Breaking News

Tag Archives: st bus

एसटी ९ वर्षानंतर पहिल्यांदाच नफ्याच्या महामार्गावर राज्य सरकारच्या विविध योजनांमुळे नफ्यात वाढ

गेल्या काही वर्षांपासून आर्थिक संकटाचा सामना करणारी एसटी ९ वर्षानंतर प्रथमच नफ्याच्या महामार्गावर धावू लागली आहे. आर्थिक संकटामध्ये रूतलेल्या एसटीने आता भरारी घेतली असून महामंडळाची आर्थिक घोडदौड सुरू झाली आहे. ऑगस्ट महिन्यात ३१ विभागांपैकी २० विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाला १६ कोटी ८६ लाख ६१ हजार रुपये …

Read More »

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागेः मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे घेतला. यानिर्णयाचे एसटी कर्मचारी कृती संघटनेने स्वागत करीत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. ऐन गणपती उत्सवाच्या काळात एसटी संपामुळे सामान्यांना झालेल्या त्रासाबद्दल मुख्यमंत्र्यांनी संघटनांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या …

Read More »

एसटी कृती समितीकडून कर्मचाऱ्यांचा संप; २०० डेपोतील एसटीच्या वाहतूकीला ब्रेक शासकिय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन द्या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यावर तोडगा निघेपर्यंत संप सुरुच राहणार

राज्यातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकिय कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुविधा या प्रमुख मागणीसह इतर मागण्यावरती अंतिम तोडगा निघत नाही तोपर्यंत धरणे आंदोलन करण्यात येत असल्याची घोषणा कृती समितीचे निमंत्रक मुकेश तिगोटे यांनी माहिती दिली. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांकडून आंदोलनाची हाक दिल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच सणासुदीच्या तोंडावर …

Read More »

एसटीचे अभिनव ” जागा दाखवा ” अभियान.. अक्षरा केंद्र या सामाजिक संस्थेचे सहकार्य

राज्य शासनाने महिलांना सर्व प्रकारचे एसटी बस मधून प्रवास करताना तिकीट दरामध्ये ५०% सवलत दिली आहे. सध्या एसटीमध्ये ” महिला सन्मान योजना ” अंतर्गत लाखो महिला दररोज एसटीतून ५०% तिकीट दरात प्रवास करीत आहेत. परंतु केवळ महिलांना तिकीट दरात सवलत देऊन चालणार नाही, तर योजनेच्या नावाप्रमाणे त्यांचा ” सन्मान ” …

Read More »

३१ पैकी १८ एसटी महामंडळाचे डेपो नफ्याच्या उंबरठ्यावर जुलै महिन्यात कमावला नफा

गेली पाच ते सहा वर्ष अनेक आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एसटी महामंडळाला भविष्यात सुगीचे दिवस येतील अशा रितीने एसटीची आर्थिक घोडदौड चालू असून, जुलै महिन्यात ३१ विभागांपैकी १८ विभागांनी नफा कमवला आहे. या महिन्यात एसटी महामंडळाचा तोटा २२ कोटी इतका नाम मात्र झालेला आहे. यंदा एप्रिल ते जुलै, २०२४ मध्ये …

Read More »

एसटी महामंडळाकडून बस खरेदीचे कंत्राट मिळताच अशोक लेलॅण्डच्या शेअर्सचे भाव वाढले एक हजार कोटी रूपयांचे कंत्राट अशोक लेलॅण्डला मिळाले

देशांतर्गत ऑटोमेकर अशोक लेलँड लिमिटेडने सोमवारी जाहीर केले की त्यांनी ९८१.४५ कोटी रुपयांच्या वायकिंग प्रवासी बसेसच्या २,१०४ युनिट्ससाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) कडून एकल सर्वात मोठी पूर्ण तयार केलेली बस ऑर्डर मिळविली आहे. हिंदुजा ग्रुपच्या भारतीय फ्लॅगशिपने सांगितले की, ऑर्डर जिंकल्याने बस सेगमेंटमध्ये त्याचे वर्चस्व आणखी मजबूत करण्यात …

Read More »

विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींना एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयात मिळणार.. एसटी प्रशासनाचा निर्णय- व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांची माहिती

शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. तसेच तसे आदेश देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत …

Read More »

एसटी महामंडळातील बदल्या पारदर्शक होणार..! महामंडळातील सर्व विनंती बदल्या आता संगणकीय ॲपव्दारे...

एसटी महामंडळामध्ये काम करणाऱ्या चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांच्या विनंती बदल्या यापुढे संगणकीय प्रणालीव्दारे ऑनलाईन पध्दतीने होणार आहेत. यामुळे बदल्यांबाबतचे विविध आक्षेप कमी होणार असून सेवा जेष्ठतेनुसार सर्व कर्मचाऱ्यांना समान न्यायाची हमी या नव्या पध्दतीने शक्य होणार आहे. एसटी महामंडळामध्ये चालक-वाहकापासून अधिकाऱ्यांपर्यंत सुमारे ८७ हजार कर्मचारी सध्या कार्यरत आहे. एक मध्यवर्ती कार्यालय, …

Read More »

अतुल लोंढे यांची मागणी,… एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या सर्वांची उमेदवारी रद्द करा

लोकसभा निवडणूक प्रचार सुरु झाल्यापासून सत्ताधारी भाजपा, शिवसेना पक्षाने आदर्श आचारसंहितेचे वारंवार उल्लंघन केले आहे व त्याबाबतची रितसर तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केलेली आहे. आता पुन्हा एकदा असाच प्रकार उघडकीस आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसवर बॅनर लावून बेकायदेशीरपणे शिवसेना पक्षाची जाहीरातबाजी …

Read More »

आता एसटीही आली रेल्वेच्या आयआरसीटीवर एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरुनही करता येणार

एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी एसटी महामंडळ व इंडियन रेल्वे कॅटरिंग ॲण्ड टुरिझ्म कॉर्पोरेशन (IRCTC) यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामजंस्य करारावर सह्या केल्या. महाराष्ट्र राज्य …

Read More »