Breaking News

ऑगस्टच्या या तारखेपासून राज्यात पुन्हा पाऊस सक्रिय हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतलेला पाऊस ३० ऑगस्टपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. वास्तविक पाहता रविवारपासूनच पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. तर ३० तारखेला पावसाचा चांगलाच जोर चांगलाच वाढणार असून प्रामुख्याने मराठवाडा, विदर्भात सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होण्याऱ्या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडय़ातही अचानक वाढ  झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती.

राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज अ‍ॅलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत