कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणात ८.३६ टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी ७ च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग निरंक आहे.
पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे व खडक कोगे, कासारी नदीवरील- यवलूज, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी असे एकूण १६ बंधारे पाण्याखाली आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 8.36 टीएमसी, तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 34.39 टीएमसी, दूधगंगा 25.39 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.51 टीएमसी, कुंभी 2.71 टीएमसी, पाटगाव 3.71 टीएमसी, चिकोत्रा 1.52 टीएमसी, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 1.24 टीएमसी, सर्फनाला 0.67 टीएमसी, धामणी 3.85 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 22.8 फूट, सुर्वे 24.8 फूट, रुई 56 फूट, इचलकरंजी 54.3 फूट, तेरवाड 51.3 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 46.6 फूट, तर नजीकच्या सांगली जिल्ह्यातील अंकली येथे 15.10 फूट अशी आहे.
