Breaking News

Tag Archives: uday samant

विद्यापीठस्तरावरच्या परिक्षा घ्या, मात्र आधी पर्याय तपासा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा फटका काँलेज-महाविद्यालयीनस्तरावरील तरूणांना बसायला नको म्हणून विद्यापीठस्तरावरील परिक्षा सुरुवातीला पुढे ढकलण्याचा आणि नंतर रद्द करण्याची परवानगी राज्य सरकारने विद्यापीठ नियोजन आयोगाकडे मागितली. मात्र आता या विद्यार्थ्यांच्या परिक्षा घेण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विद्यापाठांना देत मात्र कोरोनाचा संसर्ग वाढणार नाही याची खबरदारी घेण्याचे …

Read More »

विद्यार्थ्यांना खुषखबर ? अंतिम सत्राच्या परीक्षा रद्द होण्याची शक्यता विद्यापीठ अनुदान समितीला पत्र पाठविल्याची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी विद्यापीठ अनुदान समितीने अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घ्याव्यात अशा सूचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे राज्य शासनाने निर्णय घेतला होता. पण, सध्याच्या कोरोनाच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रापर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द केल्या आहेत. त्याच प्रमाणे अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा …

Read More »

विद्यापीठाच्या परीक्षाही आता लॉकडाऊननंतरच नवे वेळापत्रक मे मध्ये जाहीर होण्याची शक्यता

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारने ३ मे पर्यत लॉकडाऊनची मुदत वाढविली आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाच्या सर्व परिक्षा ३ मे नंतर घेण्याचा निर्णय घेतला असून लॉकडाऊन संपल्यानंतर याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच अर्ज भरण्याच्या सर्व तारखाही पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुंबई विद्यापीठ …

Read More »

१२ वीत जाणाऱ्या विद्यार्थ्यांनों या वेबसाईटवर वाचा तुमच्या अभ्यासक्रमाची पुस्तके कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाचा निर्णय

मुंबई ; प्रतिनिधी ११ वीची परिक्षा दिली, निकाल येणे बाकी आहे. पुढचे वर्षे १२ वीचे आहे. आणि त्यात कोरोनाने घोळ घातलाय. किती दिवस घरात बंद रहावे लागेल याबाबत कोणतीच निश्चितता नाही. मात्र घाबरू नका विद्यार्थी मित्रांनो तुमच्या परिक्षेचा निकाल लागेल तेव्हा लागू द्या. मात्र तुम्हाला १२ वीचा अभ्यास सुरु करता …

Read More »

राज्यातील शालेय विद्यार्थीही करणार आता ‘लर्न फ्रॉम होम’ सर्व अधिकाऱ्यांच्या ऑनलाईन बैठकीत पडताळणी करण्याचे मंत्री गायकवाड यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी देशात लॉकडाऊन झालेले आहे. या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी शालेय शिक्षण विभागातील राज्यातील सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेत शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ‘लर्न फ्रॉम होम’ म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता येईल, यासंदर्भातील पर्यायांची पडताळणी करण्याच्या सूचना दिल्या. …

Read More »

विद्यापीठ, महाविद्यालय आणि सीईटी परीक्षांसाठी कुलगुरूंची समिती स्थापन विद्यापीठात टेस्टिंग लॅब सुरू करण्याबाबत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या सूचना

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या उद्देशाने विद्यापीठ, महाविद्यालयीन आणि सीईटी परीक्षेचे नियोजित वेळापत्रक पुढे ढकलले. मात्र राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये परीक्षेसंदर्भात संभ्रम निर्माण होत असल्याने विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ यासाठी कोरोना आजाराचा अंदाज घेणे आणि सर्व परीक्षेचे नियोजन आणि नियंत्रण करण्यासाठी समिती गठित करण्यात आल्याची माहिती उच्च …

Read More »

कोरोनाच्या लढाईत वैद्यकिय शिक्षण मंत्र्याची पहिल्यांदा हजेरी १३३० बेडचे 'विलगीकरण कक्ष' कार्यान्वित होणार असल्याची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुखांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जाणवायला लागल्यानंतर राज्यातील परिस्थिती हाताळण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मदतीला आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हेच धावल्याचे चित्र दिसत असताना राज्य मंत्रिमंडळातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख मात्र कोठेच दिसत नव्हते. अखेर चार-पाच दिवसानंतर त्यांनी पहिल्यांदाच बैठक घेतल्याचे दिसून येत …

Read More »

विद्यार्थ्यांचे १६ शुल्क सरकार भरणार बहुजन कल्याण विभाग मंत्री विजय वडेट्टीवार

मुंबई: प्रतिनिधी विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासप्रवर्ग व विशेष मागासप्रवर्ग विद्यार्थ्यांसाठी आता 16 इतर शुल्कांचा समावेश केला असून त्याचे अनुदान अनुदानित व विनाअनुदानित/ कायम विनाअनुदानित महाविद्यालयांतील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा मिळणार असल्याची माहिती बहुजन कल्याण विभागाचे (ओबीसी) मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. सन 2005-06 पासूनच्या …

Read More »

गृहनिर्माण मंत्री आणि अध्यक्षांच्या संघर्षातून म्हाडा कर्मचाऱ्यांची सुटका म्हाडा अध्यक्षाची नियुक्ती मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अखेर रद्द

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थानापन्न होवून दोन महिने झाले तरी सरकारमधील मंत्र्यांमध्ये अद्याप एकदिलाचे सुर अद्याप जुळले नाही. म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रिडा आणि स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याच्या कारणावरून म्हाडा अध्यक्ष आणि नवे गृहनिर्माण मंत्री यांच्यात निर्माण झालेला संघर्षातून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांची सुटका झाल्याची धक्कादायक …

Read More »

रत्नागिरी, सिंधुदूर्गसह चार ठिकाणच्या विद्यापीठ उपकेंद्राचा प्रस्ताव पाठवा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री सामंत यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई विद्यापीठावरील प्रशासकीय ताण आणि विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होण्यासाठी रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पालघर, ठाणे, कल्याण या ठिकाणी जिथे कमी वेळेत उपकेंद्र सुरु होऊ शकते, त्याचा प्रस्ताव तातडीने पाठवावा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले. मुंबई विद्यापीठाची आढावा बैठक घेताना त्यांनी वरील निर्देश दिले. …

Read More »