Marathi e-Batmya

Video: आर्मी दिनानिमित्त गायक हरिहरन यांनी गायलेले गाणे ऐकले का? मग जरूर ऐका

मराठी ई-बातम्या टीम

भारत-पाक, भारत-चीन युध्दात महत्वापूर्ण भूमिका बजाविणाऱ्या भारतीय लष्कराचा आज अमृत महोत्सवी आर्मी दिवस. या दिनानिमित्त देशाच्या सीमेवर लढणाऱ्या लष्करी जवानांच्या उद्दात्त शौर्याला नमन करण्याचा दिवस आहे. त्यांच्या या अमूल्य कामगिरीला नमन करण्यासाठी आणि त्यांच्या कार्याला समर्पक असे गीत बॉलीवूडचे आघाडीचे गायक हरिहरन यांनी “माटी…” नावाचे एक सुंदरसे गीत गायले आहे. या गीताला संगीत दिले आहे आशु चक्रवर्ती यांनी तर क्रिएटीव्ह दिग्दर्शनाची बाजू सांभाळलीय नरैत दास यांनी. हे गीत फारच मधुर आणि जवानांच्या कार्याचे यथोचित वर्ण आणि त्याची देशाच्या मातृभूमीबद्दल असलेल्या भावनेने ओतप्रोत भरलेले आहे.

चला तर मग ऐकू या हरिहरन यांचे सुमधूर आणि श्रवणीय गीत आणि सैन्याच्या कार्याला सलाम करू या.

Exit mobile version