. यावेळी झालेल्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही विधानावरून चांगलाच दम …

Read More »

महाविकास आघाडीतील वंचितच्या सहभागावर शरद पवारांची स्पष्टोक्ती, निवडणूकीला सामोरे जाताना…. मी चर्चेत नसतो त्यामुळे मला माहित नाही

पुणे जिल्ह्यातील कसबा आणि चिंचवडमधील पोटनिवडणूकीच्या काळात वंचित बहुजन आघाडीने कसबा मतदारसंघातील मविआचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांना पाठिंबा दिला. तर चिंचवडमधील मविआच्या उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा देण्याबाबत कोणीच विचारलं नसल्याचे थेट भाष्य करत बंडखोर उमेदवार राहुल कलाटे यांना प्रकाश आंबेडकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा जाहिर केला. त्यानंतर वंचितने …

Read More »

राज्यपाल आणि तपास यंत्रणांच्या विरोधात देशभरातील नऊ पक्षांचे पंतप्रधान मोदींना पत्र विरोधी पक्षांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय यंत्रणाचा वापर होतोय

भाजपाची सत्ता नसलेल्या आणि भाजपाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेणाऱ्या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच वर्षभरापासून तपास करून दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. त्यासाठी सुरुवातीला आयकर खात्याकडून नंतर ईडी मार्फत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईचा …

Read More »

कपिल सिब्बल यांच्या आवाहनाला उध्दव ठाकरे पाठिंबा देताना म्हणाले… लोकशाही वाचविण्यासाठी स्वतंत्र विचारमंचात सहभागी

२०१४ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणूकीत नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपाप्रणित रालोआने विजय मिळवित केंद्रात सत्ता स्थापन केली. तेव्हापासून आतापर्यंत राज्यघटनेतील तरतूदींना हरताळ फासत अनेक शासकिय यंत्रणा स्वतःच्या ताब्यात घेत विरोधकांना बेमालूमपणे मोडून काढण्याचे प्रयत्न सुरु असल्याचा विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यातच शिवसेनेतील विभाजनावरून आणि निवडणूक आयोगाने घेतलेली भूमिका याबाबत …

Read More »

राऊत यांच्यावरील कारवाईसाठी भाजपा आमदार राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली शिस्तभंग समिती ठाकरे गटाचा एकही सदस्य नाही शिंदे गटाचे आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आमदारांचा समावेश

भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यासह उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत बंडाचे निशाण फडकाविणारे एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांवर टीका करण्याच्या नादात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सध्याचे विधिमंडळ हे विधिमंडळ नसून चोर मंडळ असल्याचे वक्तव्य केले. यावरून विधिमंडळाच्या विधानसभेत आणि विधान परिषदेत पडसाद उमटत हक्कभंग प्रस्ताव आणण्यात आला. तसेच …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस सवाल, मग उध्दव ठाकरेही चोर मंडळाचे सदस्य ? विधान परिषदेत बोलताना फडणवीसांचा सवाल

संजय राऊतांनी आज कोल्हापूरात प्रसारमाध्यमांशी बोलताना विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ असा केला होता. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले. तसेच त्याचे पडसाद विधिमंडळाच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या सभागृहात उमटले. विधान परिषदेत संजय राऊत यांच्या वक्तव्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निषेध करत विधिमंडळाला चोर मंडळ म्हणणे हे सहन करण्यासारखं नाही. …

Read More »

संजय राऊतांच्या वक्तव्याचे विधानसभेत पडसादः पण हक्कभंग प्रस्तावावर अध्यक्षांची स्पष्टोक्ती दोन दिवसात तपासणी करून हक्कभंगाबाबत निर्णय घेऊ

संजय राऊतांनी आज कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधताना राज्यात विधिमंडळ नाही, तर ४० जणांचे चोरमंडळ, अशी टीका केली होती. राऊतांच्या या विधानानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापले असून या वक्तव्याचे पडसाद विधिमंडळात उमटले. भाजपा आणि शिंदे गटाच्या शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेतला. तसेच …

Read More »