Breaking News

Tag Archives: shivsena

प्रशांत परिचारक यांच्या बडतर्फीच्या मुद्यावरून शिवसेनेचा सभात्याग सरकारची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेतील भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीवरून शिवसेनेने पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारला अडचणीत आणले. मात्र परिचारक यांच्या आमदारकीबाबत सरकारची भूमिका स्पष्ट करण्याच्या मागणीवरून विधानसभेत सभात्याग केला. विधानसभेचे कामकाज सकाळी सुरु झाल्यानंतर प्रशांत परिचारक यांची …

Read More »

नाणार प्रकल्पासाठी भूसंपादन करणे अवघड मात्र निर्णय मुख्यमंत्री घेणार उद्योग मंत्री सुभाष देसाईंची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोकणातील नाणार येथे तीन पेट्रोलियम कंपन्यांकडून रिफायनरी प्रकल्प उभारण्यात येणार आहे. मात्र या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यावरण धोक्यात येत असल्याने १७ गावांपैकी १४ गावांच्या ग्रामपंचायतींनी जमिन भूसंपादनाच्या प्रक्रियेत विरोध दर्शविला असल्याने या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया करणे अवघड आहे. मात्र याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घेणार असल्याची …

Read More »

आमदार परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून कामकाज तहकूब शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सभागृहात घोषणाबाजी

मुंबई : प्रतिनिधी सैन्यातील कुटुंबियांच्या विरोधात अपशब्द वापरून अपमान करणाऱ्या भाजप पुरस्कृत आमदार प्रशांत परिचारकांना बडतर्फ करण्याच्या मागणीवरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत सभागृहाचे कामकाज दोनवेळा बंद पाडले. तर शिवसेनेच्या या मागणीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने सभागृहात पाठिंबा दिला. त्यामुळे विधानसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. विधानसभेचे कामकाज सुरु होताच शिवसेनेचे गटनेते तथा …

Read More »

परिचारक आणि मुंडेच्या निलंबनावरून शिवसेना- भाजप आमने-सामने शिवसेनेला भाजपकडून घरचा आहेर

मुंबई : प्रतिनिधी विधिमंडळातील विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर पैसे घेतल्याचा आरोप झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी या मागणीवरून भाजपने विधानसभा डोक्यावर घेतले. मात्र त्यांच्या मागणीला शिवसेनेने प्रतित्तुर देत भाजप पुरस्कृत प्रशांत परिचारक यांचे मागे घेण्यात आलेले निलंबन रद्द करावे अशी मागणी शिवसेनेने करत सत्ताधारी भाजपलाच घरचा आहेर …

Read More »

आणि भाजप आमदारांच्या आक्रमणाला आरोग्यमंत्र्यांकडून मोदींच्या नावाचे उत्तर क्षयरोगाच्या संशोधनासाठी जे.जे.रूग्णालयात केंद्र सुरु करण्याची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यात क्षयरोगग्रस्तांची संख्या वाढत असून या रोगावरील उपचार सेवेवरून भाजप आमदार पराग अळवणी, अतुल भातखळकर यांनी चांगलेच घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र २०२५ पर्यंत भारताला क्षयरोगमुक्त करण्याची घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्याचे सांगत आरोग्यमंत्री डॉ.दिपक सावंत यांनी भाजप आमदारांच्या विरोधाची धार बोथट करून टाकल्याचे दृष्य …

Read More »

मुंबईतील शासकिय जमिनीवरील गृहनिर्माण संस्थांच्या प्रश्नी शिवसेना सरसावली आमदार मंगेश कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

मुंबई : प्रतिनिधी शहरातील शासकिय जमिनीच्यावर उभारण्यात आलेल्या गृहनिर्माण संस्थांच्या नावे जमिनी करून पुर्नविकास करण्यासाठी घातलेल्या अटींमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी शिवसेनेच्यावतीने आंदोलन करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई व उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर गुरूवारी १५ फेब्रुवारीला धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांनी दिली. संपूर्ण मुंबई उपनगरात महाराष्ट्र शासनाने …

Read More »

कोकणातील रिफायनरीवरून शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना आव्हान मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलत असल्याचा शिवसेनेचा आरोप

नागपूर : प्रतिनिधी कोकणातील राजापूर तालुक्यात प्रस्तावित असलेल्या पेट्रोलियम कंपन्यांच्या रिफायनरीच्या स्थापनेकरीता शिवसेनेचे केंद्रीय मंत्री आणि खासदारांनी पुढाकार घेतल्याचे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यास २४ तासांचा अवधी उलटत नाही. तोच या रिफायनरीच्या प्रकल्पासाठी शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्याने किंवा खासदाराने पुढाकार घेतला नसून मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हे धादांत खोटे असून त्याबाबतची …

Read More »

मुंबई महापालिकेच्या विभाजनावरून भाजप-काँग्रेस समोरासमोर तर शिवसेनेला उशीराने जाग ; सभागृहाचे कामकाज दोनवेळा तहकूब

नागपूर : प्रतिनिधी राज्याची राजधानी असलेल्या मुंबईची लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुंबई महापालिकेचे तीन भागात विभागण करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार नसीम खान यांनी केली. मात्र भाजपने याचा राजकिय फायदा उठविण्यासाठी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे पाडण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रस्ताव आणला जात असल्याचा आरोप आमदार आशिष शेलार यांनी केला. त्यामुळे सत्ताधारी भाजप …

Read More »

एससी-एसटीचा अखर्चीक विकास निधी राखीव ठेवण्याचा कायदा करा शिवसेना, काँग्रेसच्या मागासवर्गीय आमदारांची मागणी तर भाजपाच्या आमदारांची पाठ

नागपुर : संजय बोपेगांवकर राज्यातील अनुसूचित जाती-जमाती आणि आदीवासी यांच्या विकासाकरीता विविध योजना सरकारकडून राबविण्यात येतात. या योजनांच्या अंलबाजवणीसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात असलेला विकासनिधी राज्यकर्त्ये इतर कामाकरीता पळवापळवी करत असल्याने मागास व आदीवासी समाजाची विकास कामे ऱखडली जात असल्याने भारतीय नियोजन आयोगाच्या अपेक्षा प्रमाणे अखर्चीक निधी आंध्र व कर्नाटक सरकारप्रमाणे राखून ठेवण्यासाठी …

Read More »

फक्त पाच वर्षे अफूची शेती करायची परवानगी द्या शिवसेनेच्या सुभाष साबणे यांची विधानसभेत मागणी

नागपूर : प्रतिनिधी मराठवाडा आणि विदर्भातील शेतीच्या मालाला हमीभाव दिल्याशिवाय शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारणार नाही. जर हमीभाव देत नसाल तर किमान आमच्या भागातील शेतकऱ्यांना पाच वर्षे अफूची शेती करण्याची परवानगी द्यावी जेणेकरून शेतकरी या कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडू शकेल. त्यामुळे अफूची शेती करण्याची परवानगी देण्याची मागणी शिवसेनेचे देगलूरचे आमदार सुभाष साबणे …

Read More »