Marathi e-Batmya

Video: पंतप्रधानांच्या भाषणा दरम्यान काय घडले? त्यावर फोरमचे आयोजक काय म्हणाले

मराठी ई-बातम्या टीम

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार होते. त्यानुसार साधारणत: काल रात्री ८.३० वाजता त्यांचे भाषणही सुरु झाले. त्याचे थेट प्रसारणही अनेक वृत्तवाहिन्यांनी सुरु केले. परंतु पहिल्या २ मिनिटातच पंतप्रधान मोदी यांना भाषण थांबावावे लागले. विशेष म्हणजे त्यानंतर मोदींनी शांतता बाळगणे पसंत केले. त्यामुळे नेमके काय घडले? कोणालाच कळेना. फोरमचे संयोजक कॉल स्ट्रॉस यांनी तर थेट मोदी यांना तुमचे भाषण थांबवा आम्ही म्युझिक वाजवू असे सांगत भारताबद्दल सांगण्यास सुरुवात केली. त्यानंतर पुन्हा मोदींनी आपल्या भाषणास सुरुवात केली.

मोदींच्या या भाषण थांबण्यामागे त्यांचा टेलिप्रॉमटर बंद पडल्याचे कारण सांगण्यात येत असून टेलिप्रॉमटर बंद पडल्याने त्यांनी पुढे बोलणे बंद केले. याबाबत अधिकृतरित्या भारत सरकार किंवा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमकडून कोणतीही भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.  वास्तविक पाहता जागतिक व्यासपीठावर अनेकवेळा अशा तांत्रिक गोष्टींमुळे राजकिय नेत्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. परंतु अशा वेळी मुरलेल्या राजकारण्यांकडून तांत्रिक गोष्टींवर विसंबून न राहता ते एकतर त्यांच्या ज्ञानाच्या बळावर देशाची बाजू मांडून जातात किंवा करावयाच्या भाषणाची एक प्रत स्वत:च्या हाती ठेवून ते भाषण वाचून दाखवितात.

पंतप्रधान स्व.अटलबिहारी वाजपेयी हे अनेकदा परदेशी दौऱ्यावर गेल्यानंतर तांत्रिक गोष्टीवर विसंबून राहता त्यांना करावयाच्या भाषणाची प्रत ते सोबत ठेवत असत आणि तेच भाषण आपल्या शैलीत करत असत किंवा ते वाचून दाखवित असत. मात्र युपीए २च्या काळात परराष्ट्र मंत्री एस.एम.कृष्णा असताना त्यांनी भारताचे भाषण म्हणून दुसऱ्याच राष्ट्राचे भाषण वाचून दाखविले होते. त्यावरून भारतात त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीकेची झोड उठविली.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत घडलेल्या या घटनेमुळे काँग्रेससह नेटकऱ्यांनी मोदींवर टीकेची झोड उठविली असून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करताना टेलिप्रॉम्टरशिवाय मोदी बोलूच शकत नसल्याचा व्हिडिओ शेअर करत आहेत. तर अनेक नेटकऱ्यांकडून टेलिॉप्रॉम्टर पीएम अशी उपरोधिक टीका करण्यात येत आहे.

 

https://twitter.com/tantaniyu/status/1483152156803100675?s=20

Exit mobile version